नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
(मतला)
काहीच योग नाही जुळणार आज आहे.
माणूस माणसाला तुटणार आज आहे.
(हुस्नेमतला)
गावात राजनेते सुटणार आज आहे.
सावध रहा मुकद्दर फुटणार आज आहे.
(१ ला शेर)
खुपसून दात अपुल्या विषजन्य भाषणांचे,
जनतेस भाबड्या ते डसणार आज आहे.
(अंतिम शेर)
कैवार शेत्कऱ्यांचा घेऊन फक्त तोंडी,
गठ्ठा मते तयांची लुटणार आज आहे.
(मक़ता)
'रविपाल' का रडावे लाचार भारतावर?
मी छान लोकशाही हसणार आज आहे!
°°°
वृत्त: आनंदकन
प्रतिक्रिया
सुंदर सर जी
हुस्ने मतला क्या बात है
R.A.Burbure
धन्यवाद
धन्यवाद रमेश!
Dr. Ravipal Bharshankar