Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***बळिराजा

लेखनप्रकार: 
गद्यलेखनस्पर्धा-२०१४
लेखनविभाग: 
कथा

बळिराजा
नेमकेच उन्हाळ्याचे दिवस संपले आणि आता पावसाळा चालू होणार होता. जिकडे तिकडे शेतातील कामासाठीची धामधूम चालू होती. गावातील लहान मोठे शेतकरी आपआपल्या शेतीची मशागत करायला लागले होते. अश्यातच एक छोटा शेतकरी रामराव "आवं पारे तुले माहित झालं काय व आव त्या श्यामरावण त्याच्या मईच्या वावरात निंबाच्या झाडले फाशी घेतली "........ परी घाबरून......."आव काय सांगताय काय, रामाच्या पायरी आन कामून असं केलं व त्यायन " ............ " अवं, सरकारी कर्ज आन गावातीलय बुचुबुचू कर्ज. आन त्यातच पोरगी पण आली ल्ग्नाले आल असीन लेकले टेन्शन ".............पारी हळहळव्यक्त करीत " सांग व आता कसं होईन बिच्यार्यायचं ".......... पारी आपल्या नवर्याकडे कटाक्ष टाकून बघते तेच रामराव तिले म्हणते " तू अशी कामून पयत व माया इकडे "............ पारी आपल्या नवर्याला समजावत " मी काय म्हणते पुढच्या वर्षी उरकून टाकू बालीच लग्न ते सरू सांगत होती कि दर्यापूरला एक पोरगा हाये त्यच्या घरी दोन एकर वावर पण हाये "......... रामराव मधेच बोलतो....... " हो करुन टाकू, पुळच्या वर्षले पण आता आपल्या जवळ जे बकरी आन एक पाठ हाये ते मी इक्याले नेतो सकाय दर्यापूरच्या बजारात आन जे पैशे येतीन त्या पैश्याने बी बेन आणतो आन मग आपण वावर पेरून जे पिक यईन ते पैशे आपुन बालीच्या लाग्नाले ठेऊ. बर जाऊ दे मले सकाय सकाउनच उठवजो, मी जाईन बजारात ".............. पारू " हो हो "..........!!!
पारू सकाळीच उठते आणि आपल्या नवर-याची शिदोरी बांधून मग आपल्या नवर्याला उठवते . रामराव झोपितून उठून तयार होते चहा पिऊन झाल्यावर आपली एक बकरी आणि पाठ (बकरीच पिल्लू) घेऊन सकावूनच पाच वाजता बाजाराच्या रस्त्याने जाते. बाजार 15 किलोमीटर असल्या मुळे त्याला सकाळीच निघावे लागते. कसाबसा तो 7 वाजता बाजारात पोहचतो आणि आपल्या बक-या घेऊन उभा राहतो दलाल लोकांची वाट बघत बसतो. दलाल लोक येतात भाव करतात आणि निघून जातात. दलाल लोक पण त्याची मजा घेतात. बाजारात खूप घासाघीशी केल्या नंतर तो आपल्या बक-या एका दलाला विकतो आणि थेट बियान्याच्याच दुकानात जाऊन बसतो. आणि आपल्या चार एकराला पुरेल एवढे कपाशीचे बियाणे घेतो. आणि थोडे फार खत व पोरले भात्क बीत्क घेवून घरी येतो.
दुस-या दिवशी पारी आणि रामराव आपल्या शेतात जातात आणि शेवटची मश्यागत करतात.आता पावसाला चांगली सुरुवात होते गावातील लोक आपआपले बैल आणि तीफानी घेऊन शेत पेरतात. पण रामराव जवळ ना बैल ना तिफण काय करील बिचारा, तो आपले शेत पेरण्या साठी गावातील लोकांच्या खुप मिनतवा-या करतो पण त्याचे काम कुणीही करीत नाही. कारण आपापले शेत पेराचीच सुचते सर्वाना. अश्यातच 5 दिवस निघून जातात . तेव्हा कुठे त्याला एक बैलजोडी मिळते व तो आपले शेत पेरून घेतो.
शेत पेरून झ्याल्यावर दोन चार दिवस चांगला पूस होतो रामराव व त्याची पत्नी पेरणी व्यावस्तीत झ्याली म्हणून खूप खुश असतात रामराव वेळ मिळेल तेव्हा आपल्या शेतावर जातो आणि आपले पीक पाणी पाहत रहातो तो लैच खुष असतो पण अश्यातच लवकरच त्याच्या खुशिला विरजण लागतो .
आता पाऊस पूर्णपणे थांबून जातो पंधरा दिवस होवून जातात पण पाण्याचा एकही थेंब पडत नाही. गावा मधील लोक पाउस आला पाहिजे म्हणून देवा कडे साकडे घालतात . गाव जेवण सुद्धा देतात पण पाण्याचा ये थेंबही पडत नाही. पूर्ण गाव काळजीत पडले. त्यातच रामराव सुद्धा काळजीत पडते. आश्यातच एक दिवस रामराव आपल्या शेतातून संध्याकाळी घरी येतो आणि डोक्याला हात लाऊन बसतो घरात विचार करीत. एवढ्यात पारू दुसर्याच्या शेतातून काम करून घरी येते आणि आपल्या नवर्याला म्हणते .............." आव कामून डोक्ष्याले हात लावून बसले संद्याकाय च्या पायरी बुवा-या सारखे '...............रामराव " आव परे आताच वावरातून आलो पारटी पुरी सुकली पारे या वर्षी काई खंर नाही आपलं'............." आव मी काय म्हणते येईनच ना कुठी जैन ते "................ एवढ्यात पारी आपल्या मुलीला चहा ठेवायला सांगे. आव बाले चहा ठेव आमच्या साठी "............" आव येईंत खंर पण कई सांर पिक मसणात गेल्यावर मग काय कामच लेकाच कितीकय आलं त "...................."आव ज्यानं पोट देलं तो दानाबी देईनच ना ".............. " सासायाचा असा इचार केला होता कि या वर्षी पाणी पाउस बरा होईन कापसाच पिक पन चांगले होईन चांगला गाठीले पैसा पण येईन आन मग उरकून टाकू बालीच लग्न पण आत मले नाई वाटत कि हा येईन म्हणून "..................पारू नाराजीत "कुठी अळून बसला रे बापराज्या येणा राज्या लवकर कामून अशी गरीबाची परीक्षा घेत राज्या "................. तेवढ्यात बाली चहा घेवून येते दोघेही चहा पितात पारू स्वयंपाकाला लागते आन रामराव बाहेत लीलांमध्ये बसायला जाते .
खेड्यात संध्याकाळी शेतातून लोक घरी आल्यावर आपल्या रोजच्या घडलेल्या गोष्टी करण्या साठी आपाआपल्या पारावर बसतात . कोणी काय म्हणतो कोणी काय म्हणतो . एकजण ' अहो आबा मी आताच टीव्ही पावून आलो त्यात ते बाई सांगत होती की, आता पाणीच येणार नाई . दुबार पेर्णी करून काहीच फायदा नाही .सायाचे लायेच पापी लोक झाले आता कसे काय पानी येईन. जा मरा सायाचेहो"........... इकडच्या तीकडच्या गोष्टी झाल्यावर रामराव घरी येतो जेवण करण्याची इच्शा नसतानी कसाबसा जेवण करते. काय करील बिचारा आन दुसरे काय करू शकते आसवे गाळन्या शिवाय.
पण तो हिम्मत हारित नाही . पण पारीला आपल्या नवर्याची खूपच काळजी वाटायला लागते. तिला वाटू लागते कि शामराव सारखे आपल्या नवर्याने करायला नको आणि आपल्यां नवर्याने असे काही केले म्हणजे ??? तिचे विचार चक्र आता जोरात चालू होतात काय करावे काहीओच कळत नाही. जर या मणसाला कुणी पासे नाही दिले म्हणजे ??......... " अरे देवा आता कसे रे करू मी काही तरी वाट दाखव बाबा तूच "........ पारू कडून आता राहाव्ल्याच जात नाही म्हणून ती रामराव ला म्हणतेच ......."अवं मी काय म्हणते लिनी नाही देले पासे त जाऊ द्या बलीच लाग्न्न आपण पुढच्या वर्साले करू. की काय्जी करू नका. आपण हात मजुरी करून भागवू कसे तरी औंदाच्या साली . आन मी काय महाते तुमी कट्या शामराव सारखे काही करू नका पुढच्या वर्षी चांगला पबुश झाला कि आपण पेरणी करून चांगले पोईक घेवू आन मग करू बलीच लागण ."........... हे सारे ऐकून पारूच्या डोळ्यात पाणी येते . पण रामराव शांत स्वभावी आणि विचारी असल्या मुले असे विचार त्याच्या मनात येत नाहीत . तो आपल्या बायकोला समजावून सांगतो .........."आव तू काय मले पागल बीगल समजली कि काय व मी काय एवढा पागल हव काय तुले काय वाटले कि मी जीव देईन अन मी जीव देवून काय होईन, आपलं वावर कोणी पेरून देईन काय कि आपल्या पोरीचे कोणी लाग्न्न करून देईन. परे घरात उपाशी राहू पण अस भल्त सल्त नाही करणार आव मी काय पळपुटा नाई , आव नाही या वर्षी त पुढच्या वर्षी पेरू आपल वावर पण मी अस खी करणा नाही मायावर विस्वास ठेव. जातो सायाच पाटलाच्या घरी आन मागतो त्याले काही पैसे. सायाचा असा विचार केला होता कि या वर्षी चांगला पावूस आला त चांगला पैसा भेटीन आन मग उरकून टाकू बालीच लागण पण आता मले नाही वाटत कि हा येनीन"................
अजूनही राम्राव्ची आशा संपलेली नाही त्याला वाटते कधीतरी पावूस येणारच आहे म्हणून तो दुबार पेरणी करण्याच्या तयारीला लागतो कारन आता पावसाने जरा बरा जोर धरला होता त्याला गावातील लोक दुबार प्रेर्णी करीत होते पण रामरव कडे पैसे नव्हते म्हणून तो पैश्यान साठी पाटलाच्या घरी जातो .........." पाटील मले थोळेशेक पैशे पायजे होते लेकाचे, वावर पेर्याले "........... पाटील रागातच ......" अरे तुमाले देवून काही फायदा नाही बे, तुमी लळून पळून पैसे घेता लेको आन दियाच्या वेळेस मोठे जीवावर येते, जाय पैसे नाईत माया जवळ "..............रामराव पार रडकुंडीला येतो ............ . " अहो पाटील मागच्या वेळेस म्या नेलते पासे तुमच्या जवळून त म्या देले होते न वापीस "....................." हो रे देले होते पण कवा किती दिवस लावले लावले बे तुया वापस क्र्याले "................ " अहो पाटील आता असे नाही होणार मी बरोबर पिकावरच तुमचे पैसे वापीस करील "........................" हेपाय बाबू तुले पैसे देतो खरी पण माया पैश्याय्ले उशीर केला त माया सारखा वाईट नाही कोणी तुले त चांगल्या माहित हाय आपला दणका "......................पाटील राम्राव्ला पैसे दोतो रामराव लगेच घरी येतो व द्र्यापुर्ला दुकानात जावून कपाशीचे बियाणे आणतो.व आपले शेत पेरून घेतो . काही दिवसाने पिक पण याते रामराव व त्याची पत्नी खूपच खुष असतात. पिक घरी येते चांगला पैसा पण मिळते.आता ग्घ्रात आबाघानी असते काही दिवसाने बळीचे लग्न पण होते घेतलेले पाटलाचे पैसे ते पण वापीस होतात .
( मित्रांनो या कथेमागिल उद्देश एकाच आहे जर नापिकी झाली तर आत्महत्या करायच्या नाहीत डगमगून न जाता येणाऱ्या प्रत्येक क्षणाला तोंड द्या. राम्राव्ने व त्याच्या पत्नीने या वेळी एकमेकांची साथ दिली त्यांनी जर हे केले नसते तर ..........................................................)

मोहन कु-हाडे.................
(लोतवाडा)

Share

प्रतिक्रिया