बघा पटेलांच्या पोरी कशा हनीट्रॅप मध्ये अडकवतात
सावधान!
ही स्वतःचे नाव पूजा पटेल सांगत असली तरी तिचे नाव पटेल वगैरे असण्याची शक्यता नाही. पण अशीच गोंडस नावे घेऊन ह्या ललना इंटरनेटवर वावरत असतात.
आता आजकाल व्हाट्सअप वर देखील यांनी आपल्या करामती करणे सुरू केले आहे. मी असल्या लोकांशी एक शब्दही कधी बोलत नाही लगेच ब्लॉक करतो आणि मोकळा होतो. पण काल म्हटले चला दोन शब्द बोलू तर यात.
संवाद करताना उटपटांग बोललो पण तरीही ही बया हात धुवून पाठीमागेच लागली. संवादाचा स्क्रीन शॉट मी दिलेलाच आहे.
इथपर्यंत ठीक होते पण रात्री बारा वाजता चक्क व्हाट्सअप vdo कॉल आला. मी जाणून बुजून रिसीव केला पण कॅमेरा ऑफ ठेवला. तर बया म्हणते कशी...
सर्वांनी सावध रहाणे गरजेचे आहे. अन्यथा सहजपणे आणि अगदी बेमालूमपणे या बया कोणाला कशा फसवतील आणि नंतर ब्लॅकमेल करतील, याचा नेम नाही.
फेसबुकच्या जन्माच्या आधीपासून माझा नेटवर वावर असल्याने मला दीर्घ अनुभव आहे. असले प्रकार इंटरनेटवर चालत असणार असा संशय सुद्धा मला फार पूर्वीपासून आहे आणि तो मी वेळोवेळी अनेकांच्या लक्षात आणून देऊन सर्वांना सावध करण्याचा प्रयत्न केला आहे.
असो. सावध रहा. यांच्याशी एक शब्दही बोलू नका किंवा संवादही करू नका. लगेच ब्लॉक करून मोकळे व्हा. लक्षात घ्या की आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रक्रिया करून एखाद्या सभ्य, सत्शील, चरित्रशील आणि सज्जन माणसाचा सुद्धा ह्या ललना सिरीट कोमैय्या करू शकतात याची जाणीव ठेवा.
तूर्त इतकेच!
- गंगाधर मुटे
=====