नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
पोट तू तर, पाठ मी हे, वतन होते, आपले
गावकुस मी, राखली पण, का मला तू, टाकले
मर्त्य मानव, सर्व काही, फक्त मानव, तोचि ना
भूतलावर, यातनामय, मी निलंबन, वाहले
मी तुझा ना, पुत्र आहे, ना तुझा मी, कोणिही
हे म्हणोनी, सांग ना रे, काय त्याने, झाकले
कृषिमधूनी, उलट कृषिच्या, धर्म आले, अन ऋषी
पण तरीही, शेत्कऱ्यांनी, वैर नाही, जानले
एक असता, हात दोन्ही, जोडण्याची, गरज का
कोण म्हणतो, द्वंद आहे, की मनाने, भाकले
पेरलेले, उगवते अन, कापलेले, भोवते
साक्ष माझी, ही समझ मी, घात सारे, पाहले
झोप माझी, उलट शत्रू, त्यामुळे मी, जिंकलो
तू न चौकस, राहिल्याने, हातचे ही, खोवले