पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
माझे फेसबूक स्टेटस - 2
गायीच्या पालन-पोषणासाठी एका गाईमागे दरमहा रु. 5000/- सरकारने दिले पाहिजे. तुमची माय शेतकऱ्यांनी का पोसावी?
शेतकरी तितुका एक एक!
"प्रत्येक जीवजंतूंचा धर्म वेगवेगळा व ज्याच्या त्याच्या प्रकृतीवर अवलंबून असतो." - भगवान श्रीकृष्ण
#शुभरात्री_लोक्सहो #धर्म
राज्यमातेला मतदानाचा अधिकार असता तर ती सुद्धा 1500 वाली "लाडकी माय" झाली असती.
#शुभरात्री_लोक्सहो
शेतकऱ्याला "राज्यगुलाम" घोषित करा. बास्स! इतकंच बाकी राहिलेलं आहे.
इंडिया म्हणतो अख्खी शासकीय तिजोरी आमच्याच घशात घाला... भारत मेला तरी चालेल.
#गंगाधर_मुटे #शुभरात्री_लोक्सहो
देशावर आणि राज्यावर झालेले कर्ज जनहिताच्या योजना मुळे नव्हे तर वेतन आयोगामुळे झालेले आहे.
शेतीव्यवसाय मुख्यत्वे ज्या जातींच्या हाती आहे दुर्दैवाने त्याच जातींना "जातीच्या राजकारणाचे" प्रचंड वेड आहे.
पूर्वी लेख पाठवायचो तर ते छापत नव्हते. आता संपादक फोन करून लेख मागतात आणि मला वेळ नाही.
#शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
माझ्या जन्मदिवशी (२७ फेब्रू) मराठीला अभिजात दर्जा मिळाला असता ... तर सोन्याहून पिवळे झाले असते. सरकारचे अभिनंदन! #गंगाधर_मुटे
भारताचे शस्त्र अर्थात आंदोलनशास्त्र
मी अमुक-अमुक पक्षाला कधीही मतदान करणार नाही, असे म्हणणे आंदोलन शास्त्रात बसत नाही. तसेच एखाद्या पक्षाची बांधिलकी स्वीकारणे सुद्धा आंदोलन शास्त्रात बसत नाही.
.... कारण एकदा जर एखाद्या पक्षाला खात्री झाली कि तुम्ही कधीच त्यांना मतदान करणार नाहीत तर तुमच्याविषयीची त्या पक्षाची अनुकूलता संपुष्टात येईल. आणि ....... ज्या पक्षाला तुम्ही मतदान करणारच आहात अशी खात्री होईल तो पक्ष तुम्ही त्यांच्या खुंट्याला बांधलेलेच आहात असे गृहीत धरून तुमच्याविषयीची त्या पक्षाचीही अनुकूलता सुद्धा संपुष्टात येईल.
याउलट तुम्ही जर शेतीला अनुकूल धोरणे राबवलीत तर मतदान मी तुमच्याच पक्षाला देणार, असे लालूच देणारे संभाषण करत सर्वच पक्षांना झुलवत ठेवून त्यांना आपल्या बोटावर खेळवत ठेवले तर.... तेच आंदोलनाच्या उद्दिष्टप्राप्तीसाठी लाभदायक सिद्ध होऊ शकते.
व्यक्तिगत मताला बाजूला ठेऊन शेतीला केंद्रस्थानी ठेवून विचार करणारा विचारच सर्वात जास्त परिणामकारक ठरू शकतो. त्यामुळे आंदोलनशास्त्र आणि व्यक्तिगत वर्तनशास्त्र कधीही एकत्र येत नाही, हे कायमच लक्षात ठेवले पाहिजे. आंदोलनाच्या पाईकाने संघटनेचा सामूहिक निर्णय स्वीकारलाच पाहिजे.
मी बहुतांश वेळा भाजपलाच मतदान केले आहे. अन्य पक्षांना फारच कमी वेळा. पण भाजप हा शेतकऱ्यांसाठी सर्वात जास्त घातक पक्ष असल्याची माझी खात्री झाली तर मी प्रतिस्पर्धी- तुल्यबळ उमेदवारालाच मतदान करेन. मग मला काँग्रेस, राष्ट्रवादी, माकप, भाकप, रिपाई, तेलगू देसम, वंचित आघाडी आणि मुस्लिम लीग सहित कोणताही पक्ष चालेल. पण शेतकरी संघटना जसा निर्णय घेईल त्यानुसार मी मतदान करत असतो. मतदान करताना स्वतःचे डोके वापरत नाही.
- गंगाधर मुटे आर्वीकर
गल्लीत झित्रुबांनो घुसलेत मांसप्रेमी व्हा सज्ज बैल बांनो लेकीस वाचवाया
#गंगाधर_मुटे #रानातला_शेर #शुभरात्री_लोक्सहो
पाऊस पडला कि बेडकं जिवंत होतात अन पाऊस पडला नाही कि पर्यावरणवादी जिवंत होऊन "झाडे लावा, झाडे लावा" असे डराव डराव करायला लागतात.
#तुत्ते_तमिने_हलामी_थाले! #शुभरात्री_लोक्सहो #पर्यावरण #गंगाधर_मुटे #इंडियाvsभारत #जौद्या_आप्ल्याले_काक्रा_लाग्ते
झाडे लावा, झाडे जगवा, झाडे तोडा, झाडे विका.... असे धोरण का असू नये रे दीडशहाण्याने??
#तुत्ते-तमिने-हलामी-थाले #शुभरात्री-लोक्सहो
पोटासाठी बारा वाटा.. पण सद्यस्थितीत 12 पैकी बाराही वाटा फक्त शहरांकडेच जातात आणि थांबतात.
#इंडियाvsभारत #शुभरात्री_लोक्सहो
राजा व्यापारी तर प्रजा भिकारी. सरकारने नको ते खुटीउपड धंदे करू नये. सर्व पांढरे हत्ती विकून काँग्रेसने केलेली चूक दुरुस्त करावी. हाच जनहिताचा राजमार्ग आहे.
#गंगाधर_मुटे #अर्थशास्त्र
सरकार जर शेतीविरोधी नसेल तर वादळ, अतिवृष्टी, महापुर शेतकऱ्यांचं काहीच वाकडं करू शकत नाही!
एका वृक्षात सरासरी पाच माणसे जाळली जाऊ शकतात. आतापर्यंत ६ लक्ष शेतकऱ्यांनी अल्पवयात आत्महत्या केल्या आहेत. त्यांना जाळायला निदान सव्वा लक्ष वृक्ष निष्कारण खर्ची पडले आहेत. याचाच अर्थ सव्वा लाख वृक्षांची निष्कारण कत्तल करावी लागली आहे.
पर्यावरणवाद्यांना शेतकरी मेल्याचे दुःख नाही, हे मी समजू शकतो पण सव्वा लक्ष वृक्षांची कत्तल थांबवण्यासाठी तरी त्यांनी शेतकरी आत्महत्त्या थांबवायसाठी प्रयत्न करणे आवश्यक नव्हते का? #सांगा_ब्वॉ
#तुत्तेतमिने_हलामीथाले! #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
धर्मवादी आणि जातीवादी हेच आजचे रावण आहेत. पण त्यांची संख्या 95% आहे. त्यांना पेटवायचे कसे?
त्यामुळे शुभेच्छा
व्यवस्था परिवर्तन करायला निघालेले स्वतःच आहे त्या प्रस्थापित व्यवस्थेत शिरण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतांना दिसत आहेत का?
आयला तुम्ही कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी बांधिलकी ठेवून असाल तर तुमच्यासारखा विश्वव्यापी सदासुखी राजा कुणीच नाही राव! प्रसंग कोणताही, निमित्त कोणतेही, घटना कोणतीही असली तरी तुम्हाला स्वतःचे डोके चालवायची गरजच नाही. डोक्याला ताप द्यायची तर अजिबात गरज नाही. अभ्यास करून विचारपूर्वक बोलायची गरज तर अजिबातच नाही. काँग्रेसचे असाल तर काँग्रेसेतर पक्षांना शिव्या घालायच्या आणि भाजपचे असाल तर भाजपेतर पक्षांना शिव्या घालून मोकळे व्हायचे. तुमचा नेता म्हणेल तेच अंतिम सत्य! तुमचा पक्ष देईल तोच अंतिम न्याय!! तुम्ही फक्त सुरात सूर मिसळून री ओढायची. बस्स!!!
खरंच सांगा राजेहो! तुमच्याइतका सदासुखी बादशहा दुसरा कोणी असेल का या संबंध विश्वात?
#शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे #राजकारण #तर्कशास्त्र
माझी फेसबुक स्टेटस
फेसबूक पोस्ट
शेतीची लढाई आक्रमकपणे लढताना अत्रतत्रसर्वत्र मी माझ्या शत्रूची फौज निर्माण करून ठेवली आहे.
राजकीय दृष्टिकोन बाजूला ठेवून थोडासा विचार करावा.
आपल्या देशात जात आणि धर्म असे पिंजरे करून ती ती जात आणि तो तो धर्म स्वतःला स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी पिंजऱ्यामध्ये अडकवून घेतो. पिंजऱ्याच्या बाहेर पडून स्वतःला व्यापक करण्याची इच्छाशक्ती जातीचा गर्व असणाऱ्यांना आणि धर्माचा गर्व असणाऱ्यांना नसते.
त्यामुळे एक जात दुसऱ्या जातीला आणि एक धर्म दुसऱ्या धर्माला मतदान करण्यास तयार नसतो.
जर राजकीय यश मिळवायचे असेल तर या चौकटीच्या बाहेर पडून एकमेकात मिसळावे लागेल. एकमेकांची मने जिंकावी लागतील. जाती आणि धर्माच्या बाहेरील मतदार आपल्याला मतदान करेल अशी वर्तणूक करावी लागेल. असे करताना कोणी दिसत नाही.
कोणताही राजकीय पक्ष निवडून येण्याची क्षमता बघूनच तिकीट देणार. यापेक्षा वेगळे काही होऊ शकत नाही. निवडून येण्याची क्षमता नसलेल्यांना तिकीट देऊन कोणीही आपल्या पक्षाचा वाटोळ करून घेणार नाही.
जे बहुसंख्या आहेत त्यांना जात आणि धर्म दोन्ही परवडतात. त्यामुळे ते जाती-धर्माचे पिंजरे निर्माण करतात.
जो धर्म आणि ज्या जाती अल्पसंख्या आहेत त्यांना असे पिंजरे तयार करून त्यात बंदिस्त होणे राजकीय दृष्ट्या कधीही परवडणारे नाही. आजही नाही, उद्याही नाही आणि कदाचित हजारो वर्षानंतरही चित्र बदलणार नाही.
बहुसंख्य करतात म्हणून त्यांचेच अनुकरण करून आपणही स्वतःला जाती धर्मात बंदिस्त करून घेण्यात अल्पसंख्याकाचा मोठा घात होतो.
शेतकरी जर सक्षम झाला आणि आर्थिक संपन्न झाला तर *देवाघेवीच्या अटी* शेतकऱ्यांच्या हाती जातील. त्याची बार्गेनिंग पॉवर वाढेल. चांगला भाव मिळेपर्यंत तो शेतमाल विकणार नाही.
जर असे झाले तर शेतमाल स्वस्तात स्वस्त भावांने लुटणे शक्यच होणार नाही. *म्हणून शेतकऱ्याला कायमच "गरजू" ठेवणे आणि त्याला कायमचे कर्जाच्या ओझ्याखाली दाबून ठेवणे* हेच सरकार नामक राज्यकर्त्यांचे अधिकृत धोरण असते.
पक्ष, पक्ष नेते, उमेदवार राजकारण करिअर म्हणून करतात. मतदारांनी मतदान करिअर म्हणून करावे का?
शेतकऱ्याला वारंवार कर्जमाफी का दिली जाते? #तुम्ही_शोधा_उत्तर_मी_झोपतो
पुरोगामी महाराष्ट्रात पुरोगाम्यांचा आणखी किती राजकीय सत्यानाश व्हायला पाहिजे म्हणजे हे पुरोगामी सुधारतील?
कधीतरी आपल्याच आत झाकून बघू गरिबी का आली ते तरी शोधून बघू
मसनात जा, ढोड्यात जा, चुलीत जा, भोकात जा हे ग्रामीण भागात सहज वापरले जाणारे ग्राम्य शब्द असले तरी फक्त गावंढळ लोकच वापरत असतात.
#शुभरात्री_लोक्सहो #नुसता_भुताचा_बाजार #गंगाधर_मुटे
पूर्वी अज्ञानी लोकांना भूत-प्रेत-पिशाच्च झपाटायचे; आता ज्ञानी-विज्ञानी लोकांना राजकिय पक्ष आणि नेते झपाटून टाकतात. दोन्ही स्थिती एकसमान. गुणात्मक फरक काही नाही.
आज पाण्याच्या नळाच्या नळीतून पाण्याच्या धारेची धार न आल्याने आंघोळ धुवायची राहून गेलेली आहे.
सनातनी व पुरोगामी यांच्या कट्टरपंथी अतिरेकापेक्षा मतदारांना मोदींचा मध्यममार्गी देशधर्म जास्त भावला, हे खरे आहे.
© गंगाधर मुटे
विज्ञानवादी अभ्यास त्याचा, इतका विकसित झाला पिकवतोय म्हणे टक्कलावर तो, हिरवा भाजीपाला
HTBT तंत्रज्ञानाला विरोध करतात अन स्वतःला विज्ञानवादी समजतात. #तुत्ते_तमिने_हलामी_थाले!
फक्त एका बाजूची विनंती न ऐकता वटवृक्षाने नवऱ्यांचे मत सुद्धा विचारात घेऊन निर्णय घेतला पाहिजे.
#काय_म्हंता_लोक्सहो
"नासुकली" या बोलीभाषेतील शब्दाला समर्पक व तितकाच स्पष्ट अर्थबोध देणारा प्रमाणभाषेतील पर्यायी शब्द सुचवा. #RVKR
शेतातील वीज कापायला काल पवार-ठाकरेंचे कर्मचारी यायचे. यानंतर कदाचित फडणवीस-शिंदेंचे कर्मचारी येतील. म्हणजे शेतकऱ्यांच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल होण्याची शक्यता.
#वाजवा_टाळ्या_आणि_झोपा #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
केवळ शेतकरी विरोधी कायदेच नव्हे तर कायद्याचे जंगलच संपवणे आवश्यक आहे. म्हैस मनभर अन शिंगे टणभर.
आमच्याकडे 'पाऊस' कधीच येत नाही, नेहमी 'पानी' येत असतो. आज पण बऱ्यापैकी 'पानी' आला.
तुमच्याकडे काय येतो? पाऊस की पानी? #गंगाधर_मुटे आर्वीकर #RVKR
'भूक लागणे' हा रोग आहे आणि 'अन्न' हे त्यावरचे औषध आहे, जे आयुर्वेदिक आहे. #RVKR
अलोपॅथी की आयुर्वेद श्रेष्ठ या वादात गुरफटण्यापेक्षा माणसं वाचवण्याला प्राथमिकता देण्याची माणुसकी माणसात का असू नये? #RVKR
!!!! #विनोदाचावार_सोमवार !!!!
देरेनवेन्द्राचे सरकार म्हणजे "बंदीबाज" सरकार.
आता इलॅस्टीकवरही बंदी आणा म्हणावं. रस्त्याने चालताना घसरलेले पॅन्ट सावरत शाळेत चाललेली लेकरं बघायची मला ओढ लागली आहे.
शेतीच्या दुर्दशेला पाऊस अजिबात जबाबदार नाही.
शेतीच्या दुर्दशेला पाऊस सोडून अन्य घटकच जबाबदार असताना जो तो उठतो आणि पावसाला दुषणे द्यायला लागतो. चोर सोडून संन्याशाला फ़ासी, म्हणतात ना, ते यालाच. शेतीच्या दुर्दशेला जे घटक जबाबदार आहेत त्यांच्याविरुद्ध ब्र काढण्याची यांची औकात नाहीये कारण पगारवाढ, बढती, करचोरी वा अन्यहितसंबंधावर गदा येण्याची भिती
तो बिचारा पाऊस ह्यांचे काहीच बिघडवू शकत नाही म्हणूनच चेकाळत असावेत हे. "मोडक्या कूपावर लाथ द्यायची" सवयच अंगवळणी पडली ह्यांच्या.....!
शेतकरी संघटना ही एकमेव चळवळ आहे जी तर्कशुद्ध बावनकशी वैचारिक पायावर मार्गक्रमण करत आहे. यु. शरद जोशींनी मांडलेले शेतीचे अर्थशास्त्र व त्या अनुषंगाने अंगीकारावे लागणारे आंदोलनशास्त्र शास्त्रीय आणि तार्किक पातळीवर कोणालाही आजवर खोडून काढता आलेले नाही. पण बेरकी लोक नाव तर शरद जोशींचे घेतात पण यु . शरद जोशींचे तत्वज्ञान उलटे टांगणारे कार्य करत राहतात. मी त्यांचा निस्सीम अनुयायी आहे असाही आव आणत राहतात.
त्यामुळे शेतकरी आंदोलनाचा घात होतो आणि आंदोलन चार पावले पुढे जाण्याऐवजी चार पावले मागे जाण्याची भीती उत्पन्न होते.
#जौद्या_आप्ल्याले_काक्रा_लाग्ते #आप्ल्याले_गधं_घोडं_सारखंच #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
वडाचे झाड प्रचंड ऑक्सिजन देते हे त्या काळात सावित्रीला कळले होते... इतके तिचे विज्ञानावर प्रभुत्व असण्याची शक्यता आहे. तिला मेलेला नवरा जिवंत करण्याचे सायन्स त्या काळात अवगत असेल म्हणून तर तिने वडाच्या झाडाची निवड केली नसेल?
तसे असेल तर त्या काळातील विज्ञानाच्या तुलनेत आजचे विज्ञान फारच मागासलेले आणि चिल्लर स्वरूपाचे आहे असे म्हणावे लागेल. ===== प्राणप्रिय व्यक्तीचा (नवरा सुद्धा त्यात आला) सात जन्म सहवास मिळावा ही उत्तुंग प्रेमभावना आहे आणि ती भावना प्रदर्शित करण्यासाठी वटपूजा हे माध्यम आहे.
एका सावित्रीबाईने स्त्रियांना शिक्षण दिले. त्या शिक्षणाचा उपयोग समाजसेवेसाठी करण्याऐवजी चाणाक्ष महिलांनी चांगला, गलेलठ्ठ पगारवाला व देखणा नवरा मिळावा म्हणून केला. सावित्रीबाई फुलेंना उलटे टांगून वरून पुन्हा आम्ही पुरोगामी (अर्थात विज्ञानवादी सुद्धा) असल्याचा बडेजावही मिरवला.
एका जोतिबांच्या सावित्रीचा मदतीने शिक्षण घेऊन चांगला नवरा मिळवणे व दुसऱ्या सत्यवानाच्या सावित्रीच्या मदतीने तोच नवरा सात जन्म टिकावा म्हणून मग वटपूजा करणे...... हे चक्क मानसशास्त्रीय, गणितीय विज्ञान आहे. ज्यांना यात अंधश्रद्धा दिसते ते अविज्ञानी बैताडबेलने असतात. #गंगाधर_मुटे #तर्कशास्त्र
सृष्टी से पहले पृथ्वी नहीं थी, सूरज-चांद भी नहीं, अंतरिक्ष भी नहीं, तुम भी नही... केवल अकेला मै था! परेशान था!! आता तुमच्या संगतीने दिवस मजेत जातो.
#शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे #RVKR
"तुका म्हणे नटधारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी" उथळ विज्ञानवादी हे विधान विज्ञानात कसे बसवणार? संवैधानिक मान्यता कशी देणार?
आम्ही शेतकरी झाडे लावतो आणि झाडे तोडतो सुद्धा! कारण आम्ही कृतीशील कर्मयोगी आहोत. नुसते तोंडाने वाफ़ उडवणारे बोलघेवडे पर्यावरण वादी/प्रेमी/तज्ज्ञ नाहीत. तोंडाची वाफ़ दवडल्याने कुठे निसर्गाच्या आगगाडीचे इंजिन चालत असते?
पुरोगामी इतके थयथयाट करत आहेत की जणू जोतिष्यशास्त्राला मान्यता दिली तर पुरोगाम्यांचे दुकानच बंद पडणार आहे!
#गंगाधर_मुटे
भंपकपणा, पाखंडीपणा व ढोंगीपणा... काही धार्मिक, निधार्मिक, साधूबुवा, महाराज, सनातनी, पुरोगामी, आस्तिक, नास्तिक यांच्यामध्येही असतो. सर्वात कहर म्हणजे स्वतःला विज्ञानवादी म्हणवणारे सर्वात भयंकर पाखंडी असतात. त्यांना कवडीचेही विज्ञानाचे ज्ञान नसते.
#गंगाधर_मुटे #अनुभवशास्त्र
युगात्मा शरद जोशींसारखे आम्ही मॅचविनर खेळाडू नाहीत, हे खरे आहे पण आपापल्या क्षमतेनुसार जमेल तितके रन काढून मॅच जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे खेळाडू नक्कीच आहोत.
सर्व आजी-माजी-जुन्या-पुराण्यासहित नव्या दमाच्या होनहार खेळाडूंना विनंती आहे कि त्यांनी पॅव्हेलियन/ प्रेक्षकगॅलरीमधून मैदानात यावे. कर्णधार Anil Ghanwat यांचे नेतृत्वात मॅच जिंकू किंवा हरू पण संघर्ष तर नक्कीच करू, करत राहू. कटिबद्ध खेळाडूंच्या समर्पित खेळातूनच ट्रॉफीवर हक्क नोंदवायचा मार्ग जाऊ शकतो.!!!
- गंगाधर मुटे ~~~~~~~~~~~~~~ : डिस्क्लेमर : १) काही खेळाडूंना खेळाडू म्हणून खेळ दाखवण्यापेक्षा कर्णधार पदाची जन्मजात लालसा असते. त्या लालसेपोटी ते टीम मध्ये भांडणे लावून/फूट पाडून आपल्या समर्थकांचा गट करण्यात वस्ताद असतात. त्यांना मॅच जिंकण्यात वगैरे अजिबात रस नसतो. येनकेन प्रकारेन आपल्याला कर्णधार पद कसे मिळेल या अविचाराने पछाडलेले असल्याने ते सतत कर्णधाराविरुद्ध कारवाया करण्यात गुंतलेले असतात. अशांनी कृपया आमच्यात मिसळू नये. मात्र ज्यांना धीर धरता येतो त्यांचे स्वागत असेल कारण आमच्या टीमचा कर्णधार दर दोन वर्षांनी बदलत असतो. कुणीही आपली कर्तबगारी सिद्ध केल्यास भविष्यात त्यांचे हाती कर्णधारपदाची सूत्रे जाण्याची नैसर्गिक संधी असते. आम्ही दर दोन वर्षांनी सक्षम कर्णधाराच्या शोधात असल्याने कर्णधार पदायोग्य सक्षम खेळाडूचे अधीक पर्याय उपलब्ध झाल्यास आम्हाला त्याचा आनंदच वाटेल.
२) काही खेळाडू स्वतःला महान खेळाडू समजतात. प्रत्यक्षात ते खेळाडूच नसतात. त्यांना बॅट-बॉल हातात धरता येतच नाही पण साधे क्षेत्ररक्षण करण्याची देखील त्यांची कुवत नसते. मात्र त्यांची जीभ प्रचंड वेगवान गतीने चालत असल्याने ते अहोरात्र प्रशिक्षकाच्या भूमिकेत वावरत असतात. संपूर्ण टीमने त्याच्या इशाऱ्यानुरूप कार्य करावे, असा त्यांचा अट्टाहास असतो. कृपया त्यांनी लक्षात घ्यावे कि आमची कार्यकारिणीच आमची प्रशिक्षक असते. आमची टीम लोकशाहीवर विश्वास ठेवणारी असल्याने काय निर्णय व्हायचे ते कार्यकारिणीत कधी एकमताने तर कधी बहुमताने होत असतात. ते सर्वांना बंधनकारक असतात. कार्यकारिणीत सर्वांना आपले विचार ठेवण्याची संधी असते. तिथे आपले विचार मांडून प्रत्येकजण संधीचा लाभ घेऊ शकतो.
~~~~~~~~~ ता. क : हे ललित लेखन असून कोणत्याही संघटनेचा अथवा पक्षाचा या लेखनासोबत काहीही संबंध नाही. काही बाबी सुसंगत जाणवल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. ~~~~~~~~~
सध्या शेतकरी आंदोलन फुल फॉर्मात आहे. पण खेळाडू दुर्दैवाने "चौफेर गोलंदाजी" करत आहेत. त्यामुळे सरकारी फलंदाजी नाबाद राहून कायमच खेळपट्टीवर पाय रोवून टिच्चून उभी आहे.
फलंदाजी चौफेर करायची असते. गोलंदाजी नेमकी विकेटच्या दिशेने करायची असते. खेळाडूंना हे मर्म जेव्हा कळेल तेव्हाच ही मॅच निर्णयाच्या व जिंकण्याच्या दिशेने जाईल, हे लक्षात घ्यायला हवे.
- गंगाधर मुटे ~~~~~~~~~~~~~
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कोणत्या ग्रहावरची मराठी असेल ही
#जौद्या_आप्ल्याले_काक्रा_लाग्ते #शुभरात्री_लोक्सहो
मुख्यमंत्री माझी लाडकी बायको... अशी पण एखादी योजना येऊ द्या करा भाषेचा सत्यानाश #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
शेतकरी विरोधी कायदे येण्यापूर्वी भारतीय शेतकरी हेलिकॉप्टरने शेतीवर जात होता का?
"तुला सोडून मी पळून येऊन दुसऱ्याशी लग्न केले असले तरी मी अजून तुझीच बायको आहे. तुझ्याच नावाचे कुंकू माझे कपाळावर कालही होते, आजही आहे आणि उद्याही राहील." - सौ. बंडखोरीन
#शुभरात्री_लोक्सहो #लोकशाही #गंगाधर_मुटे
पोलिस खात्यासाहित बहुतांश तपास यंत्रणा म्हणजे सत्ताधाऱ्यांचे दोन पैसे मिळवण्याचे प्रमुख स्त्रोत असतात. अगदी देणगीदात्यांना भय दाखवून निधी मिळवण्यासाठी या यंत्रणांचा उपयोग होतो. त्यामुळे "मी नाही त्यातली... कडी लावा आतली" ही राजकारण्यांची भाषा म्हणजे शुद्ध ढोंगधतुरेच ठरतात.
ज्याला विज्ञानाचा अभ्यास असतो त्याला विज्ञानाची लांबी, रुंदी, उंची, खोली वगैरे कळत असल्याने विज्ञानवादाचा उगीच डांगोरा पिटत तो गावभर फिरुच शकत नाही.
#गंगाधर_मुटे #तर्कशास्त्र
फेसबुकवर पाय ठेवला की जिकडेतिकडे 'हे' मोदींना तर 'ते' राहुल/उद्धव/पवारांना बदडतांना दिसतात. मग मी 'हे' व 'ते' ला बदडतो. #RVKR
एका मतिमंद अविचारी व्यक्तीच्या नजरेत दुसरा अतिमतीमंद अविचारी व्यक्ती देखील भयंकर विचारवंत असू शकतो. (जशी दृष्टी तशी सृष्टी)
शेतकरी संघटनेची गाडी रुळावरून घसरू द्यायची नसेल तर कुणाला तरी हातात हातोडा घेऊन गॅंगमनचे कार्य निरंतर करावेच लागेल.
मार्शल प्लॅन व कर्जमुक्तीचे आंदोलन दाबण्यासाठीच वेगवेगळ्या मागण्या पुढे करून शेतकरी आंदोलनाला वेगवेगळे फाटे फोडण्यात आले.
कोणताच व्यक्ती परिपूर्ण असू शकत नाही. कुणी सज्ञानी अथवा कुणी अज्ञानी असू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती केवळ काही विषयात सज्ञानी व उर्वरित अन्य सर्व विषयात अज्ञानीच असतो. जो स्वतःला सज्ञानी समजतो त्यांच्याइतका अज्ञानी कुणीच नसतो.
#गंगाधर_मुटे #विज्ञान #तर्कशास्त्र
शरद जोशींनी ऐकले नाही म्हणून त्यांची साथ सोडणारे बहुतेकजण नराचे नारायण होण्याऐवजी नराचे वानर झालेले आहेत.
माझ्या शेपटीवर कुणी पाय दिला तर माझे पित्त खवळते, तळपायाची आग मस्तकात जाते.
निष्कर्ष : यावरून मला शेपटी असेल असे वाटते.
शेतकरी संरक्षक व शेतीपूरक असा एकही कायदा या देशात अस्तित्वात नाही. असेल तर #सांगा_ब्वॉ जाहीरपणे
सर्व शासकीय नोकऱ्या 35 ते 40 टक्के मार्क्स मिळवणाऱ्यासाठी आरक्षित करून त्यापुढील गुणवत्तेला शेती, व्यापार, उद्योगात गुंतवा.
नोकरदारांची राष्ट्रविकासात शून्य भूमिका असते.
#गंगाधर_मुटे #विकास_शास्त्र
माणसाचे विचार करण्याचे इंद्रिय हे मेंदू नसून खिसा आहे.
- युगात्मा शरद जोशी
गुणवत्ता प्राप्त गुणवत्तेला शेतीत पाठवा. मातीची गुणवत्ता वाढते की गुणवत्तेची माती होते, बघुयात!
धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी निर्माण केलेले साधन म्हणजे कायदे. एक साधन नष्ट केले तर दुसरे साधन त्याची जागा घेते. धोरण कायम राहते
15 ऑगस्ट हा शेतकऱ्यांचा स्वातंत्र्यदिन आहे का?
हो किंवा नाही... उत्तर द्या.
'कायदे' शब्द घेऊन मी बऱ्याच कविता लिहिल्या. त्यातील एक महत्त्वपूर्ण कविता.
https://www.baliraja.com/node/1774
"दीन" शेतकऱ्यांचा म्हणे आज "दिन" आहे.
#गंगाधर_मुटे #शेतकरी
शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा भिडवून लढणाऱ्यांना कंगाल तर शेतकऱ्यांना लुटून जगणाऱ्यांना मालामाल करण्याचे काम शेतकरीच करतात.
*पुढील पिढीने काय बोध घ्यावा?*
कुणी स्वतःला महान समजत असेल तर मी त्याहूनही महान आहे. कुणी स्वतःला लहान समजत असेल तर मी त्याहूनही लहान आहे.
#साधीसोपी_जीवनशैली
"दीन" शेतकऱ्यांनो आज तुमचा "दिन" आहे. नाचा, कुदा, मारा उड्या
#शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे #शेतकरी
आर्द्रा आणि पुनर्वसू नक्षत्रांचे वाहन मेंढा व गाढव आहे. मेंढा व गाढव वाहन असेल तर पाऊस अत्यल्प आणि अनियमित पडतो, असे पंचांग सांगते. सध्या तसेच घडत आहे. या शास्त्राला अप्रगत शास्त्र म्हणता येईल पण थोतांड कसे म्हणता येईल.
कशासाठी विचारावे की पक्ष तुझा कोणता तुझे कूळच तर सांगते की पक्ष तुझा कोणता
© गंगाधर मुटे #माझी_वाङ्मयशेती #लोकशाही #पचायला_अवघड_डोज
डॉ. आंबेडकरांचे मूळ संविधान विद्रुप करून राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांसाठी स्मशानभूमीपर्यंतचा गुबगुबीत रस्ता तयार केला आहे.
इस्रायलीपेक्षा भारतीय शेतकरी अधिक गूणवाण आहेत पण ते सरकार त्यांना तळहातावर जपतं व हे सरकार आम्हाला लाथेखाली दाबतं.
सर्व शहरात "पाणी अडवा, पाणी जिरवा" सुरु करा. म्हणजे त्यांना शेतीचे पाणी चोरण्याची गरज भासणार नाही.
शेतीमध्ये जातो जो जो । मातीमोल होतो तो तो । अशी अनीतीची नीती । कोण धोरणे आखतो? ॥
आम जनता राजकारणापायी पिसाळल्याने स्पंदनांची आंदोलने मृत होऊन शोषितांना मारक व शोषकांना पोषक ठरत आहे.
आधुनिक सुविचार/उपदेश
कोणत्याही पक्षाचा चाटू, चमचा, भक्त बनण्याऐवजी समर्थक बना... म्हणजे निदान कमरेचे सोडून डोक्याला तरी बांधता येईल.
पण जर आपण चाटू, चमचा, भक्त म्हणून राहिलात तर कमरेचे सोडून डोक्याला बांधायची सुद्धा संधी मिळायची नाही.... कमरेचे सोडून चक्क खुंटीलाच लटकवावे लागेल.
नाहीतर थेट राजकारणात उतरा. राजकारणी व्यक्तीला साम, दाम, दंड, भेद, छल, कपट, नीती, अनिती यापैकी सर्व पर्याय वापरण्याची मुभा असते. अशी मुभा मात्र चाटू, चमचे आणि भक्तांना नसते. कृपया नोंद घ्या.
#राजकारण #गंगाधर_मुटे
BRS मध्ये जाताय? जा. पण याद राखा.... तुमच्याकडे राजकीय मूल्य नसल्याने तो पक्षही तुम्हाला एक दिवस कचरापेटीत टाकेल.
कुटील-कारस्थानी म्हणून जर एखाद्याची प्रतिमा तयार झाली तर आप्त, मित्र सोडा... त्याची बायको सुद्धा त्याच्या पासून सावध होते. असफल दिसणारा सरळमार्गी मात्र आयुष्यात सहज सफल होतो.
पूर्वी भूतप्रेतसैतानाची भीती दाखवून भोंदूगिरी चालायची; आता ग्लोबल वॉर्मिंगची भीती दाखवून क्वालिफाईड भोंदूगिरी चालते.
कसलं आलं बोडक्याचं क्लायमेट चेंज? ही केवळ अनादी काळापासून चालत आलेली व अनादी काळ चालणारी नैसर्गिक विविधता आहे.
पाण्याच्या प्रवाहाला उतार लागतो. असा उतार उपलब्ध नसला की मुंबईची तुंबई होते, इतकेही ज्यांना कळून उपाय योजना करण्याची अथवा भविष्याचा वेध घेण्याची ज्यांची क्षमता नसते, त्यांना ग्लोबल वॉर्मिंगचे लक्षणे दिसतात म्हणे!
पाणी घालून प्या रे बेवड्यांनो!
राजकारण्याइतक्या गलिच्छ डोक्याने घाणेरडे विचार सामान्य जनता करू शकत नसल्याने त्यांना राजकीय छक्केपंजे, डावपेच कळत नाहीत.
डावपेच म्हणजे आपण डाव टाकणे आणि इतरांना पेचात पाडणे
#डावपेच #राजकारण #गंगाधर_मुटे
"शेतीतील गरिबीचे मूळ शेतकऱ्यांच्या अज्ञानात आहे" हा विचार शरद जोशींनी पराभूत केला. त्याला आताही उचल खाऊ दिली जाणार नाही.
मंत्रोच्चाराने गहू पिकवला तर 563/- ₹ प्रति किलो पडतो. कुणाकुणाची औकात आहे खरेदी करण्याची? हात वर करा बघू!
आयुष्य म्हणजे पेंडूलम, दोलायमानी मॅच असते कधी धोनीचा सिक्सर तर, कधी सूर्याची कॅच असते
#गंगाधर_मुटे #रानातला_शेर
अन्न,वस्त्र,निवाऱ्याचा बोजा उचललाच आहे. प्रजननाचा बोजाही शासनाने उचलून जनतेवरील बोजा कमी करणे, इतकेच बाकी उरले आहे.
शेतीची किंमत लाखो-करोडोत असल्याने शेतकरी निर्धन नसतो. सवलतीवर फक्त गरिबांचा, अपंगांचा, दीनदुबळ्यांचा हक्क असतो, शेतकऱ्याचा नाही.
शेतीसंपत्ती करोडो रुपयाची पण सरकारविरोधात लढण्याची कुवत नसल्याने शेतकरी भिकारी, कंगाल व लाचार!
"हरामखोरहो! तुम्ही उद्या खाणारच आहात, मग त्यातला एक हिस्सा मला आजच देऊन टाका" असे मनाशी म्हणत जे लोक मतदानासाठी पैसे मागतात... खरंच त्यांचं काही चुकते?
#तुम्ही_शोधा_उत्तर_मी_झोपतो #शुभरात्री_लोक्सहो #लोकशाही #गंगाधर_मुटे
भाजपचे उच्चपदस्थ नेते शेतीनिरक्षर असल्याने ऐताडा-बैताडांच्या भोंदूगिरीला बळी पडतात व झिरोबजेट शेतीचा डमरू वाजवतात.
अन्न स्वस्तात मुबलक उपलब्ध असल्याने झिरोबजेटवाल्यांना अन्नाचा उतमाज आलाय. एकेका घासासाठी तळमळायची वेळ आली की उतमाज आपोआप उतरेल.
हल्ली लग्नाला मुली मिळणेअवघड झाल्याने आता "बेटा बचाओ" च्या कविता लिहिणे सुरु करावे का? की अजून काही दिवस थांबावे?
राशन कार्डावर एक पती/पत्नी व दोन मुले सवलतीच्या दरात उपलब्ध झाले की देश महासत्ता झाला असे समजावे.
'सच्चे दिन' म्हणता म्हणता 'लुच्चे दिन' आले अन शेतमालाचे भाव तमाम लंबेलाट झाले ....॥
#गंगाधर_मुटे #शुभरात्री_लोक्सहो #रानातला_शेर
बुद्धिबळ, भुजबळ व आर्थिक बळाचे पाठबळ एक झाल्यास नीतीचे मानसिक बळ खचून मनुष्यबळ दुर्बळ होते.
#जौद्या_आप्ल्याले_काक्रा_लाग्ते
मला तपास यंत्रणेचा चीफ बनवा, भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली मी एकोणएक सारे राजकारणी जेलमध्ये टाकून दाखवतो. जेलच्या बाहेर एक जरी राजकारणी दिसला ना.... तर तुम्ही पैज हरलात असे समजून तुम्ही खुशाल आत्महत्या करू शकता...!
आदीमयुगात #झिरोबजेट आदिमानवाचे होते. कलियुगात झिरोबजेट फक्त जनावरांचे असते.
आता आपल्याला अंगाभवती कपड्याऐवजी रानकेळीची पाने गुंडाळायची संधी मिळणार! #झिरोबजेट मला बंबाड आवडलं ब्वॉ! तुम्हाला?
आयुष्याच्या वळणावरती जेव्हा पुरता दमून गेलो पोट बांधले पायाशी अन् हात हवेचा धरून गेलो
#रानातला_शेर #गंगाधर_मुटे
माझेकडे ३१५६ कोटी रु. आणून द्या. मी सरकार पाडून दाखवतो. जर मी पैज हरलो तर देश सोडून (माल्ल्याच्या शेजारी राहायला) जाईन... पुन्हा तुम्हाला तोंड दाखवणार नाही.
माझेकडे ३१५६ कोटी रु. आणून द्या. मी सरकार पाडून दाखवतो. जर मी पैज हरलो तर देश सोडून (माल्ल्याच्या शेजारी राहायला) जाईन. त्याच पैशात तिकडेच ऐष करीन. ;(
शेती विरोधी कायदे रद्द करा : मागणीतील फोलपणा
प्रश्न : मुटे सर, कायदे रद्द झाल्याने काय होईल असा आपण प्रतिप्रश्न केल्याने माझा गोंधळ उडाला आहे. म्हणून आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी काय केले म्हणजे आर्थिक प्रश्न सुटेल ह्याबद्दल योग्य मार्गदर्शन करून आमच्या सारख्या कार्यकत्यांचे अज्ञान दूर करावे.
उत्तर : Ramkishanappa Rudraksh उत्तर सोपं आहे फार अवघड नाही पण त्यासाठी नीट विचार करून चिंतन करण्याची गरज आहे.
1. कोणतेही सरकार आधी कायदे बनवत नाही. आधी धोरण ठरते मग त्यानुसार कायदे बनवण्यात येतात. 2. शेतीविरोधी धोरण जर बदलायचं नसेल तर कोणतेही सरकार कायदे बदलणार नाही. 3. समजा कायदे बदलले पण धोरण कायम ठेवलं तरी शेतीची लूट थांबू शकत नाही. 1950 पूर्वी तुम्ही म्हणता ते शेती विरोधी कायदे नव्हते. मग 1950 पूर्वी शेतीचे शोषण होत नव्हते का? 4. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कोणत्याही युगात, कोणत्याही शतकात शेतीला अनुकूल असे कायदे बनवण्यात आलेले नाहीत त्यामुळे शेतीला संरक्षण मिळाले नाही. आजही शेतीला अनुकूल असे कायदे नाहीत. 5. शेतीला अनुकूल कायदे तेव्हाच बनतील जेव्हा सरकारचे धोरण बदलेल. आहे ते काही कायदे रद्द केले आणि शेतीला अनुकूल कायदे तयार केले नाहीत तरी शेतीचे शोषण थांबू शकत नाही.
निष्कर्ष असा की जोपर्यंत धोरण बदलत नाही तोपर्यंत काही कायदे रद्द करूनही काहीही उपयोग नाही. कारण जे कायदे वाचतील तेवढेच कायदे शेतीचे शोषण करण्यासाठी पुरेसे ठरतील.
काही कायदे रद्द केल्याने शेतीचे प्रश्न सुटतात हा विचार निव्वळ भाबडेपणाचा आहे. त्यासाठी एक उदाहरण देतो.
समजा एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा खून करायचे ठरवले आणि त्यासाठी हत्यार म्हणून तलवार हाती घेतली तर... त्याच्या हातची तलवार काढून घ्या म्हणजे तो खून करणार नाही... हा विचार भाबडेपणाचा आहे कारण जोपर्यंत तो खून करण्याचा निर्णय/नियत/धोरण बदलणार नाही तोपर्यंत त्याला खून करण्यापासून कोणी अडवू शकणार नाही. तुम्ही तलवार जरी हिसकावून घेतली तरी तो हातात लाठी घेईल, काठी घेईल, बंदूक घेईल किंवा दगड धोंडे घेईल पण तो उद्दिष्ट पूर्ण करेल.
निष्कर्ष हाच की कायदे रद्द करा असे म्हणणे म्हणजे हातातली तलवार हिसकावून घ्या असे म्हणण्यासारखे आहे.
जोपर्यंत नियत/धोरण बदलत नाही तोपर्यंत अंतिम उद्दिष्ट प्राप्त होणार नाही.
म्हणून युगात्मा शरद जोशी म्हणाले होते "शेतकऱ्याचे मरण हेच शासनाचे धोरण" म्हणून ते युगात्मा होते, शेतकऱ्यांचे पंचप्राण होते, कुशल शेतकरी नेते होते आणि थोर आंदोलक सेनापती होते.
तुम्हाला युगात्मा शरद जोशींच्या पुढे जायचे असेल तर त्या पलीकडला विचार करावा लागेल आणि त्या पलीकडील आंदोलन शास्त्र मांडावे लागेल. मुर्खासारखे काहीच्या काही आतार्किक बोलून युगात्मा शरद जोशीपेक्षा मोठे होता येणार नाही.
तमाशामध्ये आपल्याकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या ललना वेगवेगळे ॲटम पेश करतात. तुम्ही सुद्धा त्यासारखेच जनतेचे लक्ष वेधण्यासाठी शेतीविरोधि कायदे रद्द करा, शेती विरोधी कायदे रद्द करा असे म्हणून आपला ॲटम पेश करून लोकांचे लक्ष वेधून घेत असता. या पलीकडे तुमच्या मागणीला काहीही अर्थ नाही. उगीच शेतकरी आंदोलन कमजोर करण्यात काहीही अर्थ नाही.
जोपर्यंत सरकारचे शेतीविरोधी धोरण बदलून शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळण्यासाठी शेतीला अनुकूल धोरण तयार होत नाही तोपर्यंत ना शेतीचे दारिद्र्य संपणार आहे ना देशाची गरीबी संपणार आहे.
मा. शरद जोशी यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे :
- महात्मा ज्योतिबा फुल्यांची एका बाबतीत चूक झाली, त्यांनी असे मानले की ब्राम्हण-भटजी कारकुनांऐवजी जर शेतकर्याच्या जातीचे, त्यांच्या नात्यागोत्यातले कारकून आलेत तर ते शेतकर्यांशी जास्त सहानुभूतीने वागतील आणि पिळवणूक कमी होईल पण आता क्रित्येक ठिकाणी भट कारकून गेलेत आणि त्यांच्या ऐवजी शेतकर्याच्या जातीचे कारकून आलेत, पण शेतकर्यांची पिळवणूक काही कमी झाली नाही, याउलट ते भटकारकुनांपेक्षा जास्त जोमाने व ताकदीने दुष्टपणे पिळायला लागले आहेत. - साखर, कांदा, बटाटा ही काही जीवनावश्यक वस्तू आहे काय? साखर, कांदा, बटाटा खाल्ला नाही तर माणूस मरत असतो काय? उलट साखर खाल्ल्यामुळे लोकांना डायबिटीस व्हायची भिती असते. डायबिटीसने मरण्याची शक्यता असते. उलट औषधाच्या गोळ्या माणसाचा जीव वाचवतात पण औषधाच्या गोळ्यांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश नाही. - काँग्रेसही तेच करत होती आणि नरेंद्र मोदी तुमच्या-आमच्या शेतकर्यांच्या जातीचे असले तरी तेच करत आहेत. त्यामुळे आता आपल्याला आंदोलनाच्याच मार्गाने जावे लागणार आहे. - नाशिक येथे ४ ऑगष्टला कांदा उत्पादक शेतकरी मेळावा आहे. कांदा व बटाटा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून काढून टाकावा यासाठी, सत्ताधार्यांना हादरा बसेल असे आंदोलन मी जाहीर करणार आहे. मी शरीराने थकलो असलो तरी मनाने थकलेलो नाही. रस्ता रोको आणि रेल्वे रोको आंदोलनाचे प्रत्यक्ष रणांगणात उतरून मी नेतृत्व करेन. - शेती आणि शेतकरी यांच्यासाठी हा अर्थसंकल्प निराशाजनक व डोंगर पोखरून उंदीरही निघू नये असा आहे. 'भारत' आणि 'इंडिया' यांच्या लढाईत भारत पराभूत झाला आहे.
दलाल संपवण्यासाठी ग्राहकांनी "ग्राहक गट/कंपनी" करून बांधावर शेतमाल खरेदीसाठी आले पाहिजे.
शेतीतल्या प्रत्यक्ष कष्टाने महिनाभरात सावळ्याचा काळा झालो. तोंड दाखवायला जागा नाही राहिली राव! "तोंड काळे करणे" चा खरा अर्थ हाच?
प्रॉडक्शन, प्रॉसेसिंग, मार्केटिंग शेतकर्यानेच केली तर संडासला तरी वेळ वाचेल का त्याचेकडे?
#सांगा_ब्वॉ #शुभरात्री_लोक्सहो
शालेय/विद्यापीठीय परीक्षा म्हणजे बुद्धिमत्तेची परीक्षा नसून केवळ स्मरणशक्तीची परीक्षा असते.
#गंगाधर_मुटे आर्वीकर #RVKR
!!! #विनोदाचावार_सोमवार !!!!
शेतीनिर्णय घेताना व त्यावर अंमल करताना सुविद्य-सुसंस्कृत-सुसभ्य-विद्याविभूषित शासनाने जेवढ्या कोलांटउड्या मारल्या आहेत; तेवढ्या उत्क्रांतीपूर्व माकडांनीही मारल्या नसतील.
सध्या बहुतांश महिला बचत गट कर्जाचे व्याज व किस्ती फेडत बँकांना जगवण्याचे महापुण्य मिळवत आहे.
पाऊस आलं पूर आलं हिरवं स्वप्न वाहून गेलं
#गंगाधर_मुटे #दीर्घमहाकाव्य
पाऊस तुमचा गुलाम नाही. त्याच्याकडून फाजील अपेक्षा करू नका. शेतकऱ्यांनो! अपेक्षा कुणाकडून करायच्या ते आधी शिका.
भिकारी आणि शेतकरी यांचेकडे भांडवल नसल्याने एक भीक मागतो तर दुसरा कर्ज/अनुदान!
शारिरिक अपंग व्यक्तींना खरी मानवी मदतीची गरज आहे. लोक त्यांना मदत करायची सोडून धडधाकट शेतकर्याला मदत करायला, त्यांना भीक वाढायला, त्याच्या बायकोला साडीचोळी द्यायला का धावतात, याचे मला कधीच उत्तर मिळत नाही.
बिचारे अपंग काम करू शकत नाहीत, म्हणून त्यांना मदतीची सक्त गरज असते.
शेतकरी काम करू शकतो, त्याला मदतीची गरजच काय? फ़क्त घामाचे दाम दिले की एका झटक्यात प्रश्न सुटतो पण लोक कित्ती महान आहेत बघा, शेतकरी भिकारी नसूनही त्याला पहिल्यांदा भिकारी बनवतात आणि मग मदतीची भीक वाढायलाही हिरिरिने धावतात!
जे नियमित कर्जफेड करतात त्यांना इन्सेटिव्ह म्हणून ५० हजार दिल्याने शेतकरी आत्महत्त्या कशा थांबतील? मुख्यमंत्र्यांचा वादा भलताच आणि घोषणा भलतीच? ये कैसी है पहेली... जनाबेअली?
#शेतीचे_अनर्थशास्त्र #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
शेतकरी कार्यकर्त्यांसाठी....! या विषयावर माझं थोडं वेगळं पण ठाम मत आहे की, आपण कोणी महात्मा, युगपुरुष, थोर, महान यापैकी कोणी असू तर आपण संबंध जगच काय संपूर्ण सृष्टी आणि मनुष्यप्राण्याचा, जीवजंतूंचा देखील विचार करायला आणि त्यांचे प्रश्न सोडवून त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करायला हरकत नाही. पण आपण जर सामान्य सर्वसाधारण मनुष्य असू तर आपणाला नक्की मर्यादा आहेत. विचारशक्तीला व कृतीलाही मर्यादाच मर्यादा आहेत. अशा स्थितीत जर आपण सर्वव्यापी प्रश्नांचा विचार करून त्याची सोडवणूक करण्यासाठी दंड थोपटून उभे राहिलो आणि स्वत:ची आहुती जरी दिली तरी त्यातून काहीही निष्पन्न होण्याची शक्यता नाही. एक ना धड भाराभार चिंध्या यापलिकडे कोणताही चांगला निकाल आपल्याबाजूने मिळण्याची शक्यता नाही. हे खरे आहे की आपल्यासमोर, आपल्या समाजासमोर, आपल्या राज्यासमोर किंवा आपल्या देशासमोर हजारोच नव्हे तर कदाचित लाखो प्रश्न असतील. त्यातील काही मुख्य असतील जसे की आतंकवाद, भ्रष्टाचार, काळा पैसा, भृणहत्त्या, नासलेली शासनव्यवस्था वगैरे वगैरे. पण हे सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आपण शेतीचा प्रश्न सुटल्यानंतर करायला काय हरकत आहे? किंवा आपण केलाच पाहीजे असे तरी आवश्यक कुठे आहे? हा विचार करायला देशामध्ये मुंग्यांच्या रांगा लागाव्या तशा राजकीय पुढारी, प्रशासन, समाजसेवक, तज्ज्ञ, विद्वान, लेखक, कवी, विचारवंत, पत्रकार यांच्या रांगा लागल्या आहेतच. फ़क्त शेतीत सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी "शेतमालाचा भाव" हाच विषय घेऊन लढणारांची वानवा आहे. जे काही आहेत त्यांनीही जर शेतीसोबतच अन्य विषयावर लक्ष केंद्रीत करायचे ठरवले तर शेती हा विषय त्याच्या विचारात आणि कृतीत दुय्यम स्थानी कधी येईल, काही सांगता येत नाही. इतिहास साक्षी आहे की शेतीविषय घेऊन लढायला निघालेले रथीमहारथी कधी शेतीच्या लुटीच्या व्यवस्थेत सामील होऊन शेतीच्या लुटीला हातभार लावते झाले, हे त्यांचे त्यांनाही कळले नाही. म्हणून मला असे वाटते की आपल्याला गरज आहे ती फ़क्त शेतीच्या प्रश्नावर संपूर्ण एकाग्रतेने लक्ष केंद्रीत करण्याची.
- गंगाधर मुटे ~~~~~~~~~~~~~~
स्वतः श्रद्धा बाळगणे किंवा दुसऱ्याच्या श्रद्धेला अंधश्रद्धा समजणे... या दोन्ही अवस्था स्वतःच स्वतःच्या मनाची समजूत घालणाऱ्या आहेत... श्रद्धा-अंधश्रद्धा शब्द ओलांडले की तिथून पुढे खरे ज्ञान-विज्ञान सुरू होते.
शेतीच्या शोषणासाठी धोरणात्मक क्लुप्त्या जो शोधतो तोच सरकारमान्य शेतीतज्ज्ञ/अर्थतज्ज्ञ असतो.
अति पावसापायी बेजार झालेल्या मुंबईकरांचे मराठवाड्यात स्थलांतर करून 50 टक्के अनुदानावर घरकुल देऊन त्यांचे पुनर्वसन केले पाहिजे.
खाड्या बुजवून माड्या बांधल्या, आता माड्या पाडून खेतीवाड्या करा, मस्त पाऊस पडतो आजकाल मुंबईत! चांगले पीक येणार हमखास!!
नेमकी व प्रभावी राजकीय भूमिका न घेता येणाऱ्या चळवळींची अवस्था वाघ गळलेल्या दातासारखी असते.
कोणत्याही चळवळीसाठी राजकारण हे बायप्रॉडक्ट किंवा बोनससारखे असते. मुख्यप्रवाह असू शकत नाही.
माणसाने निर्माण केलेला देव आणि माणसाला निर्माण करणारा देव हे फार परस्परभिन्न देव आहेत, असे माझे स्पष्ट मत आहे.
इंग्रजांना बिनडोक पण प्रचंड स्मरणशक्ती असलेली नोकरशाही हवी होती. त्याला अनुरूप त्यांनी अंगभूत कौशल्याची माती करणारी सांगकामी कारकुनी शैक्षणिक प्रणाली निर्माण केली. त्याचाच परिणाम असा की कागदाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले.
काही विचार करू नका. झोपा यथेच्छ. #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
शेती मरून उताणी पडलेल्या देशाची अर्थव्यवस्था *Dead* असणारच! Thanks रे Trump तात्या
तुम्ही करा विचार मी झोपतो #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
प्रतिक्रिया
01/10/2024
गायीच्या पालन-पोषणासाठी एका गाईमागे दरमहा रु. 5000/- सरकारने दिले पाहिजे. तुमची माय शेतकऱ्यांनी का पोसावी?
शेतकरी तितुका एक एक!
गंगाधर मुटे बुध, 02/10/2024
"प्रत्येक जीवजंतूंचा धर्म वेगवेगळा व ज्याच्या त्याच्या प्रकृतीवर अवलंबून असतो." - भगवान श्रीकृष्ण
#शुभरात्री_लोक्सहो #धर्म
शेतकरी तितुका एक एक!
02/10/2024
राज्यमातेला मतदानाचा अधिकार असता तर ती सुद्धा 1500 वाली "लाडकी माय" झाली असती.
#शुभरात्री_लोक्सहो
शेतकरी तितुका एक एक!
30/09/2024
शेतकऱ्याला "राज्यगुलाम" घोषित करा. बास्स! इतकंच बाकी राहिलेलं आहे.
#शुभरात्री_लोक्सहो
शेतकरी तितुका एक एक!
26/09/2024
इंडिया म्हणतो अख्खी शासकीय तिजोरी
आमच्याच घशात घाला...
भारत मेला तरी चालेल.
#गंगाधर_मुटे #शुभरात्री_लोक्सहो
शेतकरी तितुका एक एक!
25/09/2024
देशावर आणि राज्यावर झालेले कर्ज जनहिताच्या योजना मुळे नव्हे तर वेतन आयोगामुळे झालेले आहे.
#गंगाधर_मुटे #शुभरात्री_लोक्सहो
शेतकरी तितुका एक एक!
३ १ /० ९ /२ ० २ ४
शेतकरी तितुका एक एक!
० २ /१ ० /२ ० २ ४
शेतीव्यवसाय मुख्यत्वे ज्या जातींच्या हाती आहे दुर्दैवाने त्याच जातींना "जातीच्या राजकारणाचे" प्रचंड वेड आहे.
शेतकरी तितुका एक एक!
03/10/2024
पूर्वी लेख पाठवायचो तर ते छापत नव्हते. आता संपादक फोन करून लेख मागतात आणि मला वेळ नाही.

#शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
03/10/2024
माझ्या जन्मदिवशी (२७ फेब्रू) मराठीला अभिजात दर्जा मिळाला असता ... तर सोन्याहून पिवळे झाले असते. सरकारचे अभिनंदन!
#गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
04/10/2024
भारताचे शस्त्र अर्थात आंदोलनशास्त्र
मी अमुक-अमुक पक्षाला कधीही मतदान करणार नाही, असे म्हणणे आंदोलन शास्त्रात बसत नाही. तसेच एखाद्या पक्षाची बांधिलकी स्वीकारणे सुद्धा आंदोलन शास्त्रात बसत नाही.
.... कारण एकदा जर एखाद्या पक्षाला खात्री झाली कि तुम्ही कधीच त्यांना मतदान करणार नाहीत तर तुमच्याविषयीची त्या पक्षाची अनुकूलता संपुष्टात येईल.
आणि
....... ज्या पक्षाला तुम्ही मतदान करणारच आहात अशी खात्री होईल तो पक्ष तुम्ही त्यांच्या खुंट्याला बांधलेलेच आहात असे गृहीत धरून तुमच्याविषयीची त्या पक्षाचीही अनुकूलता सुद्धा संपुष्टात येईल.
याउलट तुम्ही जर शेतीला अनुकूल धोरणे राबवलीत तर मतदान मी तुमच्याच पक्षाला देणार, असे लालूच देणारे संभाषण करत सर्वच पक्षांना झुलवत ठेवून त्यांना आपल्या बोटावर खेळवत ठेवले तर.... तेच आंदोलनाच्या उद्दिष्टप्राप्तीसाठी लाभदायक सिद्ध होऊ शकते.
व्यक्तिगत मताला बाजूला ठेऊन शेतीला केंद्रस्थानी ठेवून विचार करणारा विचारच सर्वात जास्त परिणामकारक ठरू शकतो. त्यामुळे आंदोलनशास्त्र आणि व्यक्तिगत वर्तनशास्त्र कधीही एकत्र येत नाही, हे कायमच लक्षात ठेवले पाहिजे. आंदोलनाच्या पाईकाने संघटनेचा सामूहिक निर्णय स्वीकारलाच पाहिजे.
मी बहुतांश वेळा भाजपलाच मतदान केले आहे. अन्य पक्षांना फारच कमी वेळा.
पण भाजप हा शेतकऱ्यांसाठी सर्वात जास्त घातक पक्ष असल्याची माझी खात्री झाली तर मी प्रतिस्पर्धी- तुल्यबळ उमेदवारालाच मतदान करेन. मग मला काँग्रेस, राष्ट्रवादी, माकप, भाकप, रिपाई, तेलगू देसम, वंचित आघाडी आणि मुस्लिम लीग सहित कोणताही पक्ष चालेल.
पण
शेतकरी संघटना जसा निर्णय घेईल त्यानुसार मी मतदान करत असतो. मतदान करताना स्वतःचे डोके वापरत नाही.
- गंगाधर मुटे आर्वीकर
शेतकरी तितुका एक एक!
फेसबुक स्टेटस 05/10/2024
गल्लीत झित्रुबांनो घुसलेत मांसप्रेमी
व्हा सज्ज बैल बांनो लेकीस वाचवाया
#गंगाधर_मुटे #रानातला_शेर #शुभरात्री_लोक्सहो
शेतकरी तितुका एक एक!
Fece book status 05/10/2024
पाऊस पडला कि बेडकं जिवंत होतात अन पाऊस पडला नाही कि पर्यावरणवादी जिवंत होऊन "झाडे लावा, झाडे लावा" असे डराव डराव करायला लागतात.
#तुत्ते_तमिने_हलामी_थाले! #शुभरात्री_लोक्सहो #पर्यावरण #गंगाधर_मुटे #इंडियाvsभारत #जौद्या_आप्ल्याले_काक्रा_लाग्ते
शेतकरी तितुका एक एक!
एकाचा प्रश्न :- मग झाडे
शेतकरी तितुका एक एक!
07/10/2024
झाडे लावा, झाडे जगवा, झाडे तोडा, झाडे विका.... असे धोरण का असू नये रे दीडशहाण्याने??
#तुत्ते-तमिने-हलामी-थाले #शुभरात्री-लोक्सहो
शेतकरी तितुका एक एक!
पोटासाठी बारा वाटा.. पण
पोटासाठी बारा वाटा.. पण सद्यस्थितीत 12 पैकी बाराही वाटा फक्त शहरांकडेच जातात आणि थांबतात.

#इंडियाvsभारत #शुभरात्री_लोक्सहो
शेतकरी तितुका एक एक!
09/10/2024
राजा व्यापारी तर प्रजा भिकारी. सरकारने नको ते खुटीउपड धंदे करू नये. सर्व पांढरे हत्ती विकून काँग्रेसने केलेली चूक दुरुस्त करावी. हाच जनहिताचा राजमार्ग आहे.
#गंगाधर_मुटे #अर्थशास्त्र
शेतकरी तितुका एक एक!
11/10/2024
सरकार जर शेतीविरोधी नसेल तर वादळ, अतिवृष्टी, महापुर शेतकऱ्यांचं काहीच वाकडं करू शकत नाही!
शेतकरी तितुका एक एक!
11/10/2024
एका वृक्षात सरासरी पाच माणसे जाळली जाऊ शकतात. आतापर्यंत ६ लक्ष शेतकऱ्यांनी अल्पवयात आत्महत्या केल्या आहेत. त्यांना जाळायला निदान सव्वा लक्ष वृक्ष निष्कारण खर्ची पडले आहेत. याचाच अर्थ सव्वा लाख वृक्षांची निष्कारण कत्तल करावी लागली आहे.
पर्यावरणवाद्यांना शेतकरी मेल्याचे दुःख नाही, हे मी समजू शकतो पण सव्वा लक्ष वृक्षांची कत्तल थांबवण्यासाठी तरी त्यांनी शेतकरी आत्महत्त्या थांबवायसाठी प्रयत्न करणे आवश्यक नव्हते का? #सांगा_ब्वॉ
#तुत्तेतमिने_हलामीथाले! #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
12/10/2024
धर्मवादी आणि जातीवादी हेच आजचे रावण आहेत. पण त्यांची संख्या 95% आहे. त्यांना पेटवायचे कसे?
त्यामुळे शुभेच्छा
शेतकरी तितुका एक एक!
13/10/2024
व्यवस्था परिवर्तन करायला निघालेले स्वतःच आहे त्या प्रस्थापित व्यवस्थेत शिरण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतांना दिसत आहेत का?
शेतकरी तितुका एक एक!
16/10/2024
आयला तुम्ही कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी बांधिलकी ठेवून असाल तर तुमच्यासारखा विश्वव्यापी सदासुखी राजा कुणीच नाही राव! प्रसंग कोणताही, निमित्त कोणतेही, घटना कोणतीही असली तरी तुम्हाला स्वतःचे डोके चालवायची गरजच नाही. डोक्याला ताप द्यायची तर अजिबात गरज नाही. अभ्यास करून विचारपूर्वक बोलायची गरज तर अजिबातच नाही. काँग्रेसचे असाल तर काँग्रेसेतर पक्षांना शिव्या घालायच्या आणि भाजपचे असाल तर भाजपेतर पक्षांना शिव्या घालून मोकळे व्हायचे.
तुमचा नेता म्हणेल तेच अंतिम सत्य!
तुमचा पक्ष देईल तोच अंतिम न्याय!!
तुम्ही फक्त सुरात सूर मिसळून री ओढायची. बस्स!!!
खरंच सांगा राजेहो!
तुमच्याइतका सदासुखी बादशहा दुसरा कोणी असेल का या संबंध विश्वात?
#शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे #राजकारण #तर्कशास्त्र
माझी फेसबुक स्टेटस
शेतकरी तितुका एक एक!
Fece book status 17/10/2024
फेसबूक पोस्ट
शेतीची लढाई आक्रमकपणे लढताना अत्रतत्रसर्वत्र मी माझ्या शत्रूची फौज निर्माण करून ठेवली आहे.

#शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
24/10/2024
राजकीय दृष्टिकोन बाजूला ठेवून थोडासा विचार करावा.
आपल्या देशात जात आणि धर्म असे पिंजरे करून ती ती जात आणि तो तो धर्म स्वतःला स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी पिंजऱ्यामध्ये अडकवून घेतो. पिंजऱ्याच्या बाहेर पडून स्वतःला व्यापक करण्याची इच्छाशक्ती जातीचा गर्व असणाऱ्यांना आणि धर्माचा गर्व असणाऱ्यांना नसते.
त्यामुळे एक जात दुसऱ्या जातीला आणि एक धर्म दुसऱ्या धर्माला मतदान करण्यास तयार नसतो.
जर राजकीय यश मिळवायचे असेल तर या चौकटीच्या बाहेर पडून एकमेकात मिसळावे लागेल. एकमेकांची मने जिंकावी लागतील. जाती आणि धर्माच्या बाहेरील मतदार आपल्याला मतदान करेल अशी वर्तणूक करावी लागेल. असे करताना कोणी दिसत नाही.
कोणताही राजकीय पक्ष निवडून येण्याची क्षमता बघूनच तिकीट देणार. यापेक्षा वेगळे काही होऊ शकत नाही. निवडून येण्याची क्षमता नसलेल्यांना तिकीट देऊन कोणीही आपल्या पक्षाचा वाटोळ करून घेणार नाही.
जे बहुसंख्या आहेत त्यांना जात आणि धर्म दोन्ही परवडतात. त्यामुळे ते जाती-धर्माचे पिंजरे निर्माण करतात.
जो धर्म आणि ज्या जाती अल्पसंख्या आहेत त्यांना असे पिंजरे तयार करून त्यात बंदिस्त होणे राजकीय दृष्ट्या कधीही परवडणारे नाही. आजही नाही, उद्याही नाही आणि कदाचित हजारो वर्षानंतरही चित्र बदलणार नाही.
बहुसंख्य करतात म्हणून त्यांचेच अनुकरण करून आपणही स्वतःला जाती धर्मात बंदिस्त करून घेण्यात अल्पसंख्याकाचा मोठा घात होतो.
शेतकरी तितुका एक एक!
01/11/2024
शेतकरी जर सक्षम झाला आणि आर्थिक संपन्न झाला तर *देवाघेवीच्या अटी* शेतकऱ्यांच्या हाती जातील. त्याची बार्गेनिंग पॉवर वाढेल. चांगला भाव मिळेपर्यंत तो शेतमाल विकणार नाही.
जर असे झाले तर शेतमाल स्वस्तात स्वस्त भावांने लुटणे शक्यच होणार नाही. *म्हणून शेतकऱ्याला कायमच "गरजू" ठेवणे आणि त्याला कायमचे कर्जाच्या ओझ्याखाली दाबून ठेवणे* हेच सरकार नामक राज्यकर्त्यांचे अधिकृत धोरण असते.
शेतकरी तितुका एक एक!
03/11/2024
पक्ष, पक्ष नेते, उमेदवार राजकारण करिअर म्हणून करतात. मतदारांनी मतदान करिअर म्हणून करावे का?

#शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
शेतकऱ्याला वारंवार कर्जमाफी
शेतकऱ्याला वारंवार कर्जमाफी का दिली जाते? #तुम्ही_शोधा_उत्तर_मी_झोपतो
#शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
पुरोगामी महाराष्ट्रात
पुरोगामी महाराष्ट्रात पुरोगाम्यांचा आणखी किती राजकीय सत्यानाश व्हायला पाहिजे म्हणजे हे पुरोगामी सुधारतील?
#शुभरात्री_लोक्सहो
शेतकरी तितुका एक एक!
कधीतरी आपल्याच आत झाकून बघू
कधीतरी आपल्याच आत झाकून बघू
गरिबी का आली ते तरी शोधून बघू
#गंगाधर_मुटे #रानातला_शेर #शुभरात्री_लोक्सहो
शेतकरी तितुका एक एक!
मोह मायेचा त्याग करण्याच्या
शेतकरी तितुका एक एक!
चुकीच्या पद्धतीने EVMचा बचाव
शेतकरी तितुका एक एक!
यंदा माथेरानला जायचं होतं.
शेतकरी तितुका एक एक!
मसनात जा, ढोड्यात जा, चुलीत
मसनात जा, ढोड्यात जा, चुलीत जा, भोकात जा हे ग्रामीण भागात सहज वापरले जाणारे ग्राम्य शब्द असले तरी फक्त गावंढळ लोकच वापरत असतात.
#शुभरात्री_लोक्सहो #नुसता_भुताचा_बाजार #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
31 मे 2022
पूर्वी अज्ञानी लोकांना भूत-प्रेत-पिशाच्च झपाटायचे; आता ज्ञानी-विज्ञानी लोकांना राजकिय पक्ष आणि नेते झपाटून टाकतात. दोन्ही स्थिती एकसमान. गुणात्मक फरक काही नाही.
#शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
31 मे 2022
आज पाण्याच्या नळाच्या नळीतून पाण्याच्या धारेची धार न आल्याने आंघोळ धुवायची राहून गेलेली आहे.
शेतकरी तितुका एक एक!
31 मे 2022
सनातनी व पुरोगामी यांच्या कट्टरपंथी अतिरेकापेक्षा मतदारांना मोदींचा मध्यममार्गी देशधर्म जास्त भावला, हे खरे आहे.
© गंगाधर मुटे
शेतकरी तितुका एक एक!
21/06/2025
विज्ञानवादी अभ्यास त्याचा, इतका विकसित झाला
पिकवतोय म्हणे टक्कलावर तो, हिरवा भाजीपाला
© गंगाधर मुटे
शेतकरी तितुका एक एक!
21/06/2025
HTBT तंत्रज्ञानाला विरोध करतात अन स्वतःला विज्ञानवादी समजतात.
#तुत्ते_तमिने_हलामी_थाले!
#शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
22/06/2024
फक्त एका बाजूची विनंती न ऐकता वटवृक्षाने नवऱ्यांचे मत सुद्धा विचारात घेऊन निर्णय घेतला पाहिजे.

#काय_म्हंता_लोक्सहो
शेतकरी तितुका एक एक!
22/06/2025
"नासुकली" या बोलीभाषेतील शब्दाला समर्पक व तितकाच स्पष्ट अर्थबोध देणारा प्रमाणभाषेतील पर्यायी शब्द सुचवा. #RVKR
शेतकरी तितुका एक एक!
23/6/2022
शेतातील वीज कापायला काल पवार-ठाकरेंचे कर्मचारी यायचे. यानंतर कदाचित फडणवीस-शिंदेंचे कर्मचारी येतील. म्हणजे शेतकऱ्यांच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल होण्याची शक्यता.
#वाजवा_टाळ्या_आणि_झोपा #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
24 जून 2023
केवळ शेतकरी विरोधी कायदेच नव्हे तर कायद्याचे जंगलच संपवणे आवश्यक आहे. म्हैस मनभर अन शिंगे टणभर.
#शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
24 जून 2020
आमच्याकडे 'पाऊस' कधीच येत नाही, नेहमी 'पानी' येत असतो. आज पण बऱ्यापैकी 'पानी' आला.
तुमच्याकडे काय येतो? पाऊस की पानी? #गंगाधर_मुटे आर्वीकर #RVKR
शेतकरी तितुका एक एक!
24 jun 2020
'भूक लागणे' हा रोग आहे आणि 'अन्न' हे त्यावरचे औषध आहे, जे आयुर्वेदिक आहे.
#RVKR
शेतकरी तितुका एक एक!
24 जून 2020
अलोपॅथी की आयुर्वेद श्रेष्ठ या वादात गुरफटण्यापेक्षा माणसं वाचवण्याला प्राथमिकता देण्याची माणुसकी माणसात का असू नये? #RVKR
शेतकरी तितुका एक एक!
24 जून 2018
!!!! #विनोदाचावार_सोमवार !!!!
देरेनवेन्द्राचे सरकार म्हणजे "बंदीबाज" सरकार.
© गंगाधर मुटे
शेतकरी तितुका एक एक!
24 जून 2018
!!!! #विनोदाचावार_सोमवार !!!!
आता इलॅस्टीकवरही बंदी आणा म्हणावं. रस्त्याने चालताना घसरलेले पॅन्ट सावरत शाळेत चाललेली लेकरं बघायची मला ओढ लागली आहे.
© गंगाधर मुटे
शेतकरी तितुका एक एक!
24 जून 2014
शेतीच्या दुर्दशेला पाऊस अजिबात जबाबदार नाही.
शेतीच्या दुर्दशेला पाऊस सोडून अन्य घटकच जबाबदार असताना
जो तो उठतो आणि पावसाला दुषणे द्यायला लागतो.
चोर सोडून संन्याशाला फ़ासी, म्हणतात ना, ते यालाच.
शेतीच्या दुर्दशेला जे घटक जबाबदार आहेत त्यांच्याविरुद्ध ब्र काढण्याची यांची औकात नाहीये कारण
पगारवाढ, बढती, करचोरी वा अन्यहितसंबंधावर गदा येण्याची भिती
तो बिचारा पाऊस ह्यांचे काहीच बिघडवू शकत नाही म्हणूनच चेकाळत असावेत हे.
"मोडक्या कूपावर लाथ द्यायची" सवयच अंगवळणी पडली ह्यांच्या.....!
शेतकरी तितुका एक एक!
25 जून 2023
शेतकरी संघटना ही एकमेव चळवळ आहे जी तर्कशुद्ध बावनकशी वैचारिक पायावर मार्गक्रमण करत आहे. यु. शरद जोशींनी मांडलेले शेतीचे अर्थशास्त्र व त्या अनुषंगाने अंगीकारावे लागणारे आंदोलनशास्त्र शास्त्रीय आणि तार्किक पातळीवर कोणालाही आजवर खोडून काढता आलेले नाही.
पण
बेरकी लोक नाव तर शरद जोशींचे घेतात पण यु . शरद जोशींचे तत्वज्ञान उलटे टांगणारे कार्य करत राहतात. मी त्यांचा निस्सीम अनुयायी आहे असाही आव आणत राहतात.
त्यामुळे शेतकरी आंदोलनाचा घात होतो आणि आंदोलन चार पावले पुढे जाण्याऐवजी चार पावले मागे जाण्याची भीती उत्पन्न होते.
#जौद्या_आप्ल्याले_काक्रा_लाग्ते #आप्ल्याले_गधं_घोडं_सारखंच #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
25 जून 2021
वडाचे झाड प्रचंड ऑक्सिजन देते हे त्या काळात सावित्रीला कळले होते... इतके तिचे विज्ञानावर प्रभुत्व असण्याची शक्यता आहे. तिला मेलेला नवरा जिवंत करण्याचे सायन्स त्या काळात अवगत असेल म्हणून तर तिने वडाच्या झाडाची निवड केली नसेल?
तसे असेल तर त्या काळातील विज्ञानाच्या तुलनेत आजचे विज्ञान फारच मागासलेले आणि चिल्लर स्वरूपाचे आहे असे म्हणावे लागेल.
=====
प्राणप्रिय व्यक्तीचा (नवरा सुद्धा त्यात आला) सात जन्म सहवास मिळावा ही उत्तुंग प्रेमभावना आहे आणि ती भावना प्रदर्शित करण्यासाठी वटपूजा हे माध्यम आहे.
एका सावित्रीबाईने स्त्रियांना शिक्षण दिले. त्या शिक्षणाचा उपयोग समाजसेवेसाठी करण्याऐवजी चाणाक्ष महिलांनी चांगला, गलेलठ्ठ पगारवाला व देखणा नवरा मिळावा म्हणून केला. सावित्रीबाई फुलेंना उलटे टांगून वरून पुन्हा आम्ही पुरोगामी (अर्थात विज्ञानवादी सुद्धा) असल्याचा बडेजावही मिरवला.
एका जोतिबांच्या सावित्रीचा मदतीने शिक्षण घेऊन चांगला नवरा मिळवणे व दुसऱ्या सत्यवानाच्या सावित्रीच्या मदतीने तोच नवरा सात जन्म टिकावा म्हणून मग वटपूजा करणे...... हे चक्क मानसशास्त्रीय, गणितीय विज्ञान आहे.
ज्यांना यात अंधश्रद्धा दिसते ते अविज्ञानी बैताडबेलने असतात.
#गंगाधर_मुटे #तर्कशास्त्र
शेतकरी तितुका एक एक!
25 जून 2020
सृष्टी से पहले पृथ्वी नहीं थी, सूरज-चांद भी नहीं, अंतरिक्ष भी नहीं, तुम भी नही... केवल अकेला मै था! परेशान था!!
आता तुमच्या संगतीने दिवस मजेत जातो.
#शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे #RVKR
शेतकरी तितुका एक एक!
26 जून 2021
"तुका म्हणे नटधारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी" उथळ विज्ञानवादी हे विधान विज्ञानात कसे बसवणार?
संवैधानिक मान्यता कशी देणार?
शेतकरी तितुका एक एक!
26 जून 2015
आम्ही शेतकरी झाडे लावतो आणि झाडे तोडतो सुद्धा!
कारण आम्ही कृतीशील कर्मयोगी आहोत. नुसते तोंडाने वाफ़ उडवणारे बोलघेवडे पर्यावरण वादी/प्रेमी/तज्ज्ञ नाहीत.
तोंडाची वाफ़ दवडल्याने कुठे निसर्गाच्या आगगाडीचे इंजिन चालत असते?
शेतकरी तितुका एक एक!
27 जून 2021
पुरोगामी इतके थयथयाट करत आहेत की जणू जोतिष्यशास्त्राला मान्यता दिली तर पुरोगाम्यांचे दुकानच बंद पडणार आहे!
#गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
27 जून 2021
भंपकपणा, पाखंडीपणा व ढोंगीपणा... काही धार्मिक, निधार्मिक, साधूबुवा, महाराज, सनातनी, पुरोगामी, आस्तिक, नास्तिक यांच्यामध्येही असतो. सर्वात कहर म्हणजे स्वतःला विज्ञानवादी म्हणवणारे सर्वात भयंकर पाखंडी असतात. त्यांना कवडीचेही विज्ञानाचे ज्ञान नसते.
#गंगाधर_मुटे #अनुभवशास्त्र
शेतकरी तितुका एक एक!
27 जून 2018
युगात्मा शरद जोशींसारखे आम्ही मॅचविनर खेळाडू नाहीत, हे खरे आहे पण आपापल्या क्षमतेनुसार जमेल तितके रन काढून मॅच जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे खेळाडू नक्कीच आहोत.
सर्व आजी-माजी-जुन्या-पुराण्यासहित नव्या दमाच्या होनहार खेळाडूंना विनंती आहे कि त्यांनी पॅव्हेलियन/ प्रेक्षकगॅलरीमधून मैदानात यावे. कर्णधार Anil Ghanwat यांचे नेतृत्वात मॅच जिंकू किंवा हरू पण संघर्ष तर नक्कीच करू, करत राहू.
कटिबद्ध खेळाडूंच्या समर्पित खेळातूनच ट्रॉफीवर हक्क नोंदवायचा मार्ग जाऊ शकतो.!!!
- गंगाधर मुटे
~~~~~~~~~~~~~~
: डिस्क्लेमर :
१) काही खेळाडूंना खेळाडू म्हणून खेळ दाखवण्यापेक्षा कर्णधार पदाची जन्मजात लालसा असते. त्या लालसेपोटी ते टीम मध्ये भांडणे लावून/फूट पाडून आपल्या समर्थकांचा गट करण्यात वस्ताद असतात. त्यांना मॅच जिंकण्यात वगैरे अजिबात रस नसतो. येनकेन प्रकारेन आपल्याला कर्णधार पद कसे मिळेल या अविचाराने पछाडलेले असल्याने ते सतत कर्णधाराविरुद्ध कारवाया करण्यात गुंतलेले असतात. अशांनी कृपया आमच्यात मिसळू नये.
मात्र ज्यांना धीर धरता येतो त्यांचे स्वागत असेल कारण आमच्या टीमचा कर्णधार दर दोन वर्षांनी बदलत असतो. कुणीही आपली कर्तबगारी सिद्ध केल्यास भविष्यात त्यांचे हाती कर्णधारपदाची सूत्रे जाण्याची नैसर्गिक संधी असते. आम्ही दर दोन वर्षांनी सक्षम कर्णधाराच्या शोधात असल्याने कर्णधार पदायोग्य सक्षम खेळाडूचे अधीक पर्याय उपलब्ध झाल्यास आम्हाला त्याचा आनंदच वाटेल.
२) काही खेळाडू स्वतःला महान खेळाडू समजतात. प्रत्यक्षात ते खेळाडूच नसतात. त्यांना बॅट-बॉल हातात धरता येतच नाही पण साधे क्षेत्ररक्षण करण्याची देखील त्यांची कुवत नसते. मात्र त्यांची जीभ प्रचंड वेगवान गतीने चालत असल्याने ते अहोरात्र प्रशिक्षकाच्या भूमिकेत वावरत असतात. संपूर्ण टीमने त्याच्या इशाऱ्यानुरूप कार्य करावे, असा त्यांचा अट्टाहास असतो. कृपया त्यांनी लक्षात घ्यावे कि आमची कार्यकारिणीच आमची प्रशिक्षक असते. आमची टीम लोकशाहीवर विश्वास ठेवणारी असल्याने काय निर्णय व्हायचे ते कार्यकारिणीत कधी एकमताने तर कधी बहुमताने होत असतात. ते सर्वांना बंधनकारक असतात. कार्यकारिणीत सर्वांना आपले विचार ठेवण्याची संधी असते. तिथे आपले विचार मांडून प्रत्येकजण संधीचा लाभ घेऊ शकतो.
~~~~~~~~~
ता. क : हे ललित लेखन असून कोणत्याही संघटनेचा अथवा पक्षाचा या लेखनासोबत काहीही संबंध नाही. काही बाबी सुसंगत जाणवल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
~~~~~~~~~
शेतकरी तितुका एक एक!
27 जून 2017
सध्या शेतकरी आंदोलन फुल फॉर्मात आहे. पण खेळाडू दुर्दैवाने "चौफेर गोलंदाजी" करत आहेत. त्यामुळे सरकारी फलंदाजी नाबाद राहून कायमच खेळपट्टीवर पाय रोवून टिच्चून उभी आहे.
फलंदाजी चौफेर करायची असते. गोलंदाजी नेमकी विकेटच्या दिशेने करायची असते. खेळाडूंना हे मर्म जेव्हा कळेल तेव्हाच ही मॅच निर्णयाच्या व जिंकण्याच्या दिशेने जाईल, हे लक्षात घ्यायला हवे.
- गंगाधर मुटे
~~~~~~~~~~~~~
शेतकरी तितुका एक एक!
28 जून 2024
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण
कोणत्या ग्रहावरची मराठी असेल ही
#जौद्या_आप्ल्याले_काक्रा_लाग्ते #शुभरात्री_लोक्सहो
शेतकरी तितुका एक एक!
28 जून 2024
मुख्यमंत्री माझी लाडकी बायको... अशी पण एखादी योजना येऊ द्या
करा भाषेचा सत्यानाश
#शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
28 जून 2023
शेतकरी विरोधी कायदे येण्यापूर्वी भारतीय शेतकरी हेलिकॉप्टरने शेतीवर जात होता का?
#शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
28 जून 2022
"तुला सोडून मी पळून येऊन दुसऱ्याशी लग्न केले असले तरी मी अजून तुझीच बायको आहे. तुझ्याच नावाचे कुंकू माझे कपाळावर कालही होते, आजही आहे आणि उद्याही राहील." - सौ. बंडखोरीन
#शुभरात्री_लोक्सहो #लोकशाही #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
28 जून 2022
पोलिस खात्यासाहित बहुतांश तपास यंत्रणा म्हणजे सत्ताधाऱ्यांचे दोन पैसे मिळवण्याचे प्रमुख स्त्रोत असतात. अगदी देणगीदात्यांना भय दाखवून निधी मिळवण्यासाठी या यंत्रणांचा उपयोग होतो. त्यामुळे "मी नाही त्यातली... कडी लावा आतली" ही राजकारण्यांची भाषा म्हणजे शुद्ध ढोंगधतुरेच ठरतात.
#शुभरात्री_लोक्सहो #लोकशाही #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
28 जून 2021
ज्याला विज्ञानाचा अभ्यास असतो त्याला विज्ञानाची लांबी, रुंदी, उंची, खोली वगैरे कळत असल्याने विज्ञानवादाचा उगीच डांगोरा पिटत तो गावभर फिरुच शकत नाही.
#गंगाधर_मुटे #तर्कशास्त्र
शेतकरी तितुका एक एक!
28 जून 2021
फेसबुकवर पाय ठेवला की जिकडेतिकडे 'हे' मोदींना तर 'ते' राहुल/उद्धव/पवारांना बदडतांना दिसतात. मग मी 'हे' व 'ते' ला बदडतो. #RVKR
शेतकरी तितुका एक एक!
28 जून 2019
एका मतिमंद अविचारी व्यक्तीच्या नजरेत दुसरा अतिमतीमंद अविचारी व्यक्ती देखील भयंकर विचारवंत असू शकतो.
(जशी दृष्टी तशी सृष्टी)
शेतकरी तितुका एक एक!
28 जून 2019
शेतकरी संघटनेची गाडी रुळावरून घसरू द्यायची नसेल तर कुणाला तरी हातात हातोडा घेऊन गॅंगमनचे कार्य निरंतर करावेच लागेल.
शेतकरी तितुका एक एक!
29 जून 2023
मार्शल प्लॅन व कर्जमुक्तीचे आंदोलन दाबण्यासाठीच वेगवेगळ्या मागण्या पुढे करून शेतकरी आंदोलनाला वेगवेगळे फाटे फोडण्यात आले.
शेतकरी तितुका एक एक!
29 जून 2021
कोणताच व्यक्ती परिपूर्ण असू शकत नाही. कुणी सज्ञानी अथवा कुणी अज्ञानी असू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती केवळ काही विषयात सज्ञानी व उर्वरित अन्य सर्व विषयात अज्ञानीच असतो. जो स्वतःला सज्ञानी समजतो त्यांच्याइतका अज्ञानी कुणीच नसतो.
#गंगाधर_मुटे #विज्ञान #तर्कशास्त्र
शेतकरी तितुका एक एक!
29 जून 2019
शरद जोशींनी ऐकले नाही म्हणून त्यांची साथ सोडणारे बहुतेकजण नराचे नारायण होण्याऐवजी नराचे वानर झालेले आहेत.
© गंगाधर मुटे
शेतकरी तितुका एक एक!
29 जून 2019
माझ्या शेपटीवर कुणी पाय दिला तर माझे पित्त खवळते, तळपायाची आग मस्तकात जाते.
निष्कर्ष : यावरून मला शेपटी असेल असे वाटते.

शेतकरी तितुका एक एक!
30 jun 2023
शेतकरी संरक्षक व शेतीपूरक असा एकही कायदा या देशात अस्तित्वात नाही. असेल तर #सांगा_ब्वॉ जाहीरपणे
#शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
30 jun 2021
सर्व शासकीय नोकऱ्या 35 ते 40 टक्के मार्क्स मिळवणाऱ्यासाठी आरक्षित करून त्यापुढील गुणवत्तेला शेती, व्यापार, उद्योगात गुंतवा.
नोकरदारांची राष्ट्रविकासात शून्य भूमिका असते.
#गंगाधर_मुटे #विकास_शास्त्र
शेतकरी तितुका एक एक!
30 jun 2017
माणसाचे विचार करण्याचे इंद्रिय हे मेंदू नसून खिसा आहे.
- युगात्मा शरद जोशी
शेतकरी तितुका एक एक!
30 jun 2025
गुणवत्ता प्राप्त गुणवत्तेला शेतीत पाठवा. मातीची गुणवत्ता वाढते की गुणवत्तेची माती होते, बघुयात!
#गंगाधर_मुटे #शुभरात्री_लोक्सहो
शेतकरी तितुका एक एक!
01 जुलै 2023
धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी निर्माण केलेले साधन म्हणजे कायदे. एक साधन नष्ट केले तर दुसरे साधन त्याची जागा घेते. धोरण कायम राहते
शेतकरी तितुका एक एक!
01 जुलै 2023
15 ऑगस्ट हा शेतकऱ्यांचा स्वातंत्र्यदिन आहे का?
हो किंवा नाही... उत्तर द्या.
शेतकरी तितुका एक एक!
01 जुलै 2023
'कायदे' शब्द घेऊन मी बऱ्याच कविता लिहिल्या. त्यातील एक महत्त्वपूर्ण कविता.
https://www.baliraja.com/node/1774
शेतकरी तितुका एक एक!
01 जुलै 2021
"दीन" शेतकऱ्यांचा म्हणे आज "दिन" आहे.
#गंगाधर_मुटे #शेतकरी
शेतकरी तितुका एक एक!
01 जुलै 2021
शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा भिडवून लढणाऱ्यांना कंगाल तर शेतकऱ्यांना लुटून जगणाऱ्यांना मालामाल करण्याचे काम शेतकरीच करतात.
*पुढील पिढीने काय बोध घ्यावा?*
#गंगाधर_मुटे #शेतकरी
शेतकरी तितुका एक एक!
01 जुलै 2019
कुणी स्वतःला महान समजत असेल तर मी त्याहूनही महान आहे.
कुणी स्वतःला लहान समजत असेल तर मी त्याहूनही लहान आहे.
#साधीसोपी_जीवनशैली
शेतकरी तितुका एक एक!
01 जुलै 2025
"दीन" शेतकऱ्यांनो आज तुमचा "दिन" आहे. नाचा, कुदा, मारा उड्या
#शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे #शेतकरी
शेतकरी तितुका एक एक!
02 जुलै 2023
आर्द्रा आणि पुनर्वसू नक्षत्रांचे वाहन मेंढा व गाढव आहे. मेंढा व गाढव वाहन असेल तर पाऊस अत्यल्प आणि अनियमित पडतो, असे पंचांग सांगते.
सध्या तसेच घडत आहे.
या शास्त्राला अप्रगत शास्त्र म्हणता येईल पण थोतांड कसे म्हणता येईल.
शेतकरी तितुका एक एक!
02 जुलै 2022
कशासाठी विचारावे की पक्ष तुझा कोणता
तुझे कूळच तर सांगते की पक्ष तुझा कोणता
© गंगाधर मुटे #माझी_वाङ्मयशेती #लोकशाही #पचायला_अवघड_डोज
शेतकरी तितुका एक एक!
02 जुलै 2019
डॉ. आंबेडकरांचे मूळ संविधान विद्रुप करून राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांसाठी स्मशानभूमीपर्यंतचा गुबगुबीत रस्ता तयार केला आहे.
शेतकरी तितुका एक एक!
02 जुलै 2019
इस्रायलीपेक्षा भारतीय शेतकरी अधिक गूणवाण आहेत पण ते सरकार त्यांना तळहातावर जपतं व हे सरकार आम्हाला लाथेखाली दाबतं.
© गंगाधर मुटे
शेतकरी तितुका एक एक!
02 जुलै 2019
सर्व शहरात "पाणी अडवा, पाणी जिरवा" सुरु करा.
म्हणजे त्यांना शेतीचे पाणी चोरण्याची गरज भासणार नाही.
शेतकरी तितुका एक एक!
02 जुलै 2019
शेतीमध्ये जातो जो जो । मातीमोल होतो तो तो ।
अशी अनीतीची नीती । कोण धोरणे आखतो? ॥
© गंगाधर मुटे
शेतकरी तितुका एक एक!
03 जून 2023
आम जनता राजकारणापायी पिसाळल्याने स्पंदनांची आंदोलने मृत होऊन शोषितांना मारक व शोषकांना पोषक ठरत आहे.
#शुभरात्री_लोक्सहो
शेतकरी तितुका एक एक!
03 जुलै 2023
आधुनिक सुविचार/उपदेश
कोणत्याही पक्षाचा चाटू, चमचा, भक्त बनण्याऐवजी समर्थक बना... म्हणजे निदान कमरेचे सोडून डोक्याला तरी बांधता येईल.
पण जर आपण चाटू, चमचा, भक्त म्हणून राहिलात तर कमरेचे सोडून डोक्याला बांधायची सुद्धा संधी मिळायची नाही.... कमरेचे सोडून चक्क खुंटीलाच लटकवावे लागेल.
नाहीतर थेट राजकारणात उतरा.
राजकारणी व्यक्तीला साम, दाम, दंड, भेद, छल, कपट, नीती, अनिती यापैकी सर्व पर्याय वापरण्याची मुभा असते. अशी मुभा मात्र चाटू, चमचे आणि भक्तांना नसते. कृपया नोंद घ्या.
#राजकारण #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
03 जुलै 2023
BRS मध्ये जाताय? जा. पण याद राखा.... तुमच्याकडे राजकीय मूल्य नसल्याने तो पक्षही तुम्हाला एक दिवस कचरापेटीत टाकेल.
#गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
03 जुलै 2022
कुटील-कारस्थानी म्हणून जर एखाद्याची प्रतिमा तयार झाली तर आप्त, मित्र सोडा... त्याची बायको सुद्धा त्याच्या पासून सावध होते. असफल दिसणारा सरळमार्गी मात्र आयुष्यात सहज सफल होतो.
#गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
03 जुलै 2019
पूर्वी भूतप्रेतसैतानाची भीती दाखवून भोंदूगिरी चालायची; आता ग्लोबल वॉर्मिंगची भीती दाखवून क्वालिफाईड भोंदूगिरी चालते.
© गंगाधर मुटे
शेतकरी तितुका एक एक!
03 जुलै 2019
कसलं आलं बोडक्याचं क्लायमेट चेंज? ही केवळ अनादी काळापासून चालत आलेली व अनादी काळ चालणारी नैसर्गिक विविधता आहे.
© गंगाधर मुटे
शेतकरी तितुका एक एक!
03 जुलै 2019 कॉमेंट
पाण्याच्या प्रवाहाला उतार लागतो. असा उतार उपलब्ध नसला की मुंबईची तुंबई होते, इतकेही ज्यांना कळून उपाय योजना करण्याची अथवा भविष्याचा वेध घेण्याची ज्यांची क्षमता नसते, त्यांना ग्लोबल वॉर्मिंगचे लक्षणे दिसतात म्हणे!
पाणी घालून प्या रे बेवड्यांनो!
शेतकरी तितुका एक एक!
04 जुलै 2023
राजकारण्याइतक्या गलिच्छ डोक्याने घाणेरडे विचार सामान्य जनता करू शकत नसल्याने त्यांना राजकीय छक्केपंजे, डावपेच कळत नाहीत.
शेतकरी तितुका एक एक!
04 जुलै 2023
डावपेच म्हणजे आपण डाव टाकणे आणि इतरांना पेचात पाडणे
#डावपेच #राजकारण #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
04 जुलै 2019
"शेतीतील गरिबीचे मूळ शेतकऱ्यांच्या अज्ञानात आहे" हा विचार शरद जोशींनी पराभूत केला. त्याला आताही उचल खाऊ दिली जाणार नाही.
शेतकरी तितुका एक एक!
04 जुलै 2025
मंत्रोच्चाराने गहू पिकवला तर 563/- ₹ प्रति किलो पडतो. कुणाकुणाची औकात आहे खरेदी करण्याची?
हात वर करा बघू!
#शुभरात्री_लोक्सहो
शेतकरी तितुका एक एक!
आयुष्य म्हणजे पेंडूलम,
आयुष्य म्हणजे पेंडूलम, दोलायमानी मॅच असते
कधी धोनीचा सिक्सर तर, कधी सूर्याची कॅच असते
#गंगाधर_मुटे #रानातला_शेर
शेतकरी तितुका एक एक!
06 जुलै 2019
अन्न,वस्त्र,निवाऱ्याचा बोजा उचललाच आहे. प्रजननाचा बोजाही शासनाने उचलून जनतेवरील बोजा कमी करणे, इतकेच बाकी उरले आहे.
© गंगाधर मुटे
शेतकरी तितुका एक एक!
06 जुलै 2019
शेतीची किंमत लाखो-करोडोत असल्याने शेतकरी निर्धन नसतो. सवलतीवर फक्त गरिबांचा, अपंगांचा, दीनदुबळ्यांचा हक्क असतो, शेतकऱ्याचा नाही.
शेतकरी तितुका एक एक!
06 जुलै 2025
शेतीसंपत्ती करोडो रुपयाची पण सरकारविरोधात लढण्याची कुवत नसल्याने शेतकरी भिकारी, कंगाल व लाचार!
#शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
07 जुलै 2022
"हरामखोरहो! तुम्ही उद्या खाणारच आहात, मग त्यातला एक हिस्सा मला आजच देऊन टाका" असे मनाशी म्हणत जे लोक मतदानासाठी पैसे मागतात... खरंच त्यांचं काही चुकते?
#तुम्ही_शोधा_उत्तर_मी_झोपतो #शुभरात्री_लोक्सहो #लोकशाही #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
07 जुलै 2019
भाजपचे उच्चपदस्थ नेते शेतीनिरक्षर असल्याने ऐताडा-बैताडांच्या भोंदूगिरीला बळी पडतात व झिरोबजेट शेतीचा डमरू वाजवतात.
© गंगाधर मुटे
शेतकरी तितुका एक एक!
07 जुलै 2019
अन्न स्वस्तात मुबलक उपलब्ध असल्याने झिरोबजेटवाल्यांना अन्नाचा उतमाज आलाय. एकेका घासासाठी तळमळायची वेळ आली की उतमाज आपोआप उतरेल.
शेतकरी तितुका एक एक!
07 जुलै 2019
हल्ली लग्नाला मुली मिळणेअवघड झाल्याने आता "बेटा बचाओ" च्या कविता लिहिणे सुरु करावे का? की अजून काही दिवस थांबावे?
© गंगाधर मुटे
शेतकरी तितुका एक एक!
07 जुलै 2019
हल्ली लग्नाला मुली मिळणेअवघड झाल्याने आता "बेटा बचाओ" च्या कविता लिहिणे सुरु करावे का? की अजून काही दिवस थांबावे?
© गंगाधर मुटे
शेतकरी तितुका एक एक!
07 जुलै 2019
राशन कार्डावर एक पती/पत्नी व दोन मुले सवलतीच्या दरात उपलब्ध झाले की देश महासत्ता झाला असे समजावे.
© गंगाधर मुटे
शेतकरी तितुका एक एक!
8 जुलै 2024
'सच्चे दिन' म्हणता म्हणता 'लुच्चे दिन' आले
अन शेतमालाचे भाव तमाम लंबेलाट झाले ....॥
#गंगाधर_मुटे #शुभरात्री_लोक्सहो #रानातला_शेर
शेतकरी तितुका एक एक!
08 जुलै 2023
बुद्धिबळ, भुजबळ व आर्थिक बळाचे पाठबळ एक झाल्यास नीतीचे मानसिक बळ खचून मनुष्यबळ दुर्बळ होते.
#जौद्या_आप्ल्याले_काक्रा_लाग्ते
शेतकरी तितुका एक एक!
09 जुलै 2023
मला तपास यंत्रणेचा चीफ बनवा, भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली मी एकोणएक सारे राजकारणी जेलमध्ये टाकून दाखवतो. जेलच्या बाहेर एक जरी राजकारणी दिसला ना.... तर तुम्ही पैज हरलात असे समजून तुम्ही खुशाल आत्महत्या करू शकता...!
#शुभरात्री_लोक्सहो #लोकशाही #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
09 जुलै 2019
आदीमयुगात #झिरोबजेट आदिमानवाचे होते. कलियुगात झिरोबजेट फक्त जनावरांचे असते.
© गंगाधर मुटे
शेतकरी तितुका एक एक!
09 जुलै 2019
आता आपल्याला अंगाभवती कपड्याऐवजी रानकेळीची पाने गुंडाळायची संधी मिळणार! #झिरोबजेट मला बंबाड आवडलं ब्वॉ! तुम्हाला?
© गंगाधर मुटे
शेतकरी तितुका एक एक!
09 जुलै 2025
आयुष्याच्या वळणावरती
जेव्हा पुरता दमून गेलो
पोट बांधले पायाशी अन्
हात हवेचा धरून गेलो
#रानातला_शेर #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
11 जुलै 2022
माझेकडे ३१५६ कोटी रु. आणून द्या. मी सरकार पाडून दाखवतो. जर मी पैज हरलो तर देश सोडून (माल्ल्याच्या शेजारी राहायला) जाईन... पुन्हा तुम्हाला तोंड दाखवणार नाही.
#शुभरात्री_लोक्सहो #नुसता_भुताचा_बाजार #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
11 जुलै 2025
माझेकडे ३१५६ कोटी रु. आणून द्या. मी सरकार पाडून दाखवतो. जर मी पैज हरलो तर देश सोडून (माल्ल्याच्या शेजारी राहायला) जाईन. त्याच पैशात तिकडेच ऐष करीन. ;(

#शुभरात्री_लोक्सहो #नुसता_भुताचा_बाजार #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
14 जुलै 2024
शेती विरोधी कायदे रद्द करा : मागणीतील फोलपणा
प्रश्न : मुटे सर, कायदे रद्द झाल्याने काय होईल असा आपण प्रतिप्रश्न केल्याने माझा गोंधळ उडाला आहे.
म्हणून आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी काय केले म्हणजे आर्थिक प्रश्न सुटेल ह्याबद्दल योग्य मार्गदर्शन करून आमच्या सारख्या कार्यकत्यांचे अज्ञान दूर करावे.
उत्तर :
Ramkishanappa Rudraksh उत्तर सोपं आहे फार अवघड नाही पण त्यासाठी नीट विचार करून चिंतन करण्याची गरज आहे.
1. कोणतेही सरकार आधी कायदे बनवत नाही. आधी धोरण ठरते मग त्यानुसार कायदे बनवण्यात येतात.
2. शेतीविरोधी धोरण जर बदलायचं नसेल तर कोणतेही सरकार कायदे बदलणार नाही.
3. समजा कायदे बदलले पण धोरण कायम ठेवलं तरी शेतीची लूट थांबू शकत नाही. 1950 पूर्वी तुम्ही म्हणता ते शेती विरोधी कायदे नव्हते. मग 1950 पूर्वी शेतीचे शोषण होत नव्हते का?
4. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कोणत्याही युगात, कोणत्याही शतकात शेतीला अनुकूल असे कायदे बनवण्यात आलेले नाहीत त्यामुळे शेतीला संरक्षण मिळाले नाही. आजही शेतीला अनुकूल असे कायदे नाहीत.
5. शेतीला अनुकूल कायदे तेव्हाच बनतील जेव्हा सरकारचे धोरण बदलेल. आहे ते काही कायदे रद्द केले आणि शेतीला अनुकूल कायदे तयार केले नाहीत तरी शेतीचे शोषण थांबू शकत नाही.
निष्कर्ष असा की जोपर्यंत धोरण बदलत नाही तोपर्यंत काही कायदे रद्द करूनही काहीही उपयोग नाही. कारण जे कायदे वाचतील तेवढेच कायदे शेतीचे शोषण करण्यासाठी पुरेसे ठरतील.
काही कायदे रद्द केल्याने शेतीचे प्रश्न सुटतात हा विचार निव्वळ भाबडेपणाचा आहे. त्यासाठी एक उदाहरण देतो.
समजा एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा खून करायचे ठरवले आणि त्यासाठी हत्यार म्हणून तलवार हाती घेतली तर...
त्याच्या हातची तलवार काढून घ्या म्हणजे तो खून करणार नाही... हा विचार भाबडेपणाचा आहे कारण जोपर्यंत तो खून करण्याचा निर्णय/नियत/धोरण बदलणार नाही तोपर्यंत त्याला खून करण्यापासून कोणी अडवू शकणार नाही.
तुम्ही तलवार जरी हिसकावून घेतली तरी तो हातात लाठी घेईल, काठी घेईल, बंदूक घेईल किंवा दगड धोंडे घेईल पण तो उद्दिष्ट पूर्ण करेल.
निष्कर्ष हाच की कायदे रद्द करा असे म्हणणे म्हणजे हातातली तलवार हिसकावून घ्या असे म्हणण्यासारखे आहे.
जोपर्यंत नियत/धोरण बदलत नाही तोपर्यंत अंतिम उद्दिष्ट प्राप्त होणार नाही.
म्हणून
युगात्मा शरद जोशी म्हणाले होते "शेतकऱ्याचे मरण हेच शासनाचे धोरण" म्हणून ते युगात्मा होते, शेतकऱ्यांचे पंचप्राण होते, कुशल शेतकरी नेते होते आणि थोर आंदोलक सेनापती होते.
तुम्हाला युगात्मा शरद जोशींच्या पुढे जायचे असेल तर त्या पलीकडला विचार करावा लागेल आणि त्या पलीकडील आंदोलन शास्त्र मांडावे लागेल. मुर्खासारखे काहीच्या काही आतार्किक बोलून युगात्मा शरद जोशीपेक्षा मोठे होता येणार नाही.
तमाशामध्ये आपल्याकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या ललना वेगवेगळे ॲटम पेश करतात. तुम्ही सुद्धा त्यासारखेच जनतेचे लक्ष वेधण्यासाठी शेतीविरोधि कायदे रद्द करा, शेती विरोधी कायदे रद्द करा असे म्हणून आपला ॲटम पेश करून लोकांचे लक्ष वेधून घेत असता. या पलीकडे तुमच्या मागणीला काहीही अर्थ नाही. उगीच शेतकरी आंदोलन कमजोर करण्यात काहीही अर्थ नाही.
जोपर्यंत सरकारचे शेतीविरोधी धोरण बदलून शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळण्यासाठी शेतीला अनुकूल धोरण तयार होत नाही तोपर्यंत ना शेतीचे दारिद्र्य संपणार आहे ना देशाची गरीबी संपणार आहे.
#गंगाधर_मुटे #शुभरात्री_लोक्सहो
शेतकरी तितुका एक एक!
14 जुलै 2014
मा. शरद जोशी यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे :
- महात्मा ज्योतिबा फुल्यांची एका बाबतीत चूक झाली, त्यांनी असे मानले की ब्राम्हण-भटजी कारकुनांऐवजी जर शेतकर्याच्या जातीचे, त्यांच्या नात्यागोत्यातले कारकून आलेत तर ते शेतकर्यांशी जास्त सहानुभूतीने वागतील आणि पिळवणूक कमी होईल पण आता क्रित्येक ठिकाणी भट कारकून गेलेत आणि त्यांच्या ऐवजी शेतकर्याच्या जातीचे कारकून आलेत, पण शेतकर्यांची पिळवणूक काही कमी झाली नाही, याउलट ते भटकारकुनांपेक्षा जास्त जोमाने व ताकदीने दुष्टपणे पिळायला लागले आहेत.
- साखर, कांदा, बटाटा ही काही जीवनावश्यक वस्तू आहे काय? साखर, कांदा, बटाटा खाल्ला नाही तर माणूस मरत असतो काय? उलट साखर खाल्ल्यामुळे लोकांना डायबिटीस व्हायची भिती असते. डायबिटीसने मरण्याची शक्यता असते. उलट औषधाच्या गोळ्या माणसाचा जीव वाचवतात पण औषधाच्या गोळ्यांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश नाही.
- काँग्रेसही तेच करत होती आणि नरेंद्र मोदी तुमच्या-आमच्या शेतकर्यांच्या जातीचे असले तरी तेच करत आहेत. त्यामुळे आता आपल्याला आंदोलनाच्याच मार्गाने जावे लागणार आहे.
- नाशिक येथे ४ ऑगष्टला कांदा उत्पादक शेतकरी मेळावा आहे. कांदा व बटाटा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून काढून टाकावा यासाठी, सत्ताधार्यांना हादरा बसेल असे आंदोलन मी जाहीर करणार आहे. मी शरीराने थकलो असलो तरी मनाने थकलेलो नाही. रस्ता रोको आणि रेल्वे रोको आंदोलनाचे प्रत्यक्ष रणांगणात उतरून मी नेतृत्व करेन.
- शेती आणि शेतकरी यांच्यासाठी हा अर्थसंकल्प निराशाजनक व डोंगर पोखरून उंदीरही निघू नये असा आहे. 'भारत' आणि 'इंडिया' यांच्या लढाईत भारत पराभूत झाला आहे.
शेतकरी तितुका एक एक!
15 जुलै 2024
दलाल संपवण्यासाठी ग्राहकांनी "ग्राहक गट/कंपनी" करून बांधावर शेतमाल खरेदीसाठी आले पाहिजे.
#शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
15 जुलै 2019
शेतीतल्या प्रत्यक्ष कष्टाने महिनाभरात सावळ्याचा काळा झालो. तोंड दाखवायला जागा नाही राहिली राव! "तोंड काळे करणे" चा खरा अर्थ हाच?
शेतकरी तितुका एक एक!
16 जुलै 2024
प्रॉडक्शन, प्रॉसेसिंग, मार्केटिंग शेतकर्यानेच केली तर संडासला तरी वेळ वाचेल का त्याचेकडे?
#सांगा_ब्वॉ
#शुभरात्री_लोक्सहो
शेतकरी तितुका एक एक!
16 जुलै 2020
शालेय/विद्यापीठीय परीक्षा म्हणजे बुद्धिमत्तेची परीक्षा नसून केवळ स्मरणशक्तीची परीक्षा असते.
#गंगाधर_मुटे आर्वीकर #RVKR
शेतकरी तितुका एक एक!
16 जुलै 2018
!!! #विनोदाचावार_सोमवार !!!!
शेतीनिर्णय घेताना व त्यावर अंमल करताना सुविद्य-सुसंस्कृत-सुसभ्य-विद्याविभूषित शासनाने जेवढ्या कोलांटउड्या मारल्या आहेत; तेवढ्या उत्क्रांतीपूर्व माकडांनीही मारल्या नसतील.
© गंगाधर मुटे
शेतकरी तितुका एक एक!
17 जुलै 2024
सध्या बहुतांश महिला बचत गट कर्जाचे व्याज व किस्ती फेडत बँकांना जगवण्याचे महापुण्य मिळवत आहे.
#शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
17 जुलै 2022
पाऊस आलं
पूर आलं
हिरवं स्वप्न वाहून गेलं
#गंगाधर_मुटे #दीर्घमहाकाव्य
शेतकरी तितुका एक एक!
17 जुलै 2019
पाऊस तुमचा गुलाम नाही. त्याच्याकडून फाजील अपेक्षा करू नका. शेतकऱ्यांनो! अपेक्षा कुणाकडून करायच्या ते आधी शिका.
© गंगाधर मुटे
शेतकरी तितुका एक एक!
19 जुलै 2024
भिकारी आणि शेतकरी यांचेकडे भांडवल नसल्याने एक भीक मागतो तर दुसरा कर्ज/अनुदान!
#शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
19 जुलै 2019
शारिरिक अपंग व्यक्तींना खरी मानवी मदतीची गरज आहे. लोक त्यांना मदत करायची सोडून धडधाकट शेतकर्याला मदत करायला, त्यांना भीक वाढायला, त्याच्या बायकोला साडीचोळी द्यायला का धावतात, याचे मला कधीच उत्तर मिळत नाही.
बिचारे अपंग काम करू शकत नाहीत,
म्हणून त्यांना मदतीची सक्त गरज असते.
शेतकरी काम करू शकतो, त्याला मदतीची गरजच काय?
फ़क्त
घामाचे दाम दिले की एका झटक्यात प्रश्न सुटतो
पण
लोक कित्ती महान आहेत बघा, शेतकरी भिकारी नसूनही त्याला पहिल्यांदा भिकारी बनवतात आणि मग मदतीची भीक वाढायलाही हिरिरिने धावतात!
शेतकरी तितुका एक एक!
२ ० जुलै २ ० २ २
जे नियमित कर्जफेड करतात त्यांना इन्सेटिव्ह म्हणून ५० हजार दिल्याने शेतकरी आत्महत्त्या कशा थांबतील? मुख्यमंत्र्यांचा वादा भलताच आणि घोषणा भलतीच? ये कैसी है पहेली... जनाबेअली?
#शेतीचे_अनर्थशास्त्र #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
२ ० जुलै २ ० १ ६
शेतकरी कार्यकर्त्यांसाठी....!
या विषयावर माझं थोडं वेगळं पण ठाम मत आहे की, आपण कोणी महात्मा, युगपुरुष, थोर, महान यापैकी कोणी असू तर आपण संबंध जगच काय संपूर्ण सृष्टी आणि मनुष्यप्राण्याचा, जीवजंतूंचा देखील विचार करायला आणि त्यांचे प्रश्न सोडवून त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करायला हरकत नाही.
पण आपण जर सामान्य सर्वसाधारण मनुष्य असू तर आपणाला नक्की मर्यादा आहेत. विचारशक्तीला व कृतीलाही मर्यादाच मर्यादा आहेत. अशा स्थितीत जर आपण सर्वव्यापी प्रश्नांचा विचार करून त्याची सोडवणूक करण्यासाठी दंड थोपटून उभे राहिलो आणि स्वत:ची आहुती जरी दिली तरी त्यातून काहीही निष्पन्न होण्याची शक्यता नाही. एक ना धड भाराभार चिंध्या यापलिकडे कोणताही चांगला निकाल आपल्याबाजूने मिळण्याची शक्यता नाही.
हे खरे आहे की आपल्यासमोर, आपल्या समाजासमोर, आपल्या राज्यासमोर किंवा आपल्या देशासमोर हजारोच नव्हे तर कदाचित लाखो प्रश्न असतील. त्यातील काही मुख्य असतील जसे की आतंकवाद, भ्रष्टाचार, काळा पैसा, भृणहत्त्या, नासलेली शासनव्यवस्था वगैरे वगैरे. पण हे सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आपण शेतीचा प्रश्न सुटल्यानंतर करायला काय हरकत आहे? किंवा आपण केलाच पाहीजे असे तरी आवश्यक कुठे आहे? हा विचार करायला देशामध्ये मुंग्यांच्या रांगा लागाव्या तशा राजकीय पुढारी, प्रशासन, समाजसेवक, तज्ज्ञ, विद्वान, लेखक, कवी, विचारवंत, पत्रकार यांच्या रांगा लागल्या आहेतच.
फ़क्त शेतीत सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी "शेतमालाचा भाव" हाच विषय घेऊन लढणारांची वानवा आहे. जे काही आहेत त्यांनीही जर शेतीसोबतच अन्य विषयावर लक्ष केंद्रीत करायचे ठरवले तर शेती हा विषय त्याच्या विचारात आणि कृतीत दुय्यम स्थानी कधी येईल, काही सांगता येत नाही. इतिहास साक्षी आहे की शेतीविषय घेऊन लढायला निघालेले रथीमहारथी कधी शेतीच्या लुटीच्या व्यवस्थेत सामील होऊन शेतीच्या लुटीला हातभार लावते झाले, हे त्यांचे त्यांनाही कळले नाही.
म्हणून मला असे वाटते की आपल्याला गरज आहे ती फ़क्त शेतीच्या प्रश्नावर संपूर्ण एकाग्रतेने लक्ष केंद्रीत करण्याची.
- गंगाधर मुटे
~~~~~~~~~~~~~~
शेतकरी तितुका एक एक!
21 जुलै 2022
स्वतः श्रद्धा बाळगणे किंवा दुसऱ्याच्या श्रद्धेला अंधश्रद्धा समजणे... या दोन्ही अवस्था स्वतःच स्वतःच्या मनाची समजूत घालणाऱ्या आहेत... श्रद्धा-अंधश्रद्धा शब्द ओलांडले की तिथून पुढे खरे ज्ञान-विज्ञान सुरू होते.
#शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
25 जुलै 2024
शेतीच्या शोषणासाठी धोरणात्मक क्लुप्त्या जो शोधतो तोच सरकारमान्य शेतीतज्ज्ञ/अर्थतज्ज्ञ असतो.
#शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
25 जुलै 2019
अति पावसापायी बेजार झालेल्या मुंबईकरांचे मराठवाड्यात स्थलांतर करून 50 टक्के अनुदानावर घरकुल देऊन त्यांचे पुनर्वसन केले पाहिजे.
शेतकरी तितुका एक एक!
25 जुलै 2019
खाड्या बुजवून माड्या बांधल्या, आता माड्या पाडून खेतीवाड्या करा,
मस्त पाऊस पडतो आजकाल मुंबईत! चांगले पीक येणार हमखास!!
शेतकरी तितुका एक एक!
25 जुलै 2019
नेमकी व प्रभावी राजकीय भूमिका न घेता येणाऱ्या चळवळींची अवस्था वाघ गळलेल्या दातासारखी असते.
© गंगाधर मुटे
शेतकरी तितुका एक एक!
25 जुलै 2019
कोणत्याही चळवळीसाठी राजकारण हे बायप्रॉडक्ट किंवा बोनससारखे असते. मुख्यप्रवाह असू शकत नाही.
© गंगाधर मुटे
शेतकरी तितुका एक एक!
25 जुलै 2018
माणसाने निर्माण केलेला देव आणि माणसाला निर्माण करणारा देव हे फार परस्परभिन्न देव आहेत, असे माझे स्पष्ट मत आहे.
© गंगाधर मुटे
शेतकरी तितुका एक एक!
03 ऑगस्ट 2021
इंग्रजांना बिनडोक पण प्रचंड स्मरणशक्ती असलेली नोकरशाही हवी होती. त्याला अनुरूप त्यांनी अंगभूत कौशल्याची माती करणारी सांगकामी कारकुनी शैक्षणिक प्रणाली निर्माण केली. त्याचाच परिणाम असा की कागदाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले.
काही विचार करू नका. झोपा यथेच्छ. #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
03 ऑगस्ट 2025
शेती मरून उताणी पडलेल्या देशाची अर्थव्यवस्था *Dead* असणारच! Thanks रे Trump तात्या
तुम्ही करा विचार मी झोपतो #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
पाने