Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २६ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

बाका संमेलन

Main page content

Profile picture for user सुनील बावणे - निल
By सुनील बावणे - निल | 12:33 AM IST, गुरू November 26, 2026
मागोवा

*मागोवा*

*२९ सावा झाडीबोली साहित्य संमेलन,*
*दोन इर जुन्यासुर्ल्यात भाय मज्जा... कायलेकातं फकस्त दोनस इराचा घेतलनं का...यायनं*

"ये भाऊ....., ये सुन्या भाऊ....,
आबे ये सुन्या.... बया झालास का येकलास खिदडत चाल्ला मुलूक मुलूक....!"
मांगून मालं दोन येगरे येगरे आवाज आले आणि मालं अभ्यासून सुन्या मंन्हारे मया जीवाभावाचे असलं हे पक्का झाला ...
लगबगीत होतो तबी थांबलो लमच्यायच्या पाई
आले जवर बैताड लेकाचे थोडासा पेरमान खेक्सावलो दोघांवर बी..
"कायले बोंबलता गा सकारी सकारी ढोरावानी, पल्लो असतो ना सिंदून धावता-धावता सकारी सकारी,
"चाय पेवाचा हायं का सांगा तुमाले ..! "
तसं नाही बे,, चाय तं पेऊस, पन तुवा दर्सन झाला आत्ता कोठ... काऊन तं नाव हायं तुवा मोठ.. आन् आमी का हिंडतो गावभर रिकामे या येटारातून थ्या येटारात मुलकाच्या खबरा घेतं..!"
"आना का बे सुन्या चार पाच दिसाचा तू दिसला नाही कोठ गुडूप झाला होता बाप्पा आज काल... भायसं चर्चा होते ना बे तुया नावाची मुलकामंदी .... पदया थोडासा गमतीच्या मुडात बोलत होता.
म्या का केलनं गा, मी तं आपल्या कामात रायतो, इब्लिस लेकाचे तुमी, मी दोन इर येका आनंदाच्या माहोलमंदी होतो गा जुन्यासुरल्याले...!

अबे हो आमालं माईत झालां, सप्पा रामायन झाल्यावर का,,, तो तू नोये मनून... ईस्या बोल्ला.

आबा.... का झालां गा..? मी इचारात पल्लो.

सुन्या ते नाई का बे , झेंगाट सेल्यावरच्या घरातलं.. कच्ची असून पक्की पराली न बे सुन्या थे.!
मले उलीसा राग आला..

"मी का करू मंग..?"
नाई मनलं,, तुबी चार_पाच दिसापासून गायब होता ना, पण मंग माहीत झाला का तू २९ साव्या साहित्य संमेलनात जुन्यासुरल्याले गेला मणून,
थोडा बरा वाटला. तवा मनलं हा माणूस तसा नाई बा..! ईश्या सांगत होता‌

"काबे तुमी बयताडं हो सकारी सकारी थंडीत घाम फोल्ला मले बयताळ भोके हो..!." मी थोडा नाराज झालो त्यायवं.

बरं थे जाऊ दे असे झेंगाट लयी केले...
आन् लयी परून गेले..

माल बरा वाटला भेटले दोन साहित्यिक, दोन कट चायमंदी यायले पुऱ्या झाडीबोली साहित्य संमेलनाची नसा आनतो का नाई पा आता....
कवितातं मनालेस लावते लमचे, पण आज यायले संमेलनच दावतो ...

घेतला तीन कट चा, जावून बसलो जवरच्यास जंगल झाडीत...झाडीबोली साहित्य संमेलनाच्या गमतीजमती सांगत.

बाप्पा.. बाप्पा.. बाप्पा.. बाप्पा काय सांगू बे तुमाले काय बाका भरला होता बे २९ सावा झाडीबोली साहित्य संमेलन जुन्या सुरल्याले... काय त्या गावाचा उत्साह होता, काय थे माणसं- बाया, लहान पोट्टे पोट्ट्या... बाबो...

इंदिरा गांधी हायस्कूलच्या आवारात इतका मोठ्ठा साहित्यिक मांडव घातला होता, जागा नोयती गा मांडवात... याच्यासाठी गावातल्या लोकांनी तरन्या ताट्या पोरायनं भाय कस्ट केलनं म्हने...
आबे,,, हो का बे सुन्या...! ईश्या मंदीस बोलत होता.

नवीन नवीन पोट्ट्यायनं गावाचा कारभार हाती घेतला मंजे काहीतरी नवीन चांगला काम झालास असनं..
चांगला झाला...! आबे चांगल्यावून चांगला झाला म्हणनं...! मी आनंदान मनालो.
जुन्यासुरल्याचे ४_५ नवीन पोट्टे पोर भायसं हौसी गा...
झाडीबोली स्याकाअध्यक्स, कार्याध्यक्स , स्वागत अध्यक्स, सरपंच यायच्या संग पुन्हा गावातले मेहनती पोट्टे.
बाप्पा बाप्पा काई ईचारू नोका बाप्पा ..
याच्यासाठी येथूनसं थापुट्या वाजवा गा... भायसं कामाची मानसं चांगली मानसं हे. त्यायच्या सोबतीले केंद्रीय समिती होतीस, तसास भाऊ संग पंदरा - सोडा जन् आमी झाडपे साहित्यिक होतोस ना... मग दोन इर मज्जास मज्जा... पर साहित्यिक मज्जा. कमालसं केली बाप्पा...अक्क गाव साहित्यनगरी केलनं गा यायनं..

का का केलनं गा यायनं...! थेपनं गावातलं बाया-माणसं, पोट्टे - पोरी संगले घेवून..!
*म्या* गेलो तवा पुस्तक पोवा चालू होता, गावातले सप्प्या जाती-धर्माचे लोक सामील झाले होते, वाना वाना चे कारेकरम होते गा पुस्तक पोयामंदी

🏆 गोंडी लोकांचे गोंडी नाच, त्यायचे वाजे, सोंगं , गाने काय बेस होते गा म्हणून सांगू...

🏆 कुंभार समाजाचा डोस्क्याव हानके,मरके घेऊन सादर केलेली कला अना् त्यायचा नाच, ढोल तासे...

🏆 ढिवर समाजाचा झिनका नाच, त्यायची पारंपारिक कपडे, ढुटी- पेलनी, दागिने आबा बाबा ... जुन्या आटवनी आल्यामले

🏆 धनगर समाजाचा गाना त्याचं मल्हार गीत, पिवरा रंग भायस बाका होता गा...!

🏆 राणी हिराई, झाशीची राणी यायचे पराक्रम तर पाहण्याजोगी होते गा...

🏆 बचत गटाच्या बायायचे वाना वानाचे गाने व त्याचे कारेकरम येसभुस्या काय ना काय गा...

🏆 स्याडाच्या पोराचे लेझीम नृत्य, त्यायचा गाना,नाच. डगर लांन्चुक्या पोरायचा भायस बाकं होत गा..!
*जूनासुरला गावं मंन्जे परतीक वाटत होता गा तवा*, त्याच्या संग संग गावातील बाया मानसा लांन्चुके पोरा-पोरी आना आमी तीनकसे साईक्तिक ....
काय ईचारते बाप्पा ती येरा..!
🙏🙏
गावातून पुस्तक पोवा साईक्त्य संमेलना वजी आला तवा गच्च भरलनं गा साईक्तिक मांडो... च्या बईन आमालेबी उलिकसी जागा नोयती गा बसले ...
पर मनिल्याच्या किस्याले साईक्तिकाचा बिल्ला लावून झलकला का गावातलं कोनीबी जागा देये बसाले..
बरे वाटे आम्हाले... बरे वाटे मानसाले...‌
अना् मंग झाले मांडवात साईक्त्यिक कारेकरम सुरू..
उद्घाटक पिवन्याची वाट..
आन् मंदीस होत होते रंगीत कार्यक्रमाचे थाट..

डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर लिखित झाडी गौरव गीत नंदू भाऊन आपल्या अलकसं ढंगात गायला... मांडवात एक नवा संचार झाला...

आदिवासी, कोळी, धनगर, लेझीम नाच त्यायच्या त्यायच्या गाणन्यावं झालनं...
हे संमेलन पावून साईक्तिक पावनं सुकावून गेले...

रिबन कापणारं मान. पालकमंत्री हाशी खुशीत जवा मांडवात आलं...
तवा माडोत येगरास हरिक झाला... थापुट्यानं मांडो भरून गेला...
स्वागत गीत गायली कोसे बाई....
आन्
स्वागत गीत अजूनही डोस्क्यातून जात नाही...
इतका बेस झाला गा स्वागत गीत .

पावूणन्यांच्या स्वागताले मंदा - मंदी भायस बेस वाजे
Dj.. आन् मंग परास्तविकिले जोरात थापुट्या वाजे..

उद्घाटन मंत्री महोदय याचा भाषन भाय बाका झाला... गावासाठी संमेलनासाठी जरूर तिची मदत करून गेला...
पावनेपरी, समदे भाषना झाल्यावं मान. संमेलनाध्यक्ष सरांचा भाषण भाय बाका...
एवडे सम्मेलन पायले पण झाडीबोली संमेलनाच्या मांडोत बसाले नोयती जागा...
आबा बाबा... इतका मोठा कारेकरम झाला का बे... आम्हाले काऊन नाही नेलास बे जुनासुर्ल्याले ...! दोघं ही नाराज झाले...
थांबते का,अजूक बाकीस हाहे लगीत वगीत...!

"आमी ज समदे कामधंदे टाकून बसतो तुया संग सुन्या, काय काय झालं त सांगून टाक अजसं. आयकाले भायसं बेस वाटत आहे गा....!"
हो का ,, मंग ऐका लमचे हो...

मंग झालनं ना येक येक मांडव सुरू.
हे बी खरसं हाये मना.. झाडीबोलीत भायसं कविता लिवल्या गा, पर कता कमी लोकं लिवते, तवा मले बी हुरूप आला कता लिवाचा मी बि लिवील मंतो कता आता.
मंग दिस कलत्या येरले भायं बाका कारेकरम झाला न गा बाप्पा...
म्या होतो नं थ्या कारेकरमात पावने पुकारले. रंगत आनली बाप्पा मी त्या कारेकरमात, आंन् मुलाखत देणारं पावनं भायसं मोठे होते गा अगदी फेमस दोनीबी
झाडीपट्टीतील फेमस नाटककार डॉक्टर परशुराम खुणे झाडीपट्टीत फकस्त नावस काफी आहे. दुसरं पाहून होतं एड.लखन सिंग कटरे, ज्येष्ठ साहित्यिक यांयची मुलाखत जिल्ह्यात गाजली ना बापा..., मुलाखत घेणारे बी लय हुसार त्याच्याकडून सप्पा उकलून घेतला ना त्यायनं भाय गर्दी होती गा...!
मुलाकतीच्या कारेकरमाची समद्या साहिक्त्य नगरीत व जिल्ह्यात चर्चा हाये मने...
झाडी मंदल्या परसंगा परमान गायलं जानारं बायाच गान तं काई पुसूस नोका, रोवन्याचे गाने, लग्नाचे गाने, भुलाबाईचे गाने, दरण कांडणाचे गाने, गावातल्या बायानं हे गाने गायले.
बाबो... रात्रीचे कारेकरम तं काई ईचारुस नोका तुमी. लईसं रंगारंगाचे कारेकरम झाले रातती ८:०० वाजेपासून तं राती १२:०० वाजे पातूर भायसं मज्जा...
गावातल्या पोरा - पोरीचे गोंडी नाच काय..! शेतकरी नाच काय..! कोळी गाण्यावर नाच काय..! नकला काय.. आरा रारा.... मोठ्ठा कलाकार मानूस.. आमीस रंगून गेलो होतो...
आमचा येगरास आइटम चालू होता कुर्च्यात बसून, फिसा झोंबल्यागत हासतं होतो गा आमी... गावातले समदेजन आमाले पाहून, बयताड नाई झाले असं मनतं असिनं च्या बईन आमाले...
आमच्या भोवताल बसलेले गावातल्या आमचं सोंग पाये आन् थे आमावर फिदीफीदी हासे...
खरी गंमत आली डंडारीले, एकेक सोंग मनू नोको बाप्पा..
त्यायचे सोंग पावून आमाले सोंग करुस्या वाटे ना गा...!
गमती जमती करता करता
रातीचे दोन वाजले ना निजाले...

येक बावणे डफरंवालं होतं त्याच्यातं.. रात्री दोन वाजता डफरा वाजवून मादेवाचे गाने, लोकगीत गाऊन गावच्या सरपंच सकट गावच्या पोट्ट्यायले आन् बुड्याबाड्यायले नाचवलं न गा तेवऱ्या राती... रातीचे दोन वाजले ना साहित्यिक निजाले.
झोपाची चोकट येवस्था बिन करून देल्ली सरपंच व त्याच्या सोबत्यायनं... आता आम्ही झोपनार तवं, सरपंच अना्. सोबत चार-पाच हौसी पोट्टे आले न बसले आमा जवर, उच्च साईक्त्यिक गोष्टी माता कराले... बरं.. ईसय बी सप्पायच्या आवडीचा होता, त्या विषया मंदी रंगत आणली ना भाऊ समद्या साहिक्त्यिकांनी. मंदा मंदी पर्शा भाऊचा साडेचारशे रुपयाचा विषय आणि तो कसातरी कावराबावरा करे बाप्पा बाप्पा बाप्पा... दा पंदरा साहिक्त्यिकायनं एकामेकाची भायस घेतली गा...
*रातभर नाही डोऱ्याले डोरा आन् झाली पायटची येरा...*
झालं पायटच्या कारेकरमाचं नियोजन सुरू ...बलावला ट्रॅक्टर न गेलो बापा गण्या भाऊच्या घराकून गावाबाहेर तऱ्यावं सप्पे हौसी साईक्त्यिक सकारी सकारी तऱ्याव साईक्त्यिक बैठकीसाठी.. पाहण्याजोगी होती गा उघड्यावं बैठक. लई वर्षान बैठक झाली गा अशी... मनसोक्त मोकळे झाले ... आना लागले ना पुन्हा सकारच्या कार्यक्रमाच्या तयारीले आंघोर पाणी, चाय, नास्ता करून्सानं समदे टाप टिप मंदी तयार झाले ना सकारच्या *झाडी कवी संमेलनासाठी...*

