नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
वाट पाहुनी डोळे थकले माहित नाही ?
वळिवा ! आम्ही जीव पेरले माहित नाही ?
हिरवी स्वप्ने पेरून झाली जमिनीत या
पण जमिनीच्या पोटामधले माहित नाही
काळी ज्वारी ,बोंडअळीचा फटका बसला
फटक्याने कित्येक फिटवले माहित नाही
हमीभाव देऊच तुम्हाला असे बोलले
कसे बोलले, कधी बोलले माहित नाही
सर्व्हे झाला ,अन गरिबाला चेक मिळाला
ब्लॅंक चेक पण कसे वटवले माहित नाही
करू सातबा-याला कोरे लिहून देतो
बडबडले ते, की गडबडले ,माहित नाही
जाहिरनामे प्रसिद्ध केले नुकसानीचे
खरेखुरे की अजून कसले माहित नाही...
अजित नरेंद्र सपकाळ
सरस्वती नगर अकोट