Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




शेतीसाठी अविभक्त कुटुंबपद्धति गरजेची

लेखनविभाग: 
शोधनिबंध

शेतीसाठी अविभक्त कुटुंब पद्धति गरजेची...
स्वातंत्र्यप्राप्तिनंतर देशाच्या कृषि धोरणात झालेले बदल, हरितक्रांति, मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार, तसेच राज्य पातळी वर कुळ-महसुल, कमाल जमीन धारणा कायदा यांसारख्या कायद्यांची निर्मिति या सर्व घटकांचा शेतकऱ्यांच्या जीवनशैलीवर प्रभाव पडला. वारसहक्कानुसार शेतजमिनीचे वाटप होऊन विभक्त कुटुंबपद्धति स्वीकारली जाणे हां या जिवनशैलीचाच एक भाग बनला. काळानुरूप शेतकऱ्यांद्वारे विभक्त कुटुंबपद्धति चा स्वीकार वाढत गेला आणि यामुळे पूर्वीचा मोठा शेतकरी हां आज अल्पअत्यल्प भुधारक शेतकऱ्यांमध्ये विभागला गेला. अल्पभुधारणे मुळे शेतकऱ्यांचे शेतीतून मिळणारे उत्पन्न कमी होत गेले. आर्थिक उत्पन्न कमी झाल्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्टया दुर्बल झालेत. शेतकऱ्यांच्या आर्थिकदुर्बलतेला शेतीचे छोट्या तुकड्यांमध्ये होणारे विभाजन कारणीभूत असून, ही अशीच परिस्थिती कायम राहिली तर भविष्यात शेतकऱ्यांचे पर्यायाने शेतकऱ्यांचे अस्तित्व धोक्यात येईल, असे मला वाटते.
आज देशातील तसेच राज्यातील मोठा शेतकरीवर्ग हां अल्प अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांमध्ये विभागला गेला आहे. काळानुरूप पिढी दर पिढी कुटुंबात वाढ होऊन जमिनीचे तुकडे होणे व् विभक्त कुटुंबपद्धति स्वीकारली जाणे साहजिक किंवा स्वाभाविक आहे. परंतु विभक्त झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रगतिवर परिणाम होत आहे, हे देखील वास्तव आहे. नव्याने सर्व गोष्टींची सुरुवात करणे विभक्त झाल्यानंतर शेतकऱ्याला गैरसोयीचे तसेच अडचणीचे ठरते. जमिनीचा एक विशिष्ट हिस्सा वारसहक्काद्वारे मिळून त्यावर उपजीविका करणे वरवर सोयीचे वाटत असले तरी त्यातून अनेक आर्थिक ओढताणीला विभक्त शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते.
विभक्त होताना बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना घर नसल्यास त्याची बांधनी करावी लागते. नव्याने संसाराची सुरुवात करण्यासाठी जीवनावश्यक आणि गृहोपयोगी वस्तुंसाठी खर्च करावा लागतो. विभक्त झाल्यानंतर घर बांधणी करणे म्हणजे पुन्हा शून्यातून सर्व गोष्टींची सुरुवात करणे होय. विभक्त झालेल्या अनेक अल्पअत्यल्प भुधारक शेतकऱ्यांना घरबांधणीचा खर्च करताना किती आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते हे बघितले आहे तसेच मीदेखील अनुभवले आहे. विभक्त होताना बऱ्याच वेळा शेती मशागतीसाठी लागणारी अवजारे, यंत्रांची नव्याने खरेदी करावी लागते. जी अवजारे यंत्रे वर्षातून एकदा किंवा दोनदा वापरण्यात येणार आहेत त्यांची खरेदी करणे विभक्त शेतकऱ्यांना परवडणारे नसते. अल्पअत्यल्पभुधारक शेतकऱ्यांना या वस्तु खरेदी करताना अनेक आर्थिक अडचणी येतात. यासोबतच पुढील पिकाचे नियोजन, त्यासाठी लागणारे भांडवल, खते, मजूरी यांसारख्या बाबींसाठी पैसा उभारावा लागतो त्यासाठी शेतकऱ्यांना बँक किंवा सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते. पिक चांगले आले, निसर्गाने साथ दिली तर घेतलेले कर्ज फेडले जाते. परंतु गारपिट अवकाळी पाऊस यामुळे होणारे नुकसान आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पिकास कमी बाजारभाव यांमुळे घेतलेले कर्ज फेडणे विभक्त शेतकऱ्यांना अशक्य होऊन बसते. त्यामुळे शेतकऱ्यांवर नाइलाजाने कर्जबाजारी होण्याची वेळ येते. कर्जबाजारी झाल्यामुळे घर संसार चालवणे, शेतीसाठी भांडवल उभे करणे आणि घेतलेले कर्ज फेडणे या समस्या शेतकऱ्याला मानसिक त्रास पोहचवत असतात. यातूनच पुढे नाइलाजास्तव शेतकऱ्यांद्वारे आत्महत्येचा मार्ग स्वीकारला जातो, ही खरी, गंभीर आणि चिंतेची बाब आहे.
