![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
रानातला पाऊस ------------------------
रानातल्या पावसाचे
स्वागत आपण करू
नाचू, बागडू आनंदाने
फेर आपण धरू
रानातल्या पावसाचे
स्वागत आपण करू......
भिजू चिंब आनंदाने
ओल्या तृप्त सुगंधाने,
पाने,फुले सतेज होती
तोच आपुला गुरू
रानातल्या पावसाचे
स्वागत आपण करू.......
निवडून ठेऊ शेत,शिवारे
घेऊन येई थेंब टपोरे
भागवून तृष्णा या धरेची
जाई जमिनीत जिरू
रानातल्या पावसाचे
स्वागत आपण करू......
रानातला पाऊस तो,
तोच आपुले जीवन
पशुपक्षी ही आनंदाने
करीतात कुंजन
शेतशिवारी, धूनबासरी
मंजुळ गाणी सुरू
रानातल्या पावसाचे
स्वागत आपण करू
स्वागत आपण करू......
*********
सौ. सुनिता दिक्कतवार,
कोंमावार.
सरकारवाडा
परळी वै. 431515
मो -9405 464314
ई मेल kommawarsunita57@gmail.com
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने