Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




वायगाव-निपानी चौरस्ता (वर्धा) - रास्ता रोको आंदोलन

वायगाव-निपानी चौरस्ता (वर्धा) - रास्ता रोको आंदोलन

शेतकरी संघटनेचे १ तासाचे रास्ता रोको आंदोलन संपन्न.

                     आज दुपारी १२ ते १ वाजेदरम्यान वायगाव चौरस्ता (जि. वर्धा) येथे हजारो शेतकर्‍यांनी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रांताध्यक्ष माजी आमदार सरोज काशीकर आणि शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे यांच्या नेतृत्वाखाली वायगाव चौरस्त्यावर वाहतुक अडवून १ तास वाहतुक रोखून धरली. 
                   कापसाची सहा हजार रुपये, सोयाबिनची तीन हजार रुपये, तुरीची पाच हजार रुपये आणि धानाची एक हजार सहाशे रुपये आधारभूत किंमत जाहीर करावी, थकित वीजबिलापोटी शेतातील विजपुरवठा खंडीत करणे थांबवावे, कापूस निर्यातीवरील सर्व बंधने हटवावी व कापूस बाजार नियंत्रणमुक्त करावा, बिगरबासमती तांदळावरील निर्यातबंदी कायमस्वरुपी हटविण्यात यावी, संपूर्ण शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती, सर्व शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळावा, ग्रामिण भागातील लोडशेडींग बंद करण्यात यावे, आघाडी सरकारच्या जाहिरनाम्यातील आश्वासनाप्रमाणे वीज बिलातून शेतकर्‍यांची संपूर्ण मुक्तता करण्यात यावी इत्यादी प्रश्नाची कायमची सोडवणूक करून घेण्यासाठी आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आज १९ नोव्हेंबरला राज्यव्यापी एक तासाचे लाक्षणिक स्वरुपाचे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. 

रस्ता रोको
शेतकरी
किसान
Farmer

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Share

प्रतिक्रिया

  • संपादक's picture
    संपादक
    रवी, 20/11/2011 - 21:34. वाजता प्रकाशित केले.

    तरुण भारत
    Tarun Bharati
    वर्धा जिल्ह्यात चौफेर चक्काजाम आंदोलन
    स्रोत: TarunBharat - Marathi तारीख: 11/19/2011 9:31:16 PM

    भाजपाचे दोन, तर शेतकरी संघटनेचे सात ठिकाणी आंदोलन, मनसेनेचाही आंदोलनात सहभाग, राष्ट्रवादीचा घरचा अहेर,
    पुतना मावशी सरकार : सरोज काशीकर
    त. भा. वृत्तसंकलन
    वर्धा, १९ नोव्हेंबर

    कापसावरील निर्यातबंदी हटविण्यात यावी, कापसाला ६००० रुपये हमीभाव देण्यात यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी, शेतकरी संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज, १९ नोव्हेंबरला जिल्ह्यात आंदोलन केले.
    या आंदोलनाने जिल्ह्यातील वाहतूक प्रभावित झाली होती. राजकीय पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले असले तरी आजच्या आंदोलनात शेतकरी सहभागी झाले होते. दरम्यान राष्ट्रवादी कॉंगे्रसच्या किसान सभेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांना निवेदन देऊन कापसाला ६ हजार, तर सोयाबीनला ४ हजार रुपये भाव देण्याची मागणी केली आहे. या पक्षाचेच केंद्रीय कृषिमंत्री असताना त्यांना हा घरचाच अहेर ठरला.

    वर्धा : शेतकरी संघटनेच्या वतीने वायगाव (चौरस्ता) येथे माजी आमदार सरोज काशीकर आणि शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे यांच्या नेतृत्वात १ तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले. चौरस्त्यावरच आंदोलक उतरल्याने चारही बाजूने वाहतूक खोळंबली होती. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चारही रस्त्यावर मोटरसायकली लावून रास्ता रोको केला.

    जामणी चौरस्त्यावरही शेतकरी संघटनेच्या वतीने १ तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले. वर्धा-वायफड-मांडवा (शांतीनगर) चौकामध्ये मनसे जिल्हा संघटक अजय हेडाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली शहर उपाध्यक्ष चंदन मिश्रा, सर्कल अध्यक्ष सिद्धार्थ मिश्रा यांच्या नेेतृत्त्वात १० दिवसांपासून कापसाच्या भाववाढीकरिता आंदोलन सुरू आहे. कापसाला योग्य भाव मिळावा याकरिता मनसेने रस्त्यावर जाळपोळ करून विरोध दर्शविला. यावेळी महाराष्ट्र शासन मुदार्र्बाद, कापसाला योग्य भाव मिळाला पाहिजे, भारनियमन कमी झाले पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी धर्मराज भोयर, संदीप पखिड्डे, बाला पांडे, अविनाश निंबाळकर, चंदू वाघ, अमित गेडाम आदी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

    पुलगाव येथे शेतकरी संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी ५० महिला व २५० पुरुषांना स्थानबद्ध करण्यात आले. वायगाव (नि.) चौरस्त्यावर शेतकरी संघटनेच्या नेत्या व माजी आमदार सरोज काशीकर कॉंगे्रस व राष्ट्रवादी कॉंगे्रसने पुतना मावशीचे काम करू नये, असे आवाहन करून कापसाला ६ हजार रुपये भाव देण्यात यावा, अशी मागणी केली.

    कारंजा (घा.) : येथील राष्ट्रीय महामार्ग ६ वर दुपारी १ वाजताच्या सुमारास भारतीय जनता पार्टीच्या वतीने कापसाला ६ हजार रुपये भाव देण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, माजी खासदार विजय मुडे, आमदार दादाराव केचे, बाबासाहेब कंगाले, वसंत राठोड, अशोक विजयकर यांनी शेतकर्‍यांच्या व्यथा व समस्यांविरोधात सरकारचा खरपूस समाचार घेतला. त्यानंतर स्थानिक गोळीबार चौकात डॉ. गोडे, मुडे, राठोड, आमदार केचे यांच्या नेतृत्त्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला आष्टी, आर्वी, कारंजा येथील शेतकर्‍यांची उपस्थिती पाहून पोलिस प्रशासन चक्रावून गेले होते. यावेळी आमदार केचे, मुडे यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांना अटक करून तहसील कायार्र्लयात नेले. त्यानंतर मागणीचे निवेदन आर्वी येथील उपविभागीय अधिकारी कोहळे यांना देण्यात आले. आंदोलनात साधारण ३ हजार शेतकरी सहभागी झाले होते. दरम्यान संतप्त शेतकर्‍यांनी गाडीच्या काचा फोडून आपला रोेष व्यक्त केला. आंदोलनात गिरीष भांगे, अशोक विजयकर, बाळा नांदुरकर, वसंत राठोड, देवराव ढोले, हरिभाऊ धोटे, सुरेश खवशी, मुकुंद बारंगे, राजेश टिपले, मोहन टिपले, अशोक ढोले, वसंत मुने, अंबादास आसोले, रामभाऊ कथले, नामदेव धोमणे, साहेबराव धुर्वे, हरिश्‍चंद्र चाककापुरे, रेवती धोटे, शोभा नासरे, चेतना मानमोडे, बाळकृष्ण चौकोणे, बुद्धेश्‍वर पाटील, तेजराव रणधम, रमेश धंडाळे, छोटू कामडी, देवानंद भोयर, विजय देशमुख, सुभाष मानमोडे, धनराज गोरे, नागो देवासे, जगदीश खागरे, बाळा पाटील आदी सहभागी झाले होते.

    हिंगणघाट : येथून २० कि. मी. अंतरावरील वडनेर येथे नागपूर-हैद्राबाद हा राष्ट्रीय महामार्ग एक तास रोखून धरला. या आंदोलनाचे नेतृत्त्व माजी खासदार सुरेश वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य मिलिंद भेंडे, शेतकरी नेते प्रशांत इंगळेे तिगावकर, भाजपा नेते वसंत आंबटकर, पंचायत समिती सभापती प्रभाकर बरडे, ओमप्रकश मोटारिया, रामचंद्र पवार, माधव चंदनखेडे, प्रफुल्ल कातोरे यांनी केले. वडनेर बसस्थानकासमोर प्रथम भव्य जाहीर सभा झाली. या सभेत भाजपाचे डॉ. जवाहर खत्री, नरेंद्र पाटील, डॉ. नरड, हभप शंकर महाराज गिरी, राकॉंचे प्रा. दिनकर घोरपडे यांची भाषणे झाली. यानंतर माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी आपल्या घणाघाती भाषणातून शासनाचे वाभाडे काढले. दळभद्री सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जगाचा पोशिंदा शेतकरी आज आत्महत्या करीत असून सरकारला विदर्भाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. मिलिंद भेंडे यांनी महाराष्ट्र व केंद्र सरकार घोटाळेबाजांचे सरकार असून देशाला आज नितीन गडकरी यांच्यासारख्या तडफदार नेतृत्त्वाची गरज आहे. त्यामुळेच विकासाची दृष्टी असलेल्या गडकरी यांच्या नेतृत्त्वाखाली शेतकर्‍यांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रशांत इंगळे, समीर कुणावार यांनी, मी भाजपात नसलो तरी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर जो कोणी समोर येऊन आंदोलन करेल त्याला आपले समर्थन राहील, असे सांगितले. संचालन विठ्ठल पोहाणे यांनी केले. भाजपाचे पुंडलिक तिजारे, दामोदर कुकर्डे, शंकरराव मुळे, प्रशांत आंबटकर, हिरामण मुरसे, श्याम खत्री, रामदास कुमरे, बबन आंबटकर, अरुण महाजन यांंच्यासह असंख्य कार्यकर्ते व शेकडो शेतकरी उपस्थित होते. यावेळी याच ठिकाणी शेतकरी संघटनेनेही रास्ता रोकोत भाग घेतला. आंदोलनाचे नेतृत्त्व दत्ता राऊत, गुलाब खेकारे, हेमराज इखार, सिंधू इखार, पुरुषोत्तम इखार, पुरुषोत्तम उईके, डॉ. रामकृष्ण चरडे, छगन गोडी, रामप्रभू सरदार, किशोर राऊत यांनी केले.

