

बैल पाण्यावर उपाशी तारू कैसे
तासलेल्या कासऱ्याने मारू कैसे
माय म्हणे सोड गायीला चराया
वासराची हाक ती नाकारू कैसे
घास, कडबा ना कड्याळू ना गवतही
या झुऱ्यावर…त्या झुऱ्यावर चारू कैसे
पीक झाले खाक अति पाण्यात आता
काळजाला पावसात निहारु कैसे
फास घेण्या दोर होता टांगलेला
काळजी मज मायबाची…हारू कैसे
सुगत मानकर
Comments
लगावली
गालगागा गालगागा गालगागा
क्या बात है!
शेतीशी निगडीत शब्दप्रयोग खूप आवडला!
हेमंत साळुंके
खूप आभारी आहे
धन्यवाद ....