नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
स्पर्धेसाठी
छंदोबध्द कविता
कर्जाचा फास
बळी पिकवितो मोती
घाम उन्हात गाळून
बारोमास काम करे
हौसंमौजं ती जाळून...
हाके संसाराचा गाड़ा
ढोर मेहनती करी
सुखी राहिल कुटुंब
हिच ईच्छा मनी धरी...
एका एका पैशासाठी
घाम भुईत सांडतो
लेकरांच्या सुखासाठी
डाव जीवाचा मांडतो...
लेकरांच्या शिक्षणास
भासे खुप चणचण
मार्ग त्यातून काढ़ता
सावकारी भणभण...
भाव वाजवी मालास
केव्हा भेटेल ते सांगा
पेरणीच्या दिवसात
कर्ज घेण्यासाठी रांगा...
शेती कर्ज विळख्यात
झोप उडून ती जाई
कर्ज फेडता फेडता
दिसे मरणाची खाई.
सौ. अनुराधा धामोडे
वाणगाव (पालघर).
9145476485
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने