नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
(मतला)
मी कोण होतो काय झालो मी.
करता कृषी लाचार झालो मी.
(१ ला शेर)
श्रीमंत येथे लोक ताठरले,
होता उभे पण दीन झालो मी.
(२ रा शेर)
माहीत ना मज काय असते शिर,
मुर्खापरी असहाय झालो मी.
(३ रा शेर)
धोरण असे की दोहती मजला,
सरकारची या गाय झालो मी.
(४ था शेर)
माणूस असुनी सत्य बुनियादी,
जाती धरम समुदाय झालो मी.
(अंतिम शेर)
देहापुढे जर हात टेकावे,
तर हाय! हेही काय झालो मी.
(मक़ता)
सोडून शेती काम शोधावे,
'रविपाल' रे निरुपाय झालो मी.
°°°
१) लगावली: गागालगागा गालगागा गा
२) सादरीकरण: स्वतंत्र तरन्नुम