डोळ्यातील द्राक्ष पाहू दे
चांदसा मुखडा, झिलसी आँखे
जुल्फोका बादल ऱ्हाऊ दे
तुझ्या डोळ्यातलं वादळ पाहू दे
वेलीवर बसली, पानांत घुसली
लुकलुक चवळी शेंग
उन्हात खुलली, हवेत झुलली
डोळ्यात झिलमिल पेंग
चाकवत, मेथी, गाजर, बटाटा
करडीचा काटा ऱ्हाऊ दे
तुझ्या डोळ्यातला पाटा पाहू दे
पाटाचं पाणी, मुळ्याची न्हाणी
थरथरथरते ओठ
धुक्यात भिजले, दवात थिजले
अलगद फिरले बोट
चंदन, चांदणं, नयनकटाक्ष
चंद्राची साक्ष ऱ्हाऊ दे
तुझ्या डोळ्यातील द्राक्ष पाहू दे
शिराण छाया, हृदयी समाया
लवलवथवती वक्ष
मध्यगुरुत्व, अल्लड स्वत्व
अभय रेखीती अक्ष
नवथर हरिणी, अवखळ अरुणी
अचपळ तरुणी ऱ्हाऊ दे
तुझ्या डोळ्यातली यरुनी पाहू दे
- गंगाधर मुटे 'अभय'
============