कविसंमेलन मनलं का तुमाले माहीतसं हाये, येकशे-येक झाडपे कवी जमा झाले होते, भायसं गर्दी कवीची आन् ऐकणाऱ्याची अन त्या कविता बी मनू नोका, अस्सल झाडी भाषेतसं होत्या. ११७ होते ना कवी लोकं.. परतेकाले सिल्डा का... परमाणपत्र का..फोटो काढना का... भाय बेस कवी संमेलन, समदे कवी चमकत होते बाप्पा...! दुपारी सव्वा वाजला कवी संमेलन सराले.
खादोड खावाचा कारेकरम ईचारूस नोका. वाना वानाचा जेवलो गा पोट फुगतले..
बरं... जेवन झाल्यावं सुस्ती याले पायजेनं पर... सुस्ती मंजे नाईस, कोनाले निर्रा साहिक्तिक फिसा झोंबला होता च्या बईन आंगात.
समदी सोय केली होती गा आयोजकायनं खरंच मानावा लागनं जुनासुर्ल्याले....!
दोघं बी मन लावून आयकत होते.

*ईस्या* :- "पुना पुना आयकावासा वाटते बे सुन्या... येकदा पुना च्या पाजनं बे आमाले. अजतं काम-धाम सोडलं बापू तूनं आमचं. आमालेबी संमेलनातस हाहो काका असं वाटाले लागलं गा सुन्या भाऊ... ईस्या मनाला.
आन् आकरी का का झालनं का हे आयकन्यासाठी ईस्या संग पदयाची तलतल वाढली होती...

" सेवट भायबाका झाला ना बाप्पा " चला आता गावा गाना"
मस्तनं गाण्याची वरकी झाली ना.. झाडीबोली म्हणजे बोली गाण्याची खानस नाई का गा.
लई कलाकार भाऊ आपली झाडी....
सिक्सणाचे मत्व, बोलीभाषेचा वापर यावर अभ्यास कराले पाहिजे. आजकालच्या पोट्टयायनं , आपली संस्कृती जपली पाहिजे, आपल्या बोलीचं संवर्धन मंन्जे आपली उन्नती नाई का गा...?
आकरी समारोप करताना फारसं दुकत होतं गा .. कदी बी नाई सरावसा वाटनारा कारेकरम आगुटता घेवा लागला होता, थोडासा नाराज झालो. कोनालेसं हरिक वाटत नोयता. समारोपाचा कारनं थे दोन दिसं मंजे...🙏🙏🤝🤝
समारोपात बोलणारे बोलत होते ,पण त्यायले दुःख होत होता की, येवऱ्या चोखट कार्यक्रमाची आपण सांगता करत आहोत. सप्प्यायच्या चेहऱ्यावरून तसा दिसून येत होता.
समारोप आगुटता घेतला. मांडव सोडताना दुःख होतं होता,, प काय करनार मोरल्या भेटीसाठी हे करावा लागलं..... हासून - बोलून सप्पायच्या भेटी घेतल्या आना निंगालो वापस गावाकडे...
गावाकडं येता येता असा वाटे का पुना जाऊ तिच्याबईन मांडवा मंदी मुक्कामाले... वाटत होतं पलटवूव का रे गाडी नाई त् जुन्यासुरल्याले.
अरुन भाऊ ,लक्षुमन भाऊ गनेस भाऊ, रंजीत भाऊ सरपंच, आमी सप्पे साईक्त्यिक, गावातले उत्साही पोट्टे, मानसां आठवन येत होते, आना आता बी आठवन येत आहे.. आठवणीत राहील सुद्धा.

