Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



मायीनं जगवली पिलं

लेखनविभाग: 
गेय रचना/गीत/पोवाडा इत्यादी

मायीनं जगवली पिलं

आभाळाची अंगावर,उबदार शालं
झोपायला भुईची,गादी मखमलं
कर्जाखाली दबून बाप,कायमच गेलं
पंखाखाली घेऊन मायीनं, जगवली पिलं.     Il धृ ll

डोंगराएवढं काळजात, घेऊनिया दुःख
पाडसाला सांभाळली, विसरून तहान भूक
लेकरासाठी जीवाचं ,करून घेतलं हालं
पंखाखाली घेऊन मायीनं ,जगवली पिलं.     II १ ll

खांद्यावर घेऊन जू, शेत नांगरली
फाटलेल्या संसारावर ,पदर पांघरली
हिम्मतीने लढली माय ,न जाऊ देता कलं
पंखाखाली घेऊन मायीनं, जगवली पिलं.       Il २ ll

उन्हामध्ये काम करून ,होई लाही लाही
संसाराचा ओढला गाडा, फक्त लेकरा पाई
घाम गाळून लेकराले, खूप शिकविलं
पंखाखाली घेऊन मायीनं ,जगवली पिलं.        Il ३ ll

कष्ट करून करून अंगी ,राहिला नाही त्रानं
अचानक देहातून, निघून गेला प्राणं
आठवण येता मनी ,वाहे डोळ्यातून जलं
कारण पंखाखाली घेऊन मायीनं ,जगवली होती पिलं  ll ४ ll

                               कवी 
                          बा.सो.कांबळे
                पंचशील नगर परळी वैजनाथ
                       ता. परळी वै.जि.बीड
               मो.नं.9860806747

Share

प्रतिक्रिया