
|  नमस्कार !  बळीराजावर आपले स्वागत आहे. | 
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
बाहुलीच्या लग्नात आजकाल खेळत नाहीत मुले           खेळण्यातली बंदूक घेऊन हसत नाहीत मुले |    
                                                                       न जाने कोठे हरवली निष्पाप नजर ओळखीची,    
 गोष्टी परीच्या ऐकून आताशा झोपत नाहीत मुले ||    
 न फुलपाखरांशी ओळख न कळ्यांशी नाते कुठले,
 बाग बगीच्यात फुलासमान फुलत नाहीत मुले ||  
                                                                माखतच नाहीत मातीने कधी त्याची इवले पाय,
 पण चमकणाऱ्या ताऱ्यांनाही मोजत नाहीत मुले ||                                                                       कसे कोरडेच दिसतात आतून बाहेरून सारे,
  चिंब पावसात कधी मनसोक्त भिजत नाहीत मुले ||
                                                                     पहा कसा दुष्काळ घेऊन फिरतात ह्या आसवांचा,
 आजी आजोबा मेल्यावरही रडत नाहीत मुले ||        
                                                                   कोठून अनोळखी सावल्या येऊन हसतात येथे,
   हृदयाचे तुकडे असूनही हृदयास जपत नाहीत मुले ||            
  किरण शिवहर डोंगरदिवे, समता नगर,                    वॉर्ड न 7, मेहकर, ता मेहकर                              
 जि बुलडाणा पिन 443301 ,                               मोबा 7588565576
 
      
    
      
प्रतिक्रिया
सुंदर गझल
सुंदर गझल आहे !
मुक्तविहारी
पाने