नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
*प्रसुती जिव्हाळा*
भुईला जडो नित्य प्रसुती जिव्हाळा
हिवाळा उन्हाळा असो पावसाळा
अहंभाव दंभास जर जाळले तर
विचारास येतो नव्याने उजाळा
तुला कीव का येत नाही ढगा रे
जसा तू वरूनी तसा आत काळा
ऋतू सर्व येथील बेशिस्त झाले
अवेळीच करती सुरू कार्यशाळा
विचारा जरा जावुनी संसदेला
म्हणावे सभा न्याय्य की धर्मशाळा
विरोधी असो की असो राज्यकर्ता
दिसे भोग भोगुनी नामानिराळा
किती जाच अन्याय या कायद्यांचा
चला निग्रहाने परिशिष्ट जाळा
मशाली प्रमाणे अभय शस्त्र नाही
चला चेतवाया निखाऱ्यात ज्वाळा
- *गंगाधर मुटे 'अभय'*
=====