नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
बाहुलीच्या लग्नात आजकाल खेळत नाहीत मुले खेळण्यातली बंदूक घेऊन हसत नाहीत मुले |
न जाने कोठे हरवली निष्पाप नजर ओळखीची,
गोष्टी परीच्या ऐकून आताशा झोपत नाहीत मुले ||
न फुलपाखरांशी ओळख न कळ्यांशी नाते कुठले,
बाग बगीच्यात फुलासमान फुलत नाहीत मुले ||
माखतच नाहीत मातीने कधी त्याची इवले पाय,
पण चमकणाऱ्या ताऱ्यांनाही मोजत नाहीत मुले || कसे कोरडेच दिसतात आतून बाहेरून सारे,
चिंब पावसात कधी मनसोक्त भिजत नाहीत मुले ||
पहा कसा दुष्काळ घेऊन फिरतात ह्या आसवांचा,
आजी आजोबा मेल्यावरही रडत नाहीत मुले ||
कोठून अनोळखी सावल्या येऊन हसतात येथे,
हृदयाचे तुकडे असूनही हृदयास जपत नाहीत मुले ||
किरण शिवहर डोंगरदिवे, समता नगर, वॉर्ड न 7, मेहकर, ता मेहकर
जि बुलडाणा पिन 443301 , मोबा 7588565576
प्रतिक्रिया
सुंदर गझल
सुंदर गझल आहे !
मुक्तविहारी
पाने