नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
असा लागटं पाऊसं...
मना लावतोया पिसं
असा लागट पाऊसं...
पाय टाकून मनात
गर्द लखाकते वीज
कुठे एखादं मातीत
हळू कोंबळतं बीज
हवेत उंडारतो वासं...
रात पाहून चांदणी
माझ्या झोम्बतो मनाला
अन विसरतो कधी
त्याच्या पाऊसपणाला
भरल्या पिकातून घुसं...
उरी मारतो धडका
उभा राहून दारात
धरू किती अडवून
उडी घेतोया घरात
जेव्हा ताठरते कासं...
घाटमाथ्यात आभाळी
कधी बसतो घुमत
चाले कधी सिंहावाणी
घाट घासात गिळीत
त्याचा ओसरेना जोसं...
रावसाहेब जाधव (चांदवड)
९४२२३२१५९६
प्रतिक्रिया
खुपच छान सर
खुपच छान सर
धन्यवाद!
धन्यवाद!
रावसाहेब जाधव (चांदवड)
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!