नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
सहवास जर तुझा तर हे दुःख खूप नाही
जगण्यात मज तसाही उरला हुरूप नाही
येतात रे कळ्यांच्या फुलण्यात अडथळेही
लिहले कुणी फुलांची दुनिया कुरूप नाही
मैत्रीमधे कितीही घे पारखून मित्रा
मी मोकळ्या मनाचा हृदयी कुलूप नाही
सोसायटीत त्यांच्या मजला प्रवेश नाही
त्यांना हवे तसे रे मज रंगरूप नाही
केवळ पिढ्या बदलल्या तक्रार ना बदलली
'भाजीत तेल नाही' 'वरणात तूप नाही'
भिंतीत चार अजुनी अडकून बैसला तू
का? मोकळे तुझे रे देवा स्वरूप नाही
बदनाम नाव माझे बस ऐवढ्याचसाठी
या बेगडी जगाशी मी एकरूप नाही
. . . निलेश कवडे अकोला
प्रतिक्रिया
लेखनाचा विषय
लेखनाचा विषय "शेतकरी" असा नसून "शरद जोशी" असा आहे. त्यामुळे लेखन शरद जोशी या व्यक्तीमत्वाशी निगडीत किंवा कार्य अधोरेखीत करणारे किंवा शरद जोशींच्या विचारांचा ओझरता तरी उल्लेख करणारे असणे आवश्यक आहे.