नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
पणती जपून ठेवा !
पणती जपून ठेवा, अंधार फार झाला |
थोड़ा उजेड ठेवा, अंधार फार झाला ||
आले चहुदिशांनी तुफान विस्मृतीचे |
नाती जपून ठेवा, अंधार फार झाला ||
शिशीरातल्या हिमात हे गोठतील श्वास |
ह्रदये जपून ठेवा, अंधार फार झाला ||
वणव्यात वास्तवांच्या होईल राख त्यांची |
स्वप्ने जपून ठेवा, अंधार फार झाला ||
काळ्या ढगांत वीज आहे पुन्हा टपून |
घरटी जपून ठेवा, अंधार फार झाला ||
शोधात कस्तूरीच्या आहेत पारधी हे |
हरणे जपून ठेवा, अंधार फार झाला ||
हे वाटतील परके आपुलेच श्वास आता |
हातात हात ठेवा, अंधार फार झाला ||
ह्रदयात तेवणार्या जखमा तुम्हीच आता |
कंदील एक लावा, अंधार फार झाला ||
- हिमांशू कुळकर्णी
-------------------------------------------
(ही माझ्या अत्यंत आवडीची कविता म्हणून दिली आहे.)