नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
गुलाब आवडतो मला .मलाच का सर्वांनाच आवडतो .आपण कितीही दुखी असो, गुलाबाला पाहिलं कि लगेच आनंदित होतो.
गुलाबाला पाहून कित्येकजण आप-आपली दुखे विसरतात .काही हुरळून जातात .त्याला मिळवण्यासाठी धडपडतात .काही जन अगदी धावत-पळत त्याच्याजवळ जातात .पण.......
गुलाबाच्या जवळ जातात आणि त्याच्या काट्यांना पाहून थांबतात. आपण ज्या गुलाबाला मिळवायला आलो तो किती काट्यांवर उभा आहे. आपण जर त्याला तोडायला गेलो तर त्याचे काटे आपल्याला टोचतील. उगाच कश्याला जाऊदेत लांबूनच पाहू आणि निघून जाऊ .पण ........
गुलाब सर्वाना आनंद देणारा स्वतः इतकं दुख कस सहन करतो. किती काट्यांवर उभा राहून हा कसा काय हसतो आणि आम्हालाही हसवतो. आणि पहा ना पानांच्या आडाला आपले काटे लपवतोय. अरे वाऱ्याची झुळूक येताच त्याला काटे टोचून वेदना देतात. पण .........
गुलाब आपले दुख बाजूला ठेऊन इतरांना आनंद देतो. मग आपण इतके स्वार्थी आहोत काय ? आपल्यालाही त्याला काट्यातून बाहेर काढून त्याच दुख कमी केल पाहिजे. त्यासाठी मला त्याचे काटे टोचले तरी चालेल, माजे हात रक्त बंबाळ झाले तरी चालेल. पण.........
असा एखादाच असतो जो दुसर्या चा इतका विचार करतो. नाहीतरी आज-काल इतका वेळ आणि अंतरमनाची जागरुकता आहे कुणाकडे? पण असा एखादाच असतो जो फक्त दुसरर्याचं दुख कमी करण्याचा प्रयत्न करून आनंद देतो. गुलाबाला सगळेच पाहतात पण .....
असंख्य काट्यांवर उभ्या सुंदर, नाजूक, हसऱ्या गुलाबाला अलगद काट्यांपासून आपल्या ओंजळीत घेऊन माया, प्रेम, आनंद देणारा असा एखादाच असतो, माणूस म्हणून जगणारा आणि इतरांना जीवन जगायला शिकवणारा असा एखादाच असतो .
- मालुबाई.
प्रतिक्रिया
छान.
छान.
शेतकरी तितुका एक एक!
पाने