![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
*राबून राबून*
राबून राबून आता
विझल्या आशेच्या वाती
सालभर कष्ठ केले
काय घंटा आलं हाती
सोलून झाडाची साल
जखमेवरती बांधली
खुट्यावर बैलं मेले
कोणाची माय जंदली ?
एकामेकावर साले
टपुन हाय आपण
शेतकऱ्याची ना एकी
म्हणतो मान कापण
दुष्काळाची भिती
कशी करावी पेरणी
हाता तोंडाले ये पिक
लागे जीवाला झुरणी
सालमान सरकार
आपला वाजवी डंका
तुमी कितीही पिकवा
आपला उपाशी पंखा
पिकवून जगण्याचा
झाला हरसाली तोटा
कास्तकाराच्या नशीबी
याही साली भोगवटा.
- आशिष वरघणे
रा.सिरूड त. हिंगणघाट जि. वर्धा
मो. ९६३७८१३५०६
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
![Congrats](http://www.baliraja.com/sites/all/modules/smiley/packs/Shiva/congrats.gif)
![Congrats](http://www.baliraja.com/sites/all/modules/smiley/packs/Shiva/congrats.gif)
शेतकरी तितुका एक एक!
छान
छान
पाने