नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काही संदेश नसतातच..... वाचण्यासारखे
काळजात जाऊन रुततात.... टाचण्यासारखे
सांत्वनाही जिथे ओशाळल्यागत होते....
सारेच घाव नसतात जेव्हा.... सोसण्यासारखे
काही जाऊन रुततात, आत खोलवर....
सारेच व्रण कुठे असतात.... दिसण्यासारखे?.
डोळे बधिर अन अश्रू मुके व्हायला लागतात.....
सारेच नसते शब्दात..... सांगण्यासारखे
टाळायचे म्हटले तरी काही टळत नाही......
घडते तेच नियतीला मंजूर.... असण्यासारखे
निश्चयाने झेलत जावा येणारा प्रत्येक क्षण.....
आणखी असतेच काय अभय ..... असण्यासारखे?
भगवंत देवो तुम्हांस खूप खूप बळ
हेच शब्द माझे प्रार्थनेसारखे.......!
ॐ शांती..! शांती..!! शांती..!!!
--------------------------------------------------
- गंगाधर मुटे ’’अभय”
==^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=
प्रतिक्रिया
कवयित्री अरुणा राम नेवले यांचे निधन
आज दि. २६/०४/२०१७ ला सकाळी ७ वाजता शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष राम नेवले यांच्या पत्नी कवयित्री अरुणाताई नेवले यांचे नागपुर येथील निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले.
आज सायंकाळी ५ वाजता त्यांची अंत्ययात्रा उदय चौक, मानेवाडा, नागपूर येथील निवासस्थानवरुन निघेल व मानेवाडा चौक येथील स्मशानघाटावर अंत्यविधी होईल.
वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेच्यावतिने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
भावपूर्ण श्रद्धांजली!
भावपूर्ण श्रद्धांजली!