Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

नागपुरी तडका

      “नागपुरी तडका” हा एक नवीन काव्यप्रकार आहे. नागपूर आणि आसपासच्या काही जिल्ह्यांत जी मराठी भाषा बोलली जाते ती भाषा आणि भाषेचा लहजा, वऱ्हाडी किंवा झाडी बोलीभाषेपेक्षा पूर्णत: भिन्न आहे. त्यामुळे या बोलीभाषेतील रचनेला मी “नागपुरी तडका” असे स्वतंत्र नांव दिले आहे. पण या प्रकारात मी पूर्णत: निर्भेळ नागपुरी भाषेचा वापर करीत नाही. फ़क्त लहजा आणि काही वैशिष्ट्यपूर्ण शब्द यांचाच सीमित वापर करतोय. या काव्यप्रकाराचा आशय व उद्देश, न रुचणाऱ्या रूढी-परंपरा-चालीरीती, न रुचणारी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय धोरणे यांचेवर टीकाटिप्पणीसह घणाघाती घाव घालणे हा उद्देश असल्याने या प्रकारास मी जाणीवपूर्वक “नागपुरी तडका” असे नांव दिले आहे. या पद्यलेखनामध्ये मी “अभय” हे टोपणनाव/उपनांव, तखल्लुस/मक्ता म्हणून वापरले आहे.

आशा आहे की, वाचकांना हा काव्यप्रकार आणि कविता नक्की आवडतील.

पाने

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




नागपुरी तडका - ई पुस्तक

प्रकाशकाचे दोन शब्द

          मराठी अमृताहून गोड भाषा. पण तिच्या ग्रामीण बोलींना जो गोडवा, तजेला आणि मसालेदार झणझणीत तडका आहे तो पुस्तकी शहरी मराठीत नाही. कोकणची खुमासदार मालवणी घ्या किंवा कोपरखळ्या मारणारी अहमदनगरची नगरी , सणसणीत गोळीबंद आगरी किंवा मिठ्ठास खानदेशातली अहिराणी. गांवोगांवच्या या भाषांची मज्जाच न्यारी. अगदी ज्वारीच्या भाकरीबरोबर तांबड्या रश्शासारखी. ज्यांनी अशा भाषांतून व्यवहार केला नाही ते कमनशीबीच. या भाषा म्हणजे अस्सल संस्कृतीची खाण आहे. त्यामुळे आज वऱ्हाडी भाषेतल्या या कवितांची मेजवानी तुमच्यासमोर आणताना आम्हाला प्रचंड आनंद होत आहे. 

           पण गंगाधर मुटे यांच्या नागपुरी तडक्यात केवळ भाषेचा फ़ुलबाग नाही. काळजाची आग आहे. उपाशी शेतकऱ्याच्या पोटात खवळणाऱ्या अॅसिडमधल्या या कविता आहेत. विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या अत्महत्यांवर अश्रू गाळणारं भरपूर लिखाण आजवर झालंय. “बिचारा शेतकरी” असंच विदर्भातल्या शेतकऱ्याचं वर्णन इतर लेखक कवी करतात. मनापासून त्यांना त्याच्या दुःखाची संवेदना जाणवते यात वाद नाही. पण गंगाधर मुटेंच्या कवितेत हाच शेतकरी हात पसरून नाही तर मुठी वळून येतो. वाकून नाही तर ताठ मानेने येतो. गुंडा नोयता तरीबी पन, गुंड्यावानी वागतो. त्यांची जनता बिचारी नाही तर विचारी आहे. आणि ती अविचारी होण्यापुर्वी पिळणाऱ्यानी आणि गिळणाऱ्यानी सावध व्हावे असा इशारा ती घेऊन येते. त्यांचा शेतकरी “खादीचं धोतर सोडून, मांजरपाठ घालणाऱ्या” पुढाऱ्यांना खणखणीत दणके घालणारा आहे. 

                          गंगाधरजींच्या कविता मरगळलेल्या शेतकऱ्याला स्फ़ूर्ती देणाऱ्या आहेत. या कविता केवळ आरामखुर्चीतलं वाचन नाहीत. भविष्यकाळाला घडवण्याची ताकद असलेल्या जनसंमर्दाला झोपेतून जागं करणाऱ्या आहेत. आपल्याला त्या नक्की आवडतील.

- ई साहित्य प्रतिष्ठान, ठाणे (ई-बूक प्रकाशक)
 

=^=0=^=0=^=0=^=
PDF स्वरुपातील पुस्तक वाचण्याकरिता येथे क्लिक करा.
=^=0=^=0=^=0=^=

Share

प्रतिक्रिया

  • ANIL SHEDGE's picture
    ANIL SHEDGE (-)
    रवी, 24/02/2013 - 14:22. वाजता प्रकाशित केले.

    NAMASTE,
    TUMCHA NAGPURI TADAKA HA KAVYASANGRAH KHUP AAVADALA. YA PUDHEHI ASHYACH
    NAGPURI KAVITA LIHIT RAHA. SHUBHECHHYA.

    ANIL SHEDGE,
    BOISAR, THANE.

  • शहाजी जाधव's picture
    शहाजी जाधव (-)
    रवी, 24/02/2013 - 14:35. वाजता प्रकाशित केले.

    Shahaji Jadhao

  • सुरेश घोती's picture
    सुरेश घोती (-)
    सोम, 25/02/2013 - 14:47. वाजता प्रकाशित केले.

    Suresh Ghoti

  • ब्रिगेडीयर प्रसाद जोशी's picture
    ब्रिगेडीयर प्रस... (-)
    सोम, 25/02/2013 - 14:52. वाजता प्रकाशित केले.

    Dear Mr. Gangadhar Mute,

    Read your poems. You have depicted true picture of incidents & life around all of us
    in a very simple but most effective & appealing words.
    KAVITA BHAWALYA !!!

    Thanks & best Regards,
    Brigadier Prasad Joshi
    Pune.

  • Bhaskar Hindurao's picture
    Bhaskar Hindurao (-)
    सोम, 25/02/2013 - 15:03. वाजता प्रकाशित केले.

    Sir,

    Tumacha Nagpuri tadka ha kavita snagrah vachtana khup maja ali, kharokhar vastavik jivan tumhi chan shabda shailit mandale ahet tya mule vachtana bhan harpun vachta vachat ha kavita sangrah kadhi sampun jato te kala sudha nahi tari parat ekda dhanayavad.
    (तुमचा नागपुरी तडका हा कविता संग्रह वाचताना खूप मजा आली. खरोखर वास्तविक जीवन तुम्ही छान शब्दशैलीत मांडले आहेत. त्यामुळे वाचताना भान हरपून वाचता वाचता हा संग्रह कधी संपून जातो ते कळत सुद्धा नाही.परत एकदा धन्यवाद)

    Apla
    Bhaskar Hindurao

  • V.M.TAKALKAR's picture
    V.M.TAKALKAR (-)
    सोम, 25/02/2013 - 15:12. वाजता प्रकाशित केले.

    Dear Sir,

    We have read your book `Nagpuri Tadaka”

    Very best. Don’t stop writing. Please go ahead.

    Thanks

    VM TAKALKAR
    Aurangabad.

  • Umesh Patil's picture
    Umesh Patil (-)
    सोम, 25/02/2013 - 15:30. वाजता प्रकाशित केले.

    नमस्कार,

    तुमच्या कविता वाचल्या, खरंच खूप छान होत्या, आहेत काळजात घुसणार्‍या, आणि शासनकर्त्यांना चाबकाने फटकून काढणार्‍या.

    लिहित रहा, त्यासाठी शुभेच्छा.

    कळावे,

    उमेश पाटील

  • Vaibhav Khandekar's picture
    Vaibhav Khandekar (-)
    बुध, 27/02/2013 - 15:33. वाजता प्रकाशित केले.

    Shri, Gangadhar Muthe

    Shubha prabhat,

    Aaj mazi shubha prabhat tumchya kavitani zali. Khupch arthyukta ani vachakala khilvun thevnarya kavita watlya. 24 pages kadhi vachun sample kalalach nahi, ervi mi kavita vachayla jara magech asto pan khupach aavadlya saglyach kavita.
    Best of luck tumchya pudhchya kavitan sathi. Asech chan chan ani arthyukta kavita lihat raha.

    Regards,
    Vaibhav Khandekar

  • Shamsundar S Bahekar's picture
    Shamsundar S Bahekar (-)
    सोम, 25/02/2013 - 15:36. वाजता प्रकाशित केले.

    Adarniy Prakashak ani Lekhak,

    Me Vidrbhatla Akolyacha ..

    Aaj kvita vachun gharachi ani gavachi athavan zali..

    Kavita farach apratim ahet..

    Hrudhysta shubhechaa..

    Jay Shreeram..

