नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
राज्यकार जीव घेत यंत्रणेतही तुझे.
हीत साधता न येत धोरणासही तुझे.
संविधान आपल्यास कवच देत हे तरी.
हक्क मारतात रोज भारतातही तुझे,
गावठात शेष एक फक्त पीठ गीरणी,
आजकाल मोडलेत रोजगारही तुझे.
ध्वस्त रे शिवार आॅल इंडियात जाहले,
काय काय अंकुरेल या दशेतही तुझे.
लीन मग्न भाषणात शोधण्यात उत्तरे!,
प्रश्न सूटतील काय या सभेतही तुझे.?
चित्र काढतो परी निराश रूप उमटते,
हालहाल पोचलेत कुंचल्यातही तुझे.
'धीर' तापले जहाल धोरणात शासकी,
माळरान भीजले न पावसातही तुझे.
वृत्त :~चामर
लगावली :~गालगाल गालगाल गालगाल गालगा
प्रतिक्रिया
धिरज साहेब! लय भारी गझल..
हळूवार.. तेजस्वी.. आणि मोठा परिघ असलेली,
हालहाल पोचलेत कुंचल्यातही तुझे.. अतिशय ओजस्वी!
Dr. Ravipal Bharshankar
Dhirajkumar B Taksande
धन्यवाद डॉ साहेब.!
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
'धीर'तापले नाही तापले मी इथून
'धीर'तापले नाही तापले मी इथून काही सांगू शकत नाही
मात्र धीरची गझल मात्र नक्की तापलेली दिसत आहे .
अप्रतिम सर.
गझल
व्वा सरजि क्या बात है
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
पाने