Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




शेतकरी संघटनेचा आधारवड कोसळला

शेतकरी संघटनेचा आधारवड कोसळला
 
श्रीरंगराव मोरे "नाना'' अंबाजोगाई यांचे आज दि. ०३/०५/२०२१ रोजी दुपारी १२ वाजता देहावसान झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८८ वर्षे होते. या कोरोना संक्रमणाच्या काळात त्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी जीवापाड जपले परंतु दीर्घ आजारांनंतर त्यांनी आज शेतकरी संघटनेचा निरोप घेतला.
 
शेतकरी संघटनेची स्थापना होण्यापूर्वीच नानांनी शेतकऱ्यांसाठी कार्य सुरु केले होते. काही काळ त्यांनी शंकरराव मोहिते पाटील यांच्यासोबत काम केले परंतु मुळातच वारकरी संप्रदायाशी नाळ राखून असलेल्या  नानांना राजकारणात रमता आले नाही.  मग त्यांनी १९७८ मध्ये स्वतंत्रपणे "शेतकरी व शेतमजूर संघटना" स्थापन केली. शेतकरी आंदोलनानंतर त्यांना शरद जोशींविषयी माहिती मिळाल्याने त्यांनी त्यांचेशी बराच पत्रव्यवहार केला. कांदा आंदोलनानंतर पिंपळगाव बसवंत येथे झालेल्या मेळाव्यात त्यांनी प्रल्हाद कराड पाटील, माधवराव मोरे व प्रत्यक्ष शरद जोशींची भेट घेतली आणि शेतकरी व शेतमजूर संघटनेला शरद जोशींच्या संघटनेत विलीन करून त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचा संकल्प केला. मराठवाड्यात शेतकरी संघटना रुजवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.
 
नानांनी भूमिसेवक या साप्ताहिकाची स्थापना करून शेतकरी संघटनेच्या विचारांच्या प्रसारासाठीही खूप प्रयत्न केलेत. शेतकरी संघटनेच्या परभणी येथील दुसऱ्या अधिवेशनाची जबाबदारीही त्यांनी समर्थपणे पेलली. शेतकरी चळवळीत अतुलनीय काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुरस्कृत करण्यासाठी त्यांनी "ज्ञानश्री प्रतिष्ठानची" स्थापना करून ज्ञानश्री पुरस्कार सुरु केलेत. त्या प्रयत्नात त्यांना यश मिळून आतापर्यंत पाच लोकांना पुरस्कृत करण्यात आलेले आहे. पुरस्काराच्या मानकऱ्यात शरद जोशी, ब. ल. तामस्कर व प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे यांचाही समावेश आहे.
 
शेतकरी संघटनेसाठी आधारवड म्हणून चार दशकांपेक्षा जास्त काळ काम करणाऱ्या श्रीरंगराव मोरे "नाना'' यांना माहिती तंत्रज्ञान आघाडी व शेतकरी संघटनेच्यावतीने मानाचा मुजरा आणि लाख तोफांची सलामी.
 
- गंगाधर मुटे
प्रदेशाध्यक्ष
माहिती तंत्रज्ञान आघाडी, शेतकरी संघटना 

Share