पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
none
अरे उपकार केलेले असे विसरायचे नव्हते तुझ्या तू नाव बापाचे खरे लपवायचे नव्हते
किती कष्टून बापाने बियाणे पेरले होते तिथे गाजर गवत भलते आसे उगवायचे नव्हते
उन्हाळे सोसले त्याने तुला छायेत ठेवाया अता छायेत गाणे तू उन्हाचे गायचे नव्हते
मला तू द्यायचे होते खुले आव्हान युद्धाचे परी बोंडात राहुन या, अळी तू व्हायचे नव्हते
तुझा-माझा नव्हे केवळ, जगाचा बाप आहे तो कुण्या जातीमधे त्याला..कुणी बांधायचे नव्हते
- आत्तम गेंदे, पालम, जि.परभणी 9420814253
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.