Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



IT कार्यशाळा - नवीन ईमेल तयार करणे - भाग-५

IT कार्यशाळा - नवीन ईमेल तयार करणे - भाग-५
 
ई-मेल खाते कसे तयार करावे ?
 
         आपण भाग-२ मध्ये पाहिल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने इंटरनेटचा वापर करायला शिकणे आजची आणि पुढील काळासाठीची अत्यंत महत्वपूर्णच नव्हे तर अनिवार्य गरज आहे. इंटरनेटचा वापर करायचा तर प्रत्येकाकडे ई-मेल असणे आवश्यक आहे. संदेश पाठवण्यासाठी ईमेलचा उपयोग होतो पण त्यासोबतच ईमेल म्हणजे आपली आंतरजालीय ओळख असते. शासकीय कामात जसा ओळखीची खात्री पटवण्यासाठी आधार कार्डाचा उपयोग होतो तसाच इंटरनेटवर ई-मेलचा उपयोग होतो. ईमेलचा वापर आपण डॉक्युमेंट, फोटो पाठवण्यासाठी तसेच प्रायव्हेट माहिती पाठवण्यासाठी करू शकतो. 
 
     फेसबुकसाहित अन्य सर्व वेबसाईटवर खाते उघडायला एका ई-मेल आयडीची गरज असते. फेसबुकवर मोबाईल नंबरच्या आधारे खाते उघडल्यास ई-मेल आयडीची गरज भासत नाही. पण कोणत्याही वेबसाईटवर मोबाईल नंबरच्या आधारे खाते उघडणे धोकादायक आणि तापदायक सुद्धा असते. त्यासोबतच मोबाईल नंबर सार्वजनिक होणे, हे एक आणखी कारण. मोबाईल नंबर सार्वजनिक करावा कि नको.... ही सुविधा फेसबुककडे असूनही अनेकांना त्या सेटिंग्ज न ज
मल्याने मोबाईल नंबर सार्वजनिक होण्याचा धोका संभवतो. आपले आधार, पॅन कार्ड, बँकिंग वगैरे मोबाईल नंबरशी जुळले असल्याने शक्यतो मोबाईल नंबर सार्वजनिक होण्यापासून टाळणे फायद्याचे असते.
 
 

    एक विनामूल्य ई-मेल खाते तयार करणे ही एक अत्यंत सोपी आणि सहज प्रक्रिया आहे. आपण ई-मेल अकाउंट हे वेगवेगळ्या domain वर काढू शकतो. (Domain म्हणजे @ नंतरचा भाग⁠⁠⁠⁠.) 
उदा.: gmail.com, yahoo.com, rediff.com वगैरे. पण सध्या वापरसुलभतेमुळे gmail प्रचंड लोकप्रिय असल्याने आपण gmail वर अकॉउंट उघडूयात. आजकाल प्रत्येक मोबाईल मध्ये Gmail App (fig-1) दिलेलेच असते. दिलेले नसल्यास Play Store (fig-2) मध्ये जाऊन आपण डाउनलोड करू शकता. तसेच इंटरनेट ब्राऊजर/गुगल क्रोमचा (fig-3) वापर करून ईमेल तयार करता येतो.
 
ई-मेल खाते ओपन करण्यासाठी खालील टप्पे पार करावे लागतात.
 
१]  Gmail App (fig-1) यावर क्लिक करा.
२] skip आणि > हे चिन्ह आले असेल (fig-4) तर  skip वर क्लिक करा. 

 
३] Add an email addres (fig-5) वर क्लिक करा.

 
४] (fig-6) Google वर क्लिक करा.

 
५] Creat account/for myself (fig-7) वर क्लिक करा.

 
६] इंग्रजीत आपले नाव लिहा. (fig-8) Next करा.

 
७] जन्म तारीख, महिना व वर्ष लिहा आणि Gender (स्त्री/पुरुष) निवडा. (fig-9) Next करा.

 
८] तुमचा ईमेल आयडी कसा असावा, याचे दोन नमुने आपोआप येतील. (fig-10) त्यातील एखादे तुम्हाला चालत असेल तर त्यापैकी एकावर क्लिक करा. किंवा तिसरा पर्याय (Create your own Gmail address यावर क्लिक करून तुमच्या आवडीचा आयडी भरा. आयडी एकमेवाद्वितीय असावा म्हणजे असा आयडी यापूर्वी कुणीही घेतलेला नसावा. त्यानंतर  Next करा.

 
९] जर हाच आयडी यापूर्वी कुणी घेतला असेल तर वेगवेगळ्या तऱ्हेने नाव टाकून बघा. आपला आयडी शक्य तेवढा छोटा असावा आणि दोन अक्षरांच्या मधात स्पेस ठेवलेले चालत नाही. आपल्या नावाच्या (आयडीच्या) जोडीला अंक-नंबर वापरले तरी चालतात. एकदा तुमचा आयडी स्वीकारला गेला कि आपणास पासवर्ड घाला असा मेनू येईल.
 
१०]  आपला पासवर्ड घाला. (fig-11)  पासवर्ड निदान ८ अक्षरी असावा. जितका जास्त अक्षरी असेल तितका अधिक सुरक्षित असतो. पासवर्ड मध्ये अक्षर आणि अंक यांचा समावेश असावा. त्यात # $ % & यापैकी एखादे किंवा त्यापेक्षा जास्त सिम्बॉलिक अक्षर घातले तर आपला पासवर्ड आणखी मजबूत होतो. पासवर्डमध्ये क्रमवारी संख्या म्हणजे १२३४५६७८ असे किंवा आपली जन्मतारीख वगैरे असू नये. कुणालाही अंदाज लागणार नाही असा पासवर्ड असावा. पासवर्ड म्हणजे तिजोरीची चाबी असते. ती कुणाच्याही हाती लागणार नाही आणि त्याची डुप्लिकेट चाबी कुणाला बनवता येणार नाही इतकी अशी काळजी घेणे आवश्यक असते. आपला ईमेल आयडी नोंद करून ठेवा. खालच्या चौकटीत right अशी खूण केल्यास टाईप केलेला किंवा करत असलेला आपला पासवर्ड आपल्याला पाहता येतो.

 
११] कन्फर्म पासवर्डच्या रकान्यात (fig-12) पुन्हा एकदा आपला पासवर्ड घालून Next करा. दोन्ही रकान्यात समान पासवर्ड टाकणे अत्यावश्यक आहे.

 
१२] Add phone number या पेजवर "more option" यावर क्लिक करा.
१३] Choose What's right for you या पेजवर "Add my number for account security only" यावर क्लिक करा. त्यांनतर Done या बटनावर क्लिक करा.
१४] आपला १० अंकी नंबर घाला आणि Next करा.
१५] त्यांनतर आपल्याला मोबाईलवर एक मॅसेज येतो, ज्यात ६ अंकी कोड दिलेला असतो. तो कोड घाला आणि next करा.
१६] Privacy and Terms पेजवर सर्वात खाली जावून "I Agree" यावर क्लिक करा. पुढील पेज उघडेल त्यावर "accept" वर क्लिक करा.
 
आता आपले Gmail खाते उघडले गेले आहे. TAKE ME TO GMAIL (fig-13) यावर क्लिक करा.आपण Inbox मध्ये पोचलेले आहात.
 
 ईमेल पाठवता येतो का बघा. पाठवता आल्यास ranmewa@gmail.com या ईमेल आयडी वर मला ईमेल पाठवून बघा.

ऍपचे मेनू :

 
शुभेच्छा!
 
 - गंगाधर मुटे
=========
तळटीप - एखाद्या बनावट व्यक्तीने बनावट नावाने व बनावट ईमेलच्या साहाय्याने जरी व्यवहार केला तरी त्याची ओळख लपेलच असे नाही. एखाद्याने फ्रॉड केल्यास त्याला हुडकून काढणे अवघड नसते. त्याच मुख्य कारणाने इंटरनेटवर वावरताना सर्व कामकाजात ईमेल मागितला जातो. माहितीसाठी माहीत असू द्यावे कि अनेक लोकांचा समज असतो की, फेक अकॉउंट ओपन केले किंवा बनावट आय डी वापरला तर आपली ओळख लपून राहते. हा चुकीचा समज असून इंटरनेटवरील वावर, आयपी ऍड्रेस व लोकेशन सहित अशा अनेक बाबी आहेत की कुणालाही हुडकून काढणे शक्य असते. 

Share