![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
लेखनविभाग- पद्यकविता
उपद्रवी जिवाणू
कारे करोना करोना
कोण्या वुहानातून आला,
हवा इखारी बनली
कसा उपद्रवी झाला...
कस बियाणं फुगलं
सारं मातीत घातलं,
पल्ल्या आयुष्याच्या राशी
तुव्हं थैमान मातलं...
आम्ही कष्टकरी लोकं
दोन हात सलामत,
तुले लातखाल्या चेंदू
करू दोन दोन हात..
दुनियादारी बदलली
तुव्हां उगी कां बहाणा,
तुले चायनाले धाडू,
तु तं होता रे पाव्हणा...
शेती-माती माय माई
साऱ्या जगाले पोसते
"एकांताच" दुखी मन
कीती कष्टान सोसते..
नरेंद्र भा. गंधारे.
हिंगणघाट ,
प्रतिक्रिया
खुपच छान रचना नरेंद्रभाऊ
खुपच छान रचना नरेंद्रभाऊ
व्वा ! व्वा !!
क्या बात है
Dr. Ravipal Bharshankar
धन्यवाद
धन्यवाद.डाँक्टरसाहेब...
आपले मनसोक्त आभार...
Narendra Gandhare
उपद्रवी जीवाणू
शेती-माती माय माई
साऱ्या जगाले पोसते
"एकांताच" दुखी मन
कीती कष्टान सोसते..
गंधारे सर.. अप्रतिम हो
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
धन्यवाद,
आपले आभार, दळवीजी.
Narendra Gandhare
सुंदर
सुंदर कविता
मुक्तविहारी
धन्यवाद.
आपले आभार, मुक्तविहारीजी.
ही सर्व वाचकांची सुंदरता...!
Narendra Gandhare
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद, सर
आभार आपले..
Narendra Gandhare
पाने