नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
जीवावर जीव जगता, कोण तुम्ही व्हा रं ?
डोमकावळ्यापरस थूतर तुमचं कारं !।धृ।।
ज्याचे खाता त्याचा विसर पडतोया तुम्हा
कुठे भरुन द्याल हा तर संगीन गुन्हा
कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ ।।१।।
डोमकावळ्यापरस थूतर तुमचं कारं !
जगाचा पोशिंदा किती हैरान झाला
कुठून कसा हाती त्याच्या गळफास आला
गरीबांचा काळ, मोठ्यांचा प्रतिपाळ ।।२।।
डोमकावळ्यापरस थूतर तुमचं कारं !
मुका नको राहू असा हो तु हुशार
उठ बापा आता तरी लेखनी उगार
शिकतील बाळ, तर फेडतील काळ ।।३।।
डोमकावळ्यापरस थूतर तुमचं कारं !
शब्दार्थ:
डोमकावळा=काळा कावळा
परस=पेक्षा
थुतर=तोंड
कारं=मलिन
संगीन=घोर/दंडनीय
गोतास=आप्त/स्वजनांस
काळ=मृत्यु
प्रतिपाळ=पाठराखन/संरक्षण
म्हणी:
कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ=स्वजनांचा घात करणे.
गरीबांचा काळ, मोठ्यांचा प्रतिपाळ=मोठ्या लोकांशी चांगले वागणे व गरीब लोकांस त्रास देणे.
शिकतील बाळ, तर फेडतील काळ=मुले शिकून सवरुन मोठे झाल्यास विपन्नावस्था दूर करण्यास समर्थ होतात.
प्रतिक्रिया
जीवावर जीव जगता, कोण तुम्ही व्हा रं ?
वा काका, खुप सुंदर कविता..
Aryan Bharshankar
Thank you!
Thank you so much Aryan!
Dr. Ravipal Bharshankar
कोण तुम्ही व्हा रं?
ज्याचे खाता त्याचा विसर पडतोया तुम्हा
कुठे भरुन द्याल हा तर संगीन गुन्हा..
मस्त!
म्हणीचा वापर, खूप छान सर
म्हणीचा वापर, खूप छान सर
Thanks
Thanks Rajesh
Dr. Ravipal Bharshankar
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
Thanks
Thank you sir
Dr. Ravipal Bharshankar
मस्त कविता
थूतर तुमचं कारं! मस्त..
Pradip
Thanks
Thank you pradip bhau!
Dr. Ravipal Bharshankar
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण