पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
शेतकरी काव्य
घायाळ पाखरांस ...
का गळाले अवसान या करांचे ? का भासते मलूल फडफडणे या परांचे ? आल्या अवचित कुठूनी अनाहूत गारा ? तुला लोळविले भेदुनी तुझा निवारा .....!
दृढ हिकमतीने तू घरटे बांधियेले, अगम्य कला गुंफुनी अध्धर सांधियेले, विसरुनी भूकघास, प्राण ओतलास, वादळात क्षणाच्या झाले सारे खल्लास .....!
गठन-विघटन असे सृष्टीचक्र, उर्वीही कंपविते होतां दृष्टीवक्र, उन्मळती तरूही जलप्रलयाने, रे त्रागा अनाठायी, वियोग आशयाने ......!
सावर विच्छिन्न परं, घायाळ काया, हो सिद्ध, धरी जिद्द, फिरुनी श्रमाया, बाधित वेदनांनी, जरी ऊर धापे, साधित काय होई, रुदन विलापे ? ......!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.