नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
हमीभाव देत नाही
बांधू लागले सरण
कसं जगतू रं आम्ही
पाठी बांधून मरण...
पाठी बांधल मरण
नको मला तुझी भीक
घेतो चिमटा पोटाला
तरी जगवीतो पिकं...
जरी जगवीतो पिकं
झेले संकट अस्मानी
भाव मिळेना पिकाला
कावा हा रे सुलतानी...
कावा हा रे सुलतानी
कशी यावी कुणा कीव
पैस कुठं रं गाडीला
थके चालून हा जीव....
थके चालून हा जीव
जड पायातले गोळे,
सुखी सपान बघती
राती निजताना डोळे....
राती निजताना डोळे,
दिस सरलेला दिसे,
ओल्या पापण्यात झोप
ओठी लटकेच हसे.....
ओठी लटकेचं हसे
रात खायला उठते,
देह थकून नीजतो
मनी काहूर पेटते....
मनी काहूर पेटते
जीव कासावीस होई,
पीक वाळत चाललं
बोजा कर्जाचा तो डोई
बोजा कर्जाचा तो डोई
कशी जाईल भाकर,
बळी नावालाच राजा
उभ्या जगाचा चाकर...
उभ्या जगाचा चाकर
घरी बायका नि मुलं,
भरी जगाचे तो पोट
घरी विझवूनी चूल....
घरी विझलेली चूल
द्यावा रास्त त्याला भाव,
साऱ्या जगाला पोसतो
माझा शेतकरी देव....!
प्रतिक्रिया
छान
छान कविता
मुक्तविहारी
खुप छान कविता.
खुप छान कविता.
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने