
  नमस्कार !  ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे.  | 
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेतकरी राजा
पाऊस नाही,पैसा नाही,ओझं झालं बघा कर्जाचं
 शेतकरी हा बुडत जाई, खरं नाही या राजाचं
जी जी रं जी-माझ्या राजा तू रं- माझ्या सर्जा तू रं
 माझ्या राऽ ऽऽ ऽऽ जा ....//धृ
 मायबाप ही शेती ज्याची, आज बनलीया उजाड रं
 मुकी न् बहिरी धरणीमाता, नाही तिजला चाड रं  //१//
 रात्रंदिन हा घाम गाळीतो, डोंगर फोडीतो कष्टाचा
 दुष्काळ अन् रोगराई ही, चुराडा करिते स्वप्नांचा  //२//
परंपरा अन् रूढीचं सारं, सावट बसलयं डोक्यावर
 अनाठायी हा खर्च होई, लगीन सराई नवसावर   //३//
 कर्ज व्याजाचं चक्र होई, शेतक-याच्या मरणाचं
 गरगर गरगर फिरत राही, रहाट गाडगं जीवनाचं   //४//
विचार करूनि सावध हो तू ,मेळ साध तू कर्जाचा
मेळ साध तू व्याजाचा ,मेळ साध तू खर्चाचा
 मेळ साध तू कष्टाचा,मेळ साध तू दामाचा
  खंबीर मनाने उचल पाऊल ,तूच कणा या देशाचा 
जी जी रं जी ,माझ्या राजा तू रं ,माझ्या सर्जा तू रं
   माझ्या रा ऽऽ ऽऽ जा ......
      --नरेन्द्र बापुजी खैरनार
         मु.पो.ता.साक्री जि.धुळे
         भ्र.९४२१८८४०२४
      
    
      
प्रतिक्रिया
सुरेख गीतरचना
सुरेख गीतरचना
शेतकरी तितुका एक एक!
छान
विचार करूनि सावध हो तू ,मेळ साध तू कर्जाचा
मेळ साध तू व्याजाचा ,मेळ साध तू खर्चाचा
मेळ साध तू कष्टाचा,मेळ साध तू दामाचा
खंबीर मनाने उचल पाऊल ,तूच कणा या देशाचा
खंबीर मनाने उचल पाऊल ,तूच कणा या देशाचा....... दिलासा देणारे, वेदनेवर फुंकर घालणारे शब्द....!!
हेमंत साळुंके
पाने