पुन्हा जन्म घे बळीराजा
पुन्हा जन्म घे बळीराजा
बघ शेतकऱ्याचे हाल
कवडीमोल भावात लुटतात
इथे आमचा सारा माल
मुकुट दिला तू आम्हाला
म्हणतात शेतकरी बळीराजा
पण बाप झाला ना आजा
ना झालो आम्ही राजा
पंच पक्वान्न सोड ताटात
नसते आमच्या साधी दाल
पुन्हा जन्म घे बळीराजा
बघ शेतकऱ्याचे हाल
कुणी वाली ना राहिला आमचा
इथले नेते सारे गद्दार
कृषी प्रधान देशात पुढारी,
व्यापारी, सुखी नोकरदार
पोशिंदा सोडून बाकी सारेच
इथे झाले मालामाल
पुन्हा जन्म घे बळीराजा
बघ शेतकऱ्याचे हाल
राजा राजा करून आमची
थट्टा चालली सारी
रोज फासावर लटकतो
इथला एक शेतकरी
शरद जोशी चा अवतार घेवून
तू पुन्हा मुकुट घाल
पुन्हा जन्म घे बळीराजा
बघ शेतकऱ्याचे हाल
राजेश अंगाईतकर
धनश्री नगर, ITI कॉलेजच्या मागे, पिंपळगाव रोड, यवतमाळ
मो. नं. ७०२०७६३९५५

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
गंगाधर मुटे
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!


लेखन छान आहे.
समीक्षक
लेखन छान आहे.