IT कार्यशाळा - संकेतस्थळाचा/वेबसाईटचा वापर कसा करावा? - भाग-१
नमस्कार,
आज दि. १४/१०/२०२० रोज बुधवारला सायंकाळी ८ वाजता संकेतस्थळाचा/वेबसाईटचा वापर कसा करावा? या विषयाला अनुरूप कार्यशाळेचा उदघाटनाने शुभारंभ होत आहे. कार्यशाळेचे उदघाटन प्रा. कुशल मुडे, मुंबई हे करतील. त्यांनतर रीतसर कार्यशाळेस प्रारंभ होईल.
दररोज रात्री ८ ते ९ हा कार्यशाळेचा वेळ असेल. ज्यांना शक्य असेल त्यांनी या वेळातच उपस्थित असावे, अशी अपेक्षा आहे. ज्यांना शक्य नसेल त्यांनी इतर वेळेस ग्रुपला भेट देऊन त्यानुसार कार्यकृती केली तरी चालेल.
या कार्यशाळेत सोशल मीडिया आणि इंटरनेटचा वापर याविषयी विस्तृत माहिती देण्याचा माझा प्रयत्न असेल.... पण ज्यांना जितके आत्मसात करायचे असेल तितकेच ग्रहण करायची मुभा असेल.
पण या कार्यशाळेच्या ग्रुपचे काही नियम असणार आहे. ते नियम पाळणे सर्वांना बंधनकारक असेल.
१) गुडमॉर्निंग, गुडनाईट, शुभेच्छा यासारखे कसलेही संदेश या ग्रुपवर नकोत.
२) विषयाशी म्हणजे कार्यशाळेशी संबंध नसलेल्या पोस्ट टाकणाऱ्याला तातडीने ग्रुपमधून काढून टाकण्यात येईल. वार्निंग सुद्धा देण्यात येणार नाही. कृपया नोंद घ्यावी.
३) चुकून पोस्ट पडल्यास तातडीने "चुकून पोस्ट पडली" असा खुलासा केल्यास अवश्य विचार केला जाईल.
४) सोशल मीडिया आणि मोबाईलचा वापर करणारा नवखा आहे असे जाणवले तर अशा व्यक्तीने काही चुका केल्या तरी त्याला तातडीने ग्रुपबाहेर न काढता थोडीशी सहानुभूती दाखवली जाईल.
५) सर्वांनी पुरेपूर काळजी घ्यावी आणि गांभीर्याने वर्तन ठेवावे, अशी स्वाभाविक अपेक्षा आहे.
६) या कार्यशाळेत दाखल झालेल्यापैकी अनेकांचा नंबर माझ्याकडे सेव नसल्याने त्यांचा मला परिचय नाही. अशा सर्व व्यक्तींनी कृपया आपले संपूर्ण नाव व पोस्टल पत्ता कळवावा. अनोळखी व्यक्तीस गृपवर ठेवणे शक्य नसल्याने त्यांना गृपमधून निष्कासित केले जाईल.... कृपया नोंद घ्यावी.
आपल्या सहकार्याच्या अपेक्षेत!
आपला स्नेहांकित,
- गंगाधर मुटे
दि. १४/१०/२०२०
============