विभक्त कुटुंबपद्धति स्विकारण्यामागे एक प्रमुख कारण म्हणजे शेतकरी भावंडांमधील आपापसांतील वाद. हे वाद होण्यामागे शेतकरी भावंडामध्ये आपापसांमधील असणारा अविश्वास हा कारणीभुत आहे. भावाभावांमध्ये अविश्वास असल्यामुळेच वादाला खतपाणी मिळते. यातूनच पुढे विभक्त कुटुंबपद्धति स्वीकारली जाते. फार पूर्वीपासून शेतकरीभावांमध्ये असणारा अविश्वास हा शेतकऱ्यांच्या प्रगतिला मारक ठरत आला आहे आणि तो आजही कायम आहे, हे दुःखद वास्तव आहे. शिक्षणाचा अभाव शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचे एकीचे वातावरण निर्माण होऊ देत नाही. शिक्षणाचा अभाव हेदेखील पूर्वीपासूनच शेतकऱ्यांचे व्यवस्थेद्वारे शोषण होण्यास जबाबदार राहिलेला घटक आहे. शिक्षण नसल्यामुळे बाजारव्यवस्था, राज्यकर्ते यांद्वारे शेतकऱ्यांची होणारी पिळवणुक आजतागायत थांबलेली नाही. कमी क्षेत्र, त्यातून मिळणारे कमी उत्पन्न आणि लुटारु बाजारव्यवस्था यांमुळे मिळणारे कमी आर्थिक उत्पन्न यासर्व गोष्टींचा विभक्त शेतकऱ्यांच्या रोजच्या जीवनावर मोठा परिणाम होतो.
या सर्व गोष्टी बघितल्या तर येत्या काळात शेती, शेतकऱ्यांचे अस्तित्व टिकण्यासाठी विभक्त कुटुंब पद्धत तसेच जमिनीचे तुकडीकरण थांबवावे लागेल. शेतकरी भावंडांमध्ये एकीची, सामंजस्याची व सहकाराची भावना निर्माण करणे अपेक्षित असून शेतीकडे फक्त शेती म्हणून न बघता एक व्यवसाय म्हणून बघावं लागेल. कोणताही व्यवसाय हा भागीदारी व सहकारातून यशस्वी होत असतो. समान गरजा भागवण्यासाठी एकत्र येणे आणि बचत करणे ही सहकाराची मुलभुत तत्वे शेतकरी बांधवांमध्ये जोपासली जायला हवीत. त्यातूनच विभक्त कुटुंबपद्धति स्वीकारली जाणे थांबू शकते. शेती यशस्वी करायची असेल तर शेतकऱ्यांनी सुशिक्षित होणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षणाची फक्त नोकरीसाठी प्राथमिकता ही मानसिकता सर्वांमध्ये रुजलेली दिसते. ती बदलून शेती करण्यासाठी शिक्षणाची प्राथमिकता अशी मानसिकता निर्माण करायला हवी. शिक्षण हा शेतीसाठी आवश्यक घटक आहे, ही बाब शेतकऱ्यांनी, त्यांच्या येणाऱ्या पिढीने ध्यानात घ्यायला हवी. आज उच्चशिक्षण घेऊन, पदवी पदव्युत्तर(एम ए, एम कॉम.,एम्एससी.,इंजीनिरिंग) शिक्षण घेतलेले अनेक तरुण शेतकरी शेतीत उतरत यशस्वी झाल्याची उदाहरणे देता येतील. त्यामुळे शेतकरी पालकांनीदेखील त्यांच्या मुलांना शिक्षण घेऊन शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.
शेतीचे छोट्या तुकड्यांमध्ये उरत चाललेले अस्तित्व शेतकऱ्यांसाठी त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी किती घातक, नुकसानकारक ठरू शकते, हे ओळखून गटशेती, सामूहिक शेतीसाठी अनेक गावे पुढे येता आहेत. सामूहिक शेती किंवा गटशेती ची सुरुवात एकत्र कुटुंबपद्धतितुन होऊ शकते, त्यादृष्टीने शेतकऱ्यांनीदेखील प्रयत्न करायला हवा. सरकारच्या मदतीशिवाय शेतकरी उभा राहणे शक्य आहे, मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे घर( कुटुंब) भक्कम करायला हवे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतिचा पाया त्यातूनच भरला जाईल, असे मला वाटते.
- अभिजीत राजेंद्र बोरस्ते
साकोरे(मिग), ता-निफाड, जि- नाशिक
मो. ९४०४३५०००१

Share

प्रतिक्रिया