नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
आतातरी होय जागा
खंडी गेली बंडी गेली ठेल्यासंग मंडी आली
गुजरीही गुजरली बाजाराची कोंडी झाली (धृ)
दलालाची कावकाव. व्यापाऱ्याचा तो लिलाव
कास्तकारा मुका ठेव सरकार खेळे डाव
काटा करा पोती गेली. हाता काटापट्टी आली
खंडी गेली बंडी गेली..........,.........(१)
कापसाच्या जिनामंधी सारे निपजले जिन
ग्रेडरच्या हाता संधी जात वंश ठरवन
मापाऱ्यान लूट केली कट ओली दाखवली
खंडी गेली बंडी गेली....................(२)
आठवडी बाजाराच्या नाही भरणार ओळी
भाजीपाला इकायच्या मांडायच्या पाळीपाळी
डोईवर पाटी गेली चारचाकी बंडी आली
खंडी गेली बंडी गेली....................(३)
फळ आता पिकतात. रसायन दावू दावू
व्यापारीच विकतात स्टिकर्स ते लावूलावू
कास्तकार पिढी मेली घेणाऱ्याची गर्दी झाली
खंडी गेली बंडी गेली. ...................(४)
कास्तकार पिकवाले लोक त्याचा भाव करे
उभा केला दलालाले व्यापाऱ्याचा खिसा भरे
कसी अवदसा आली केल्या कष्टा माती झाली
खंडी गेली बंडी गेली ................(५)
आतातरी होय जागा. मालासाठी भाव मागा
घेवू आता सारे पंगा लुटारूले दावू. जागा
लुट आता पुरे झाली कोन्ही नाही आता वाली
खंडी गेली बंडी गेली..........(६) ...........