![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
none
प्राण
कोणी म्हणते,
रानात पाऊस पडलाय
कोणी म्हणतो डोळ्यात
खरच कळत नाही
पाऊस काय सांगत असतो
कोड्यात..!
पिक खाली
वरून पाणीच पाणी
ना नियोजन ना कार्यक्षमता
नुसती बोलायची कढी म्हणजे
प्रशासनाची वाणी..!
भाव असतो ही नसतो ही
कारखाना टिकवण्यासाठी
शेतकऱ्याची दिली जाते आहुति
त्यातून निसर्ग कसा सोडेल
तो ही खेळत असतो खेळ
अवती भोवती..!
रानात पाऊस म्हणावा की
पावसात वसलेलं रान
डोळे उघडून सांग ना देवा
शेतकऱ्याला रोजच द्यायचा असतो का
प्राण..!
- महेश
8806646250
mdesale29999@gmail.com
प्रतिक्रिया
शेतकऱ्याला रोजच द्यायचा असतो का प्राण..! ...
अप्रतिम!! पद्यकविता महेश
धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद
खुप खुप धन्यवाद सर जी
खूप छान
खूप छान कविता!
मुक्तविहारी
धन्यवाद
खुप खुप धन्यवाद सर जी
रानात पाऊस की पावसात वसलेल रान
मस्त महेश
धन्यवाद
खुप खुप धन्यवाद सर जी
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
http://www.baliraja.com/node/118
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या
सदस्य प्रवेश
सदस्य खाते
User Details
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
अंगारमळा - अंक - ११
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
मोबाईल अॅप