Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

YFPCL


अधिक माहितीसाठी 
http://yugatma.sharadjoshi.in/  
येथे भेट द्या.टक्कर - कथा

लेखनविभाग: 
कथा

स्पर्धेसाठी कथा ... 

शिर्षक - टक्कर 

यंदाचा पाऊस काळ कमी झाल्यानं दरवर्षीसारखा उत्साह दिसून येत नव्हता. गणू आपली बैलं घेऊन गुराडीच्या तळ्याकडं निघाला व्हता. उन्हाच्या झळा बसत व्हत्या. दुपार टळून गेली तरी आणखी ऊन उतरलं नव्हतं. वाटत गोरोबा भेटला, "काय रं, गणू, लई उशीर केलास बैलायंला धुवायला. तळ्यावर कुणीच न्हाई, सम्देजण बैलं धुऊन गेलेत, अन तू आता चाल्लास व्हयं ?" गोरोबाचं म्हणणं ऐकल्यावर गणू सांगू लागला, "आरं बाबा मी कधीच तळ्याकडं येत न्हाई.  दरवर्षी मी आपलं नदाडालाच बैलं धुऊन टाकतो. औन्दा नाईलाज झाला म्हणूनंच घेऊन आलो बैलायंला." "गनबा काईबी म्हण पर ह्या वर्षी पोळ्याला काईच मजा न्हाई राव. सम्द्याची तोंडं सुकलेत. उगं आपलं करायचा म्हणून सण साजरा करायची येळ आलीय." गोरोबाच्या बोलण्याला होकार देत गणू म्हणाला, "काय करावं दोस्तां, ह्या वर्षी सारखा दुस्काळ ह्याच्या आधी कधी मी बगितला नव्हता. बैलाचा सण हा वरसातून एकदाच येतो, मंग साजरा तर करावाच लागंल की." गोरोबाचं अन गणूच बोलणं चालू असतांना बैलानं ओढ दिली आणि गणू गोरोबाला म्हणाला, "बरं जाऊ दे उद्या भेटू मिरवणुकीच्या टायमाला. बँड कुणाचा हाय ? साळबांचाच ठरीव. तुझ्या जोडीम्हागं माजीबी जोडी ठिवतो. चल जातो म्या." गणू लगबगीनं तळ्याकडं निघाला. 

           कधीकाळी सांडवा वाहून जाणाऱ्या तळ्यात नुसता गाळंच दिसत व्हता. पाणी खूप लांबवर गेलं व्हतं दरवर्षीच्या मानानं तळ्यात आर्धसुद्धा पाणी नव्हतं. गणूनं लगबगीनं बैलं पाण्यात न्हेले अन त्यानं बैलाला पवनी घातली. गरज्या अन हिऱ्या दोघांचाही रंग पांढरा असल्यानं पाण्यातून भाईर आल्यावर दोघंबी पांढरेशिपट  दिसू लागले. त्यांच्या अंगावर कुठलाच शेणामातीचा डाग दिसत नव्हता. उद्या पोळ्याचा सण म्हणून दोघंबी खुशीत व्हती. उद्या आपली मिरवणूक निघणार हे त्यान्ला बी म्हाईत व्हतं. गणूनं बैलायला पाण्यातून भाईर काढलं. तळ्यापासून गणूचं शेत खूप लांब व्हतं. वरलाकडच्या शिवारात जायचं म्हणलं की गावा भाईरचा चौक वलांडूनच पुढं जावं लागायचं. 

        बैलं चौकाच्या जवळ आले अन गरज्याला समोरून येणारा खलश्या दिसला. गरज्या पळतच सुटला थेट खलश्याच्या अंगावर. गणू त्याच्या मागं हाकलण्यासाठी पळाला, तंवर गरज्या खलश्या ची टक्कर लागली व्हती. दोघांचीबी टक्कर अशी जुपली की कुणीच मागं सरकायला तयार नाही.  गणू गरज्या ला हाकारु लागला पण गरज्या चं लक्ष त्याच्याकडं अजिबात नव्हतं. गणू खलश्याच्या मालकाला नामूला म्हणाला, "एं नाम्या आरं हाण की तुझ्या बैलाला. तुझ्या बैलाला बघून गरज्या चवताळलाय. तुझ्या खलश्याला हाकार रं" तसा नामू सुद्धा गणूला म्हणाला, "तूच हाकाल तुझ्या गरज्याला, त्योच आलाय खलश्यावर" गणू स्वतः लाच म्हणू लागला, 'मायला काय ह्या बैलाची दुश्मनी हाय कुणाला ठावं, एवढ वैर कुठूंंन आलं कुणाला म्हाईत'. 

        गर्दी जमू लागली कुणीच मागं सरकायला तयार नव्हतं माणसा-माणसातलं भांडण असलं तर माणसाला त्याच्यात पडून सोडविता तरी येतं. चार गोष्टी समजावून सांगता येतात. पर इथं ह्या बैलाला कुणी सांगावं. अंगावर कितीबी काठ्या पडल्या तरी त्यांच लक्ष अजिबात इकडं - तिकडं जात नव्हतं. आखाड्यात जसं दोन पैलवानात कुस्ती लागावी अन कुणीच मागं सरकू नये, डाव चांगलाच रंगात यावा तशी ह्या दोन बैलाची टक्कर चांगलीच रंगात आली व्हती. प्रत्येकजण आपआपल्या परीनं ह्या दोन बैलाच्या भांडणाचं कारण शोधू लागला व्हता. एवढ्या वेळात गावातली तरणीबांड पोरं हातामंदी मोबाईल शुटिंगचे कॅमेरे घेऊन पुढे सरसावली. मधूनच  एकाचा आवाज आला, "एं हाणम्या जरा बाजूला सरक की, आरं लाईव्ह शूटिंग चालू हाय फेसबुकला, काय मजा यायल्याय राव. पैसे दिऊन सुदीक असा डाव बगायला मिळाला नसता." गर्दीतून दुसरा आवाज आला, "खलश्या - गरज्या कोण जिकल ?लावा शंभर अन मिळवा दोनशे." कुणीतरी टक्करीवर सुद्धा सट्टा लावला व्हता पोरांनी सट्ट्या मध्ये पैसे सुद्धा टाकले. कोण जिंकल ह्याची पोरांमध्ये  चर्चा सुरु झाली. सितू  इज्याला इचारू लागला, "कोण जिंकल रं ? गरज्या का खलश्या? मला तर वाटतंय गरज्याच जिंकणार. कसला तगडा गडी हाय." तसा दुसरा त्याला उत्तर देत म्हणाला, "अन खलश्या काय कमी हाय व्हय ? खलश्या जमू देणार न्हाय गरज्याला." लोकांच्या तोंडून वेगवेगळ्या चर्चा  येऊ लागल्या.              

                    गणूला तर काहीच सुचंत  नव्हतं. हिऱ्या तिथंच शांत उभा व्हता. तो देखील आपल्या साथीदाराचा पराक्रम बघू लागला. काय केल्यानं दोघांची टक्कर सुटंल याचा विचार गणू करू लागला. त्याचे सगळे प्रयत्न फुकट केले. बैलं काही ऐकायला तयार नव्हते. नामुनं बरेच प्रयत्न केले पण त्याचा बी काई  उपयोग झाला न्हाई. टक्कर लागली टक्कर लागली म्हणून सगळ्या गावात बातमी पसरली. गावातली चिल्लर पार्टी लहान मोठे सगळेच जण टक्कर पाहायला चौकात आले. गरज्या अन खलश्या वर कितीतरी काठ्या मोडल्या पण दोघेही मागं सरकले नाहीत. दोघांची टक्कर सोडायच्या अनेक युक्त्या गावातले लोक  करू लागले. 

Share

प्रतिक्रिया