पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
अभंग
पंढरीचा राया : अभंग पंढरीच्या राया । प्रभू दीननाथा ॥ टेकितो मी माथा । तुझे पायी ॥१॥ युगे किती उभा । एका विटेवरी ॥ येवुनी बाहेरी । पाहा जरा ॥२॥ बदलले जग । आणि माणसेही ॥ तशा देवताही । बदलल्या ॥३॥ कनकाच्या भिंती । सोन्याचे कळस ॥ सोन्याची हौस । देवालाही ॥४॥ त्यांचे भक्त बघा । विमानाने जाई ॥ आम्हा का रे पायी । बोलावतो ॥५॥ देव गरिबाचा । तू राहिला गरीब ॥ भक्तही गरीब । ठेविले तू ॥६॥ आम्हां का रे असा । गरिबीचा शाप ॥ असे काय पाप । आम्ही केले? ॥७॥
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.