Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



पांदनवाट

लेखनविभाग: 
ललितलेख

ललित

"पांदनवाट"

पावसाची पहिली सर कोसळली अन् अचानक मनात हिरवळ अंकुरायला लागली. जसं नुकत्याच यौवनातं आलेल्या मुलांच्या ओठांवर मिसूर फुटायला लागतं त्याप्रमाणे...... चाहूबाजूनी नुसती हिरवळच हिरवळ,जणू हिरवा शालू पांघरून नवंवधू लाजत मुरडत आपलं माहेर सोडून प्रियकराच्या घरात रास ओलांडून यावी त्याप्रमाणे...स्वतःलाच न्ह्याहाळून बघणारी ती पांदनवाट मोहरल्या आम्रतरु प्रमाणे नवंचैतन्य घेऊन मनात भरावी, आणि गर्द काळ्या ढेकलाना पायाखाली तुडवत कुठे हरळी, तर कुठे बारीक इवल्या इवल्याशा गवतात स्वतः च लपून बसणारी, लाजरी बुजरी ती पांदन स्वर्गातल्या अप्सरेलांही भूलन पाडणारी अशी आहे.
चालताना वाटसरूना जणू मृदू लोण्याच्या गोळयावरून चालतो की काय असा आभास निर्माण करणारी, त्या नरम ढेकळाचा मऊपणा पायात यावा अन पौर्णिमेचा चंद्र जणू हळूच लाजावा जणू काय त्या मधू चंद्राच्या मिलनातून अंतरंग खुलून निघावे, अन् अजूनही कस्तुरीचा सुगंध चोहीकडे दरवळावा तो येथेच्छ उपभोग घेणाऱ्या वाटसरूसाठी....
उन्हाळयात त्या उन्हाच्या तप्त लाव्हारसाने न्हाऊन निघालेली ती पांदनवाट घामेजलेली, थकलेली, निरागस, उदास पारव्याप्रमाणे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या घेऊन उदास गाणे गात आपल्याच तंद्रित वाटेतल्या वाटसरू सोबत खिन्न नजरेने बघत,एकटेपणा घेऊन चालनारी भयाण वाटतं होती...ती मृगाचा पाहिला वर्षाव होईपर्यंत; पण आता या मृगाच्या पाहिल्या पावसात स्वतः न्हाऊन निघालेली, जणू गर्भार स्त्रीप्रमाणे चेहऱ्यावरचा टवटवीतपणा आणि आपल्या त्या निखळ सौन्दर्याने वाटसरूना मोहात पाडणारी, आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढणारी ती पांदनवाट म्हणजे प्रियकराची जणू प्रियसीचं वाटते.....
या पांदनच्या दुतर्फा कडूलिंब, बोरी, बाभळी,आम्रतरु, चंदन तर कुठे त्यांच्याचं आधाराने उभी असलेली हळूच डोकं वर काढून बघणारी लता, वल्ली, वल्लरी, आपल्या मोहफुलाने सर्व वाटेत दरवळ फेकत, तर कुठे पिवळ्या गर्द फुलांची आरास टाकत, कधी कडुलिंबाच्या पिवळ्या लिंबोळ्या सर्व पांदनभर आच्छादलेल्या जणू सोनेरी वर्क घेऊन नवार लावलेली ती पैठणीचं....
त्या मनमोहक पांदनवरून चालताना कृष्ण जणू गोपीकेसोबत दांडिया खेळ खेळत असल्याचा भास होतो. पहाटेची ती रेलचेल, बैलांच्या घंटीचा निनाद, गाई वासराचा हंबर, शेणामातीच्या सुगंधी उटण्याने न्हालेली ही पांदनवाट मोकळे कुंतल सोडून येणाऱ्या जाणाऱ्या मजुर वर्गालां जणू हवीहवीशी वाटते.
नागमोडी वळणाची ही पांदन आपल्या वाटसरूना वाट दाखवणारी, सरळ शेताच्या बांधावर नेऊन सोडणारी, कधी एक अनामिक चिरतरून वाटते...जणू त्यावरून चालतंचं राहावं, ही वाट कवेत घेऊन...कितीतरी जन्माची अतृप्त असणारी तृष्णा या वाटेवरून चालताना तृप्त करावी अशी ही पांदनवाट.... सुखाशीन आल्हाद दायक वाटते

विशाल मोहोड
तळवेल, चांदुर बाजार
अमरावती,9011578771
Vishal84mohod@gmail.com

Share

प्रतिक्रिया