![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
none
धाक.. (वऱ्हाडी बोली )
खऱ्या खोट्याचा
लागत नायी थाक
कास्तकाराच्या मनात
कायदयाचा धाक
हिवा-दवात रस्त्यावर
जीवं चाललं सोलत
तरी कारभाऱ्याईच्या
दाळा नायी उलत
बैखटीतली चर्चा
चार भितीत मुरते
मुठभर हळ्याच्या
पोटासाठीच झुरते
येक ना येक दिवस तरी
वावराले मान भेटन
म्हनून तं मानूस
दाबून पायते बटन
येक खेप मानूस
कागद तरी वाचन
सांगा राजेहो चबऱ्यासंग
काय खावून जीतन
कारभारी बदलून
बदल नायी घळत
निढयीचा घाम
बुडयीत राह्यते जीरत
कोनाले ठरवाव खोटं
कोनाचं मानावं खरं
मतलबी वारं तं
सदाईच वाह्यते न्यारं
रवींद्र अंबादास दळवी
श्री. वल्लभ अपार्टमेट, विधाते नगर नाशिक -४२२००६
७०३८६६९५४२