नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
नाहीतर करावी का आत्महत्या ?
कापूस तूर सोयाबीन मूग उडीद
जवस तीळ पेरले बेधडक शेतात
पावसाच्या भरवशावर
राजकीय नेत्यांच्या आश्वासनाप्रमाणे
बरसला मान्सूनच्या नावाखाली पेरणीपुरता
आणि आमच्या शेतातल्या पिकांनी
माना वर काढून जगण्याचे धाडस केले की
पाठ फिरवून गूल झाला साला
आम्हा कास्तकारांच्या खांद्यावर
दुबार पेरणीचा भार टाकून !
सांगा कशी करावी दुबार पेरणी
हातउसने घेऊन ?
बँकेचे लोन घेऊन ?
की सावकाराकडून रीन काढून ?
नाहीतर करावी का आत्महत्या ?
- मुक्तविहारी
प्रतिक्रिया
पाऊससुद्धा राजकारण करतोय
पाऊससुद्धा राजकारण करतोय .अतिशय छान कल्पनामुक्तविहारीजी अभिनंदन !
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
छान अभिव्यक्ती.
छान अभिव्यक्ती.
पुढील लेखनास शुभेच्छा!
शेतकरी तितुका एक एक!
पाने