नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
राखीव तायडे विश्वस्तरीय लेखन स्पर्धा,२०२४
"एक सुखद अनुभव "
"योगायोग (कठान) शेतमाल भावाचा"
तेंव्हा आमच्याकडे 'करडी',पेरा खूप वाढला होता म्हणून आम्ही मुंग, हरभरा, सुर्यफुल असी पिके घ्यायचो आणि हि सर्व बियाणे आमच्या घरचेच असायचे बैलावरच घरच्या घरी पेरणी करीत होतो
असेच एकदा जुन महिन्याच्या सुरुवातीलाच अवकाळी पाऊस झाला दोन तिन दिवसांत शेताची वयानी आल्यावर वखराची पाळी द्यावी तर मुंगाचे बियाणे घरचेच असल्याने पेरणीचे धाडस केले त्यानंतर साथ आठ दिवसांनी पुन्हा भरपूर पाणी झाले त्यामुळे पांच एक्कर मुंगाची चांगली पेरणी साधून गेली. तेंव्हा आमच्या भागात ओलीताची व्यवस्था नव्हती सर्व कोरडवाहू च शेतकरी होतो., नंतर मान्सून चा पाउस बर्या पैकी चालू झाला व कधी नव्हे असा मुंग बहरत गेला .
, घरचेच बियाणे वापरून आम्ही''करडी 'ची पेरणी करायचो मुंग काढणीला आला तेंव्हा पावसाने ही थोडी उघडीप दिल्याने कमी खर्चात मुंग व्यवस्थीत काढून झाला व शेतही तयार झाले.
करडी चे पेरणीला मुंग लवकर निघाल्याने खूप वेळ होता व वातावरणही पावसाचे होते . त्यामुळे करडी पेरणी रद्द करून मी सुर्यफुलाची पेरणी केली., लगेच पावसाने रौद्र रूप धारण केले व त्यात माझ्या शेतकरी बांधवाचे मान्सून मध्ये पेरलेले मुंग दुर्दैवाने बळी पडले. एक शेंग सुद्धा मोठ्या मोठ्या नंबरातून तोडता आली नाही.
पाऊस वेळे वेळेवर चालू होता त्यामुळे तिन्ही ऋतूत येणारे सुर्यफुलाचे पिक ही कधी नव्हे तसे आले. सुर्यफुलाची,काढनी झालेवर पावसाचे पुन्हा आगमन झाले त्यामुळे सुर्यफुलाचे सर्व पाणे गळुन पडली फक्त काड्या च तेवढ्या राहील्या होत्या.ओल थोडी होती पण निसर्गाच्या लहरीपणाचा फायदा घेऊन मी ओल तुटू नये म्हणून सुर्यफुलाच्या काळ्या तेवढ्या वेचून वखराची पाळी न देता सरळ बैलाने च हरभरा पेरणी केली. बियाणे घरचेच होते काही दिवसातच हरभरा पिकाची एकसारखी समान उगवन झाली . निसर्गाचा लहरीपणा चालू च होता त्यामुळे त्यावर योग्य वेळी भरपूर पाऊस झाला व उत्पादन चांगले झाले.
धान्य किती ही झडतीत चांगले उतरले तरीही त्याला योग्य भावाची जोड असल्याशिवाय शेतकऱ्यांचे सुगी चे दिवस येऊ शकत नाहीत.पण, योगायोगाने अत्यंत कमी खर्चात तिनही पिके सिझन (हंगाम) मागे पुढे होऊन आल्याने भरपूर भाव मिळाला .असी संधी शेतकऱ्यांला फार दुर्मिळ असते .तेव्हा पासून मी मागे वळून पाहिले नाही पुर्वी ची १०,एकर शेती होती (कोरडवाहू)आता २०, एक्कर आहे सर्व ओलीताची आहे दोन्ही मुल शेती त आहेत.जाता जाता शेतकरी बांधवांना येवढीच माझी विनंती आहे की निसर्गाला अडवू नका त्याच्या बरोबर वाहत चला त्याच्या लहरीपणाचा फायदा घ्यावा आता तर जागोजागी हवामान खाते अंदाज व्यक्त करत आहे त्याप्रमाणे पिकांचे नियोजन करावे.
जय हिंद जय भारत
साहेबराव दे तायडे
मु.+पोस्ट -----तुलंगा
ता.--पातूर, जिल्हा --अकोला
पिनकोड --४४४५०१
प्रतिक्रिया
बघा . जमलं कि नाही .
बघा . जमलं कि नाही .
खूप खूप धन्यवाद तुम्ही हे
खूप खूप धन्यवाद तुम्ही हे सर्व करून दिल्यामुळे साध्य झाले.
मनस्वी आभार.
खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही ते
खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही ते सर्व करून दिल्यामुळे जमले.आभार.
पाने