नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
देवा जरा तु धाव !!
पाऊस नाही पाणी नाही, पिकाला ही ना भाव !
कर्जात बुडाला शेतकरी, अन देवा जरा तु धाव ॥धृ॥
देवा जरा तु धाव ...
आटले पाणी पाटामधले, आटेना, डोळ्यामधली धार,
विळखा कर्जाचा तो बसता, मनाशी, दुःख दाटले फार !
आस संपल्या मनात त्याच्या, देवा, वसव तृप्तीचा गाव
कर्जात बुडाला शेतकरी, अन देवा जरा तु धाव ॥ 1॥
देवा जरा तु धाव ...
काळजी घेई निसर्गाची तो, जरी, निसर्ग करी संहार,
पूजतो सृष्टीला या तरी तो, तिथे, मानून आपली हार
ऋणथकीताच्या मनास वेदना, देवा , भर तु त्याचे घाव
कर्जात बुडाला शेतकरी, अन देवा जरा तु धाव ॥ 2॥
देवा जरा तु धाव ...
अवलंबून ती लहरी शेती, कोरडे ढग अन कोरडी माती!
राब राबुनी घाम गाळून ही, पीक मिळते ना रिकाम्या हाती !
हात जोडतो तुला विनवतो, देवा, शेतकऱ्या तु पाव !
कर्जात बुडाला शेतकरी, अन देवा जरा तु धाव ॥ 3॥
देवा जरा तु धाव ...
पाऊस नाही पाणी नाही, पिकाला ही ना भाव !
कर्जात बुडाला शेतकरी, अन देवा जरा तु धाव !!धृ !!
देवा जरा तु धाव ...
© श्री. राहुल दत्तात्रय राजोपाध्ये
1073, नरसोबा गल्ली, तासगाव
ता. तासगाव जि. सांगली
9130215836
rdrajopadhye@gmail.com
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!