![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
(मतला)
काहीच फेर नाही, होते तसेच आहे.
सरकारचे नव्या या धोरण जुनेच आहे.
(१ ला शेर)
खर्चीक शेतकीच्या, मालास भाव नाही,
पिकले किती तरीही इंकम उणेच आहे.
(२ रा शेर)
येताच पीक हाती पडतात भाव सांगा,
निश्चित मला असे हे हुलकावणेच आहे.
(अंतिम शेर)
लाटूण माल माझा सोफिस्टिकेट झाले,
शेतीत मी फटीचर बुजगावणेच आहे.
(मक़ता)
दिल्लीत काल परवा 'रविपाल' मारले मज,
आता धरून यांना लाताडणेच आहे.
°°°
वर्णिक वृत्त: आनंदकन (अगणात्मक)
शब्दार्थ:
१) फेर= बदल
२) सोफिस्टिकेट= सुसंस्कृत,
३) इंकम= उत्पन्न.
प्रतिक्रिया
Dhirajkumar B Taksande
जबरदस्त डॉ साहेब!!!
गझल आता बोलत आहे
राज सारेच खोलत आहे
हा हा..हा! धन्यवाद भाऊ.
आपल्या लोकांची कृपा आहे भाऊ!
Dr. Ravipal Bharshankar
छानच
छानच
धन्यवाद रंगनाथजी,
आभार आपले.
Dr. Ravipal Bharshankar
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!

शेतकरी तितुका एक एक!
पाने