आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा. SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***
admin यांनी गुरू, 08/09/2022 - 11:48 ह्यावेळी प्रकाशित केले.
सोशल मीडिया : शेतीसाहित्यिकांसाठी वरदान की शाप?
सुप्रभात मित्रहो,
मी काही सुमधूर वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा वक्ता नाही. पण वक्ता नसलो तरी "पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न" हे ब्रीद घेऊन शेतकऱ्यांची वकिली करत असल्याने शेतीची बाजू मांडणे टाळता येत नाही. कालच्या "सोशल मीडिया : शेतीसाहित्यिकांसाठी वरदान की शाप?" या विषयावर बोलताना मी काही ज्वलंत मुद्दे मांडलेत आणि साधासोपा विषय आणखी किचकट व अवघड करून टाकला.
त्यातील काही मुद्दे आपल्याला पटणारे व काही न पटणारे असू शकतात. पण न पटणारे असले तरी वास्तव कसे नाकारले जाऊ शकते? जे सत्य आहे ते कितीही कटू असले तरी मांडलेच पाहिजे, असे माझे मत असल्याने मी ते तर्ककठोरणे मांडलेत. त्यातील काही मुद्दे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले - शहराकडे चला
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणाले - खेड्याकडे चला.
(किती हा विरोधाभास! मग सत्य काय?)
- आपण साक्षर आहात की निरक्षर आहात ? हा प्रश्न मी सर्वांना विचारला आहे. आपण स्वतःपुरते तरी उत्तर देऊ शकाल?
- स्वत:च्या नावासमोर अॅड, बॅ, डॉ, प्रा. अशी बिरुदे लावणारी मंडळी सुद्धा अगदी अनपढ, अशिक्षित आणि अज्ञानीपणाच्या पातळीवर घसरलेले आहेत.
- आपण आज तंत्रज्ञान अवगत केले नाही तर माणूस म्हणून जगताना प्रचंड स्वरूपाचा धोका उत्पन्न होईल.
- सोशल मीडिया मुळे अभिव्यक्त होण्याची सर्वांना एकसमान संधी उपलब्ध झाल्याने प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाची एकाधिकारशाही संपली.
- ज्याचं घरात कुणी ऐकत नाही. बायकोला एक शिवी घातली तर ती त्याला लगेच उलटून १० शिव्या घालते, घराच्या बाहेर पडून चावडीवर तोंड उघडले तर लोक कानाखाली वाजवतात... असेही लोक सोशल मीडियावर येऊन मोदी, सोनिया, राहुल, पवार, उद्धव, देवेन्द्र यांना मनसोक्त शिव्या घालून अमर्याद व्यक्त होऊ शकतात.
- सोशल मीडियामुळे तोटे कमी आणि फायदेच जास्त आहेत.
याशिवाय आणखी बऱ्याच काही मुद्द्यांचा परामर्श घेतला आहे.