    Shamsundar S Bahekar

  • Rajendra Puranik's picture
    Rajendra Puranik (-)
    सोम, 25/02/2013 - 15:39. वाजता प्रकाशित केले.

    Dear sir,

    Nice book , it’s really the reflection of current situation . while reading the poems it feels that we talk with our hearts and the closest friends. Pl keep it up.

    With Regards
    Rajendra Puranik

  • milind gore's picture
    milind gore (-)
    सोम, 25/02/2013 - 15:41. वाजता प्रकाशित केले.

    Dear Gangadhar Sir,

    I was really happy to read your Nagpuri Tadakaa it's very hart touching sir.

    Thanks Again sir. very nice

    And also I am sending this Nagpuri Tadakaa to all my friend's and office people I am from Mumbai only my office head office is in Nagpur they will be really happy after read your all kavita.

  • Tushar S Joshi's picture
    Tushar S Joshi (-)
    सोम, 25/02/2013 - 15:44. वाजता प्रकाशित केले.

    Namaskar Saheba,

    I have just read your Kavita today, You all the kavita are great. The Nagpuri style of kavita are great just great. Kindly keep writing and please send them to me.

  • रवी नाटेकर's picture
    रवी नाटेकर (-)
    सोम, 25/02/2013 - 15:46. वाजता प्रकाशित केले.

    प्रिय
    गंगाधर मुटे,

    तुमचा नागपुरी तडका आवडला, खूप भावला. मस्त ठसका लागला. नागपुरी तिखटजाळ, सावजी मसाला खाल्यागत झाले.
    मला ह्या कविता शेतकऱ्याच्या नव्हे तर ग्रामीण सुशिक्षित शेतकरी युवकाच्या वाटल्या. जो गावाशी नाळ जोडून आहे आणि तो आजच्या सामाजिक, राजकीय प्रवाहाशी दोन हात करण्यासाठी तयार आहे. प्रवाहासोबत पोहण्यासाठी सगळेच तयार असतात पण हा नवयुवक प्रवाहालाच आपल्यासोबत येण्यासाठी मजबूर करू शकतो आहे. समाजातील दाम्भिकपणा ओळखून त्यावर प्रहार करण्यासाठी तयार असलेला हा नवयुवक (नवसमाज) दैवावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःवर अवलंबून आहे. ह्या समाजाला ज्या गोष्टी खुपतात, आवडत नाही त्या तो बिनधास्त होऊन मांडतो आहे.‘ ठेवले तैसेची अनंते रहावे ’ असे मान्य करण्यापेक्षा मी माझा म्हणणारा हा युवक मला आवडतो. पण हि ठसठस अशीच कायम रहावी हि इच्छा.
    देस उबल रहा हे हि स्लोगन असलेली टाटा चहाची जाहिरात मला आवडते. देशात चाललेल्या अनेक वाईट गोष्टी, भ्रष्ट्राचार, लाचारी, संधिसाधू नेते असा जणू पापांचा घडा भरलेला आहे. विस्फोट होऊ घातलेला आहे. अमृत मंथन होऊन नक्कीच काहीतरी चांगले निघेल असे वाटत आहे. असे सुचवणारी हि जाहिरात. तुमच्या वेदना, हतबलता, वैताग यांची नाळ उद्याच्या अशाच आशावादाशी जुळावी. अशीच सदिच्छा

    तुमचा कविताप्रेमी
    रवी नाटेकर

  • Gorakh Maske's picture
    Gorakh Maske (-)
    सोम, 25/02/2013 - 15:49. वाजता प्रकाशित केले.

    Thank you Mute Saheb,

    Nagpuri Tadka khupach chaan aahe.
    Tumche aabhar manayala majykade shabdh nahit.
    Jan- samanychya dukhala tumhi vacha fodli aahe.
    Hi aag vizu deu naka. Tumchya lekhnichi dhar bothat hou deu naka.
    Aaplya vatchalis hardik shubhecha

  • शशिकांत पानट's picture
    शशिकांत पानट (-)
    सोम, 25/02/2013 - 15:50. वाजता प्रकाशित केले.

    श्री. गंगाधर मुटे
    सप्रेम नमस्कार:

    इ-साहित्य प्रतिष्ठानने आपला नागपुरी तडका पाठ्यविला. तो खुपच भावला त्यामुळे आपले कौतुकमिश्रीत अभिनंदन करण्यासाठी ही ईमैल लिहित आहे.
    मी स्वत खानदेशांत जन्मलो आणि वाढलो. त्यामुळे अहिराणी भाषेचे प्रेम अमेरिकेत गेली ४० वर्षे राहुनही संपलेले नाही विदर्भातल्या आपल्या अंत:करणापासुन आलेल्या ह्या कविता अहिराणीशी कुठेतरी नाते सांगुन गेल्या. असं म्हणतात की सुख ओळखीचे नसले तरी दु:ख्ख मात्र नेहमीच ओळखीचे असते. त्यामुळे लहानशा खेड्यांत राहुन जो कांही स्वार्थत्याग करायला लागलेला आहे त्याची आंत कुठेतरी जाणीव आहे.
    आपण असेच लिहित राहा. छान लिहिता. साहित्याची निर्मिती ही समाजाची गरज आहे आपापल्या परीने समाजाचे हे देणे आपण देवू या.
    आपल्या पूढील साहित्यसेवेसाठी शुभेच्छा!

    शशिकांत पानट
    लास एंजेलिस

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 27/02/2013 - 16:54. वाजता प्रकाशित केले.

    अभिप्रायाबद्दल सर्वांचा आभारी आहे.
    असाच लोभ असू द्यावा. Smile

    शेतकरी तितुका एक एक!

  • वंदना धर्माधिकारी 's picture
    वंदना धर्माधिकारी (-)
    सोम, 25/02/2013 - 02:13. वाजता प्रकाशित केले.

    नमस्कार,

    "नागपुरी तडका" ... यातील कविता वाचल्या. आवडल्या, खूपच छान आहेत.
    त्यातील जोश, अन्यायाची चीड, चमचेगिरिची चेष्टा, राजकारण्यांवरील रोष..
    असे सारे अत्यंत तिडीक येईल या त्वेषाने, स्पष्ट , परखड शब्दात मांडले आहे.
    सगळ्याचा कविता अन्यायाविरुद्द समाजाला जागे करणाऱ्या, ओरडून सांगणार्‍या आहेत.
    आज मरगळ झटकून टाकायला हवी, पेटून सर्वांनी उठायला हवे हा निरोप कवितांमधून दिला आहे.....
    सुंदर.
    धन्यवाद,

    वंदना धर्माधिकारी

  • Vinayak Vaidya's picture
    Vinayak Vaidya (-)
    शुक्र, 01/03/2013 - 12:04. वाजता प्रकाशित केले.

    कविता खूपच भावल्या. नुकताच अकोला भागात गेलो होतो तेव्हा कानावर थोडीफार वैदर्भीय बोली पडली ती आवडली होती.
    आणि दोन दिवसांनी एका मित्राने आपल्या कवितांशी परिचय करून दिला. तुमच्या कवितेत जीवनातल्या उन्हाच्या "झावा" आहेत, त्या मनाला खूप भावतात.

  • Kiran Bhavsar's picture
    Kiran Bhavsar (-)
    शुक्र, 01/03/2013 - 14:53. वाजता प्रकाशित केले.

    Khup cchan tadka dila ahe! agadi zanzanit!

    Khup khup shubheccha!

    - Kiran Bhavsar

  • A.B.Karyekar's picture
    A.B.Karyekar (-)
    शुक्र, 01/03/2013 - 15:18. वाजता प्रकाशित केले.

    Respected Sir,

    Your book is excellent & touching.

    Regards,

    A.B.Karyekar

  •  Nilesh Kulkarni's picture
    Nilesh Kulkarni (-)
    शुक्र, 01/03/2013 - 15:22. वाजता प्रकाशित केले.

    Dear Sir,

    Mastach ahet tumchya kavita!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

    Great!!!!!!

    Regards,

    Nilesh Kulkarni

  • अनिल पाटील's picture
    अनिल पाटील (-)
    शुक्र, 01/03/2013 - 17:03. वाजता प्रकाशित केले.

    Kaviraj Mute Saheb,

    Saglya kavita lai bhari, phar avadlya.
    Tumhi talmalini lihilya,
    Aamhi chavine vachlya
    Wish you all the very best.

    Regards
    Anil patil

  • Vinod Palande's picture
    Vinod Palande (-)
    शुक्र, 01/03/2013 - 22:00. वाजता प्रकाशित केले.

    Tumchya KAVITA farach utkrust ahet.

    Vachun khup anand devun gelya.

    Tumche abhinandan aso.

  • Jagdish sable's picture
    Jagdish sable (-)
    शुक्र, 08/03/2013 - 13:49. वाजता प्रकाशित केले.

    Dear Sir,

    I had gone through your "Nagpuri Tadka" its really very good. one of the best is "aambyachya jhadale vange"
    i really enjoy the book & the massage you want to spread along with...

    Thanks for the same.

  • Deshpande Bhushan's picture
    Deshpande Bhushan (-)
    शुक्र, 08/03/2013 - 13:58. वाजता प्रकाशित केले.

    Dear Shri Gangadharji,
    Read u r book “Nagpuri Tadka” in 2 sittings.
    Most of the poems likes very much.

    Thanks a Lot & Keep writing.

  • ashish arvind medhi's picture
    ashish arvind medhi (-)
    शुक्र, 08/03/2013 - 14:02. वाजता प्रकाशित केले.

    अप्रतिम कविता.

    Regards,
    Ashish

  • धुंद रवी 's picture
    धुंद रवी (-)
    शुक्र, 08/03/2013 - 15:46. वाजता प्रकाशित केले.

    Khup Khup kautuk
    aani Manapasun Abhnandan. Smile

  • RAJENDRA SATOKAR's picture
    RAJENDRA SATOKAR (-)
    शुक्र, 22/03/2013 - 20:10. वाजता प्रकाशित केले.

    Nagpuri Tadkyachya saglya kavita aawdlya..
    Pudhil Kavita Sangrahasathi khup-khup subhecchha.

  • Sunil Ghadge's picture
    Sunil Ghadge (-)
    शुक्र, 22/03/2013 - 20:13. वाजता प्रकाशित केले.

    Shri Gangadhar Saheb,

    Nagpuri tadka Kavita vachali……..
    Apli kavita vachlyanantar mala majhe vidarbhache divas athavle.............

    Kanavar parat te soneri varhadi shabd padlyavar kasa aplyatla kunitari aplyachi bolat ahe ashi janiv zali..........
    Far changli kavita karta tumhi...........asech navnavin kavya-rachana karun swatahachya gavacha ani maharashtra cha nav motha karal yachi khatri ahe..........

    Regards

    Sunil Ghadge

  • संपादक's picture
    संपादक
    शुक्र, 21/08/2015 - 15:33. वाजता प्रकाशित केले.

    टाहो शासकांच्या कानापर्यंत पोहोचेल

    मुटे सर,
    नमस्ते..!

    आपला नागपुरी ठसका वाचला.समिक्षकांसारख्या जड जड शब्दात प्रतिक्रिया लिहणे मला काही जमणार नाही कारण मी समीक्षक नाही.
    एक वाचक म्हणून जे वाटले ते लिहतोय!
    काव्यसंग्रह वाचताना ओठातले हसू शेवटपर्यंत कायम होते.ग्रामीण ढंगातल्या या रचना वरुन वरुन जरी विनोदी वाटल्या तरी सुकलेल्या खपलीखाली ज्याप्रमाणे जखम ताजीच असते त्याप्रमाणे या विनोदी कवितांच्या आड माय बाप जनतेचे सारे दु:ख ठसठसून भरले आहे. हसऱ्या ओठाआडून व्यवस्थेविरोधात फोडलेला आर्त टाहो आहे!
    हा आर्त टाहो शासकांच्या कानापर्यंत पोहोचेल आणि त्यांना घाम फुटेल असा विश्वास बाळगायला हरकत नसावी!
    आपल्या साहित्यप्रवासास मन:पूर्वक शुभेच्छा!

    - अनिल सा. राऊत

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    सोम, 17/12/2018 - 15:32. वाजता प्रकाशित केले.

    "नागपुरी तडका" काव्यसंग्रहाला उत्कृष्ट साहित्य निर्मिती चंद्रभागा काव्य पुरस्कार जाहीर.

    डाॅ संजीवनी तडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली वडीगोद्री ता. अंबड जि. जालना येथे दि. २९ डिसेंबर २०१८ रोजी दुपारी १ वा. पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत आहे.

    राष्ट्रसंत सेवाभावी संस्थेचे श्री संदीप मोकळे यांना मनःपूर्वक धन्यवाद!..

    शेतकरी तितुका एक एक!

  • RANGNATH TALWATKAR's picture
    RANGNATH TALWATKAR
    मंगळ, 18/12/2018 - 17:24. वाजता प्रकाशित केले.

    खुप सुंदर ,सरजी

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 10/02/2024 - 20:24. वाजता प्रकाशित केले.

     सर्वांचे मनःपूर्वक आभार 

    शेतकरी तितुका एक एक!

  • पाने