![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
अष्टाक्षरी काव्यलेखन
शीर्षक - हक्क मिळवून देवू
कृषीवल संस्कृतीचा
देश हा शेतीप्रधान ,
'खेड्याकडे चला ' बोल
बापूजींचे ते महान......१
माझा शेतकरी करी
काळ्या आईचीच सेवा ,
राबतोय तो म्हणून
चाखतोय आम्ही मेवा.....२
ऊन ,वारा,पावसाची
नसे त्याला काही तमा ,
सर्जा राजा संगतीला
करी तो खातरजमा.......३
दीन कृषका आवळे
सावकारी कर्ज पाश,
गारपीट ,अवकाळी
होतो बिचारा हताश ........४
त्याच्या शेतमालासाठी
नसे योग्य हमीभाव ,
हक्कासाठी करतोय
आंदोलन नि उठाव.........५
संकटांची मालिका ही
थांबणार कधी पाही ,
देव पण घेत आहे
परीक्षाच जणू काही........६
शिवराय,ज्योतिबा नि
बाबासाहेबांची निष्ठा ,
कृषी हित जोपासले
त्यांची केली पराकाष्ठा......७
आता गरज आहे ती
त्यांना जगवण्याची,
हक्क मिळवून देवू
जागृतीच्या जाणिवांची......८
सौ रझिया इस्माईल जमादार अक्कलकोट जिल्हा-सोलापूर
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!


कृपया प्रवेशिकेचे शीर्षक बदलावे. अनेकदा समान शीर्षक असल्याने गुणतालिकेत गुण नोंदवताना घोळ होत असतो. त्यामुळे शीर्षकात वेगळेपण असावे.
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते वाटत नाही.
पाने