![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
ललितलेख ; होता सोन्याचा संसार
तेही एक सर्वसामान्य कुटूंब, वाडी वस्तीतल्या परी आस्तित्वसाठी धडपडणार, सरकारन बेदखल घेतलेल, निसर्गाच्या कोपात शापित जीवन जगणार, सावकाराच्या जाचाला हुंदके देत सोनियाच्या दिनाच्या आशा बघणार.
कुटुंबात भाऊराव बायको सविता दोन पोरी अन एक मुलगा, घरात आठराविशव दारिद्रय पण चार घास सुखाच खाणार अन् चेहऱ्यावर समाधान असणार. लेकरांच्या शाळेचं दप्तर मंजी पिशवी अन् कपड्याला ठिगळ, आलटुन पालटून वर्ग बदलावे तशे पोरीचे कपडे धाकटीचे मध्वीला. वयात आलेल्या धाकटी सुमीच्या लग्नाची चिंता भाऊराव अन् सविताला लागून राहिली होती, त्यात सवकराच अन् बँकाच कर्जचा बोजा डोक्यावर होता. दर वर्षी हंगामाच्या दिसात दांडी मारणारा पाऊस कसतरी सलगणीस १०-१५ हजार पदरात पडत, कुणाचातरी शेतात जाऊन मिळालं ते काम करायचं अन् उदरनिर्वाह भगवयचा, हे वर्षानुवर्ष चालत आला. सुमी ला ४ एकर शेती आसलेल सोयरिक आली पर हुंडा लई मागून राह्यले, ३५ हजार च्या खाली १ रुपात घेणार नाही सांगू राह्यले. भाऊराव अन् सविताला हातचं स्थळ जाऊ देऊ न वाटायला, भाऊरावांनी ठरवलं काईबी करायचं पण ह्या सली लगीन झालं पाहिजे. पैशाची जुळवाजुळव चालू झाली नातेवाईकाकडे, शेजारी शिवरातल्या लोकाकड पर कुणीही द्याला पैशे झिजयाना, दुष्काळ परिस्थिती आर्थिक विवंचनेत साऱ्यांचेच शेतीचे हाल बेहाल, कुनिबी प्पाईका द्याला तयार होत नाय. आधीच्याच कर्ज उरावर अस्तानी पुणा बँका आन सावकाराच्या दारावर डोक आपटायची येळ. बँकांनी नाकारलं अन् सावकरान जमीन घान ठेवत दिलं कर्ज जाचक अटींवर. आलेल्या चार दोन पव्हण्या रव्हल्यांची सोय उठ बैसं पोरीच्या संसाराला घरपण देऊन झल लगीन. लग्नाचा मांडव दारातून उठतो ना उठतो तवर च सवकर्याचा पैशा पाई तगादा सुरू, पोरगी गेली तशी घरची लक्ष्मी गेली म्हणा, घराला ग्रहण लागलं. अन् रातीतच भाऊरावांनी कर्जपाई जिवाचं चांदण केल.
गणेश गंगाधर वरपे ( मु.पो. तालखेड ता. माजलगाव जी. बीड ) ७३८५८५१६५०
प्रतिक्रिया
ललितलेख
ललितलेख
Ganesh
ललितलेख
ललितलेख
Ganesh
संसार सुखाचा'च असो पण त्याला
संसार सुखाचा'च असो पण त्याला चांदन न लागो.
हो भाऊ... बळीराजा च राज्य
हो भाऊ... बळीराजा च राज्य यावे हीच आई तुळजभवानीच्या चरणी प्रर्थना
Ganesh
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!


शेतकरी तितुका एक एक!
मनःपुर्वक धन्यवाद गंगाधर मुटे
मनःपुर्वक धन्यवाद गंगाधर मुटे सर
Ganesh
स्पर्धाविजेती प्रवेशिका.
स्पर्धाविजेती प्रवेशिका. अभिनंदन....!

शेतकरी तितुका एक एक!
पाने