    जाम चौरस्ता : शेतकरी संघटनेने जाम चौरस्ता येथे पूर्व विभागप्रमुख मधुसूदन हरणे यांच्या नेतृत्त्वात शेकडो कार्यकर्त्यांनी एक तास रास्ता रोको केले.
    या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य रेखा हरणे, प्रा. मधुकर झोटींग, साहेबराव येंडे, उल्हास कोटंबकर, वसंत निखाडे, वसंत दोंदल, जीवन गुरनुले, सचिन ठवरी, प्रवीण महाजन, देविदास चौधरी उपस्थित होते. यावेळी संघटनेने आपल्या मागण्यांचे निवेदन समुद्रपूरच्या तहसीलदारांना दिले. या दोन्ही आंदोलनांमुळे नॅशनल हायवे ७ वर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. या आंदोलनात उल्हास कोटंबकर, जीवन गुरनुले, सुनील हिवसे, उत्तम गोमडे, अमोल नवकरे, चिंताणम राऊत, गणेश जामूनकर, उल्हास बुरांडे, रेखा हरणे, आशा राऊत, नंदू मानकर आदींसह ५० आंदोलनकांना स्थानबद्ध करण्यात आले होते.

    आर्वी : येथील वर्धा चौरस्त्यावर शेतकरी संघटनेने शैलेजा देशपांडे यांच्या नेतृत्त्वात अनेक शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. आर्वी येथील वर्धा टी पॉईंट येथे दुपारी १.३० वाजता शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जवळपास १ तास वाहतूक रोखून धरली. कापसाला ६ हजार रुपये, सोयाबीनला ३ हजार ५०० रुपये भाव मिळावा तसेच भारनियमन बंद करावे, शेतकर्‍यांची वीज कापणे बंद करावे इत्यादी मागण्या मांडण्याकरिता शेतकरी संघटनेद्वारे हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये मिलिंद देशपांडे, भास्कर फडफड, अशोक विरुळकर, रामकृष्ण भांगे, रुपराव पवार, प्रमोद गावंडे, निरंजन वांगे, दिशेन गुप्ता, साहेबराव धसकट, श्याम मारझोडे, नानाजी जामखुरे, सुरेश केवट, यशवंत पोट, सचिन मांडवकर आदीं कार्यकर्त्यांनी सहभाग नोेंदविला.

    सेलडोह : शेतकरी संघटनेच्या वर्धा-नागपूर महामार्गावरील सेलडोह येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मणिराम धनोरे, नीळकंठ घवघवे, धोंडबा गावंडे, मुुकुंदा खोडे, चेतराम मेहुणे, रवींद्र खोडे, शांताराम सोनटक्के, चंद्रहास सोनटक्के, शंकर सोनटक्के, शारदा उंबरकर यांच्या नेतृत्त्वात एक तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा १ कि. मी. वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ५० आंदोलकांना स्थानबद्ध करण्यात आले.
    पोहणा : भारतीय जनता पार्टीच्या वतीने येथे सकाळी ११ ते दुपारी १२.३० पर्यंत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनात रामचंद्र पवार, गंगाधर कोल्हे, भाग्येश देेशमुख, बबन भोंगे, ऍड. राजेश नहार, गजानन ठाकरे सहभागी झाले होते.

  • संपादक's picture
    संपादक
    रवी, 20/11/2011 - 21:35. वाजता प्रकाशित केले.

    Punyanagari

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    रवी, 20/11/2011 - 22:40. वाजता प्रकाशित केले.

    देशोन्नती

    शेतकरी तितुका एक एक!

  • पाने