संमेलनाच्या गोस्टी माता करता करता कवा बारा वाजले समजला नाई आम्ही तीगं गुमानं चायचा घोट घेत घराकं निघालो, असा वाटत होता की आम्ही समदे साहित्य संमेलनातून घरी चाल्लो...
"आमाले काऊन नाई नेला बे जुन्यासुरल्याले...!"
ईस्या, पदया मयाव येका टायमाले खेकसले...

जय झाडी... जय झाडी... करत आलो आमी घरी वापस..

जय झाडी...🙏🙏
_______________________

या.. एक रात राऊ गावात साहित्याच्या ...
या.. दार भात खाऊ झाडीत झाडप्याच्या...

मनापासून..आवतन हाहे जी तुमाले....

मया झाडी मंदी यावं
मेवा खावाले रानटी...
मान पान उरामंदी
जइ दिसतो गावटी...
जइ बोलतो गावटी...

ह्या मया लाईनी ... कामात आल्याचं आतून समाधान वाट्ते जी...🙏🙏🤝🤝

✍️ बावण्याचा सुन्या...
बल्लारपूर , चंद्रपूरला

  • Log in or register to post comments
  • 7 views

बळीराजावरील विनोदी लेखन 
वाचा आणि आनंद घ्या
संकेतस्थळवरील विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी
 खाते बनवा आणि लॉगिन करा

प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन
21-01-2010 बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,278 4 रानमेवा 4 years 3 months
11-06-2009 पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,177 8 रानमेवा 4 years 3 months
11-06-2011 पराक्रमी असा मी 17,238 1 रानमेवा 4 years 4 months
10-11-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-२ 13,021 1 माझे गद्य लेखन 8 years
25-07-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-१ 11,491 1 माझे गद्य लेखन 8 years
15-02-2013 पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 14,382 5 नागपुरी तडका 8 years
23-03-2016 मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! 11,217 3 माझी कविता 9 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग- १ 21,838 3 माझे गद्य लेखन 10 years 4 months
14-01-2013 शेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 9,108 2 माझी मराठी गझल 12 years
24-05-2012 उद्दामपणाचा कळस - हझल 9,001 2 माझी मराठी गझल 12 years 8 months
19-05-2012 कापला रेशमाच्या सुताने गळा 32,227 1 माझी मराठी गझल 12 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग-३ 17,247 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग - २ 15,244 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
16-12-2013 'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत 4,638 0 माझी कविता
21-08-2011 राखेमधे लोळतो मी (हजल) 7,972 0 माझी मराठी गझल
15-06-2011 मग हव्या कशाला सलवारी 10,266 0 रानमेवा
19-06-2011 छातीचं झाकण बोम्लीवर आलं 11,365 0 रानमेवा
22-06-2011 मांसाहार जिंदाबाद ...!! 16,624 0 रानमेवा
18-06-2011 आंब्याच्या झाडाले वांगे 11,434 0 रानमेवा

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 3 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin
  • Rajshree
  • निलेश देवकर

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 51 *
Who's new नवीन सदस्य
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार
  • Anant
  • Abhay Dandekar
  • bade-bhaskar

Recent comments ताजे प्रतिसाद

  • मस्तच
    26 minutes 30 seconds ago
  • हार्दिक आभार
    3 hours 10 minutes ago
  • छान रचना
    9 hours 46 minutes ago
  • मन: पूर्वक आभारी 🙏🏻
    9 hours 54 minutes ago
  • छान
    10 hours 46 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - १० जुलै २०१४ 43
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 17
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 16
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 12
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 11
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 11
कापला रेशमाच्या सुताने गळा 10
किती चाटणार भारतपुत्रा? 7
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 6
अट्टाहास 6
हंबरून वासराले चाटते जवा गाय 4
४ थे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई - ३१ जानेवारी २०१८ 3
गझल 3
बाका संमेलन 3
पुस्तक समीक्षण : बळीवंश 3
कार्यक्रमपत्रिका : ११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक 2
सातबारा..... गझल 2
बैल-वीनवणी. 2
तुझ्यापायीच झाली ही दैना 2
मायीनं जगवली पिलं 2
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 218,015
माझे फेसबूक स्टेटस-1 180,987
शुभारंभ 134,915
रानमेवा - भूमिका 109,388
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,403
आजचे शेतमालाचे बाजारभाव 92,684
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,544
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 82,834
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,581
उद्देश आणि भूमिका 77,450
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 73,632
विचारपूस 71,736
गणपतीची आरती ॥३५॥ 67,754
सत्कार समारंभ : वर्धा 66,734
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,325
किती चाटणार भारतपुत्रा? 61,799
जात्यावरची गाणी 56,015
माझे फेसबूक स्टेटस - 2 49,428
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,048
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,355
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini