नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
(मतला)
रास्त असुनी मागणी ही द्यावं हे सरकार.
शेत्कऱ्यांना खर्च धरुनी भाव हे सरकार.
(हुस्नेमतला)
शेत्कऱ्यांशी खेळताना डाव हे सरकार.
पाडते पिकल्या बरोबर भाव हे सरकार.
(१ ला शेर)
आणते आयात करुनी अन्यदेशातून,
येत असता चांगला जर भाव हे सरकार.
(२ रा शेर)
शेतकी साहित्य असुनी आजचे खर्चीक,
स्वस्त आहे माल का सांगाव हे सरकार?
(अंतिम शेर)
शेत्करी मरतो बचत नसल्यामुळे शेतात,
पण तरीही देत नाही भाव हे सरकार?
(मक़ता)
जर असेची राहिले धोरण कधी 'रविपाल',
गेलं नक्की सांगतो बेभाव हे सरकार.
°°°
वृत्त: आस्त्रवीणी
(गालगागा गाल गागा गालगागा गाल